Wrong UPI Transaction सध्या सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतात. याला डिजिटल ई ट्रान्झ्याक्शन असे म्हटले जाते. कोणताही कॅश व्यवहार न होता, दोन व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करतात. अशावेळी एका व्यक्तीकडून दुसऱ्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्फर केले जाऊ शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारामध्ये योग्य खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर नसेल तर ही चूक होण्याचे चान्सेस आहेत. काहींना ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसंबंधी योग्य माहिती नसेल तर त्यांच्या हातून या अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात.
तुमच्या कडूनही कधी असे झाले आहे का? की तुम्हाला तुमच्या परिचयाच्या व्यक्तीला पैसे पाठवायचे होते आणि दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन मनी ट्रान्स्फर झाले आहेत. तर मग तुम्ही या लेखात दिलेल्या कृती करुन पहा, नकक्कीच तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.
How to reverse wrong upi transaction | चुकून दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्स्फर झालेली रक्कम कशी परत मिळवायची हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
UPI Wrong Transaction Complaint तक्रार कुठे आणि कशी करायची
जर तुमच्या कडून चुकून ( UPI Wrong Transaction Complaint) एखादा आर्थिक व्यवहार झाला असेल म्हणजेच आर्थिक व्यवहार करताना खाते क्रमांक टाकताना नंबर चुकला आसेल तर दुसऱ्या खात्यात रक्कम हस्तांतरित हस्तांतरित केली जाते. या प्रकरणात, ग्राहकाने ताबडतोब त्याच्या बँकेला सूचित केले पाहिजे. खातेधारकाने त्याच्या बँकेच्या शाखेत जाऊन झालेल्या हस्तांतरणाबाबात माहिती देणे अत्यावश्यक असते. काही कराणास्तव आपल्या बँकेच्या शाखेने मदत न केल्यास, आपण ::CRM:: (sbi.co.in) येथे तक्रार करू शकतो. तसेच ग्राहकांच्या विविध सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या ग्राहक NPCI पोर्टलवरही तक्रार करू शकतात. ग्राहकाने तक्रार नोंदवल्या नंतर User Complaint Status सतत चेक करत राहावे. जेणेकरून काही अपडेट आल्यास माहिती मिळेल.
चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाल्यास सर्वप्रथम पुढील गोष्टी करा
तुमचे पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर करताना तिसऱ्याच एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर झाल्यास 9223008333 क्रमांकावर एसएमएस करुन तक्रार करु शकता. तसेच
unauthorisedtransactions@sbi.co.in या इमेल आयडीवर मेल करुन तक्रार करु शकता. अनधिकृत व्यवहारांची तक्रार करण्यासाठी डेडीकेटेड टोल फ्री क्रमांक 1800 11 11 09 आणि इतर टोल फ्री क्रमांक 1800 11 22 11 / 1800 425 3800 देण्यात आलेले आहेत. तुमच्या बँकेला या चुकीच्या व्यवहारांबाबत कळवणे गरजेचे आहे. वरील क्रमांक केवळ एसबीआय बँकेसाठी आहेत, तुमची या व्यतिरिक्त एखादी बँक असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
RBI चे नियम – RBI guidelines for Wrong Transaction
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाइन ( RBI guidelines for Wrong Transaction ) नुसार, ऑनलाइन पेमेंट करताना ग्राहकाला काही अडथळा येऊ शकतो. ही रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली जाते ( Wrong Transaction ). ग्राहकाने ताबडतोब तक्रार केल्यास, बँक ग्राहकाला ४८ तासांच्या आत रक्कम परत करण्यास बांधील आहे. आरबीआयच्या गाईडलाइननुसार, तुम्ही ज्या खात्यातून रक्कम हस्तांतरित केली आहे त्याबद्दल तुम्ही प्रथम बँक किंवा फिनटेक कंपनीला ताबडतोब सूचित केले पाहिजे. GPay, PhonePe, Paytm किंवा UPI APP कस्टमर केअरला तक्रार करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Wrong upi Transaction दुसऱ्याच व्यक्तीस चुकून पैसे ट्रान्स्फर झाल्यास जर त्या व्यक्तीने पैसे परत केले नाहीत तर?
जर Wrong upi Transaction झाल्यास एखाद्या व्यक्तीने खात्यातून पैसे घेतले आणि ते त्यांचे आहे असे मानून ते खर्च केले आणि ते परत करण्यासाठी वेळ मागितला, तर तुम्ही पुढील गोष्टी करु शकता.
- त्या व्यक्तीची पोलिसांकडे तक्रार करु शकता.
- बँकेला तक्रारीची प्रत पाठवून त्याचे खाते गोठवले जाऊ शकते. पैसे परत येईपर्यंत ते खाते गोठवू शकतात.
- अशा प्रकरणांमध्ये, पोलिसांसह कोणीही व्यक्तीला पैसे परत करण्यास सांगू शकतात.
- बँकेतून त्या व्यक्तीच्या नावे लेटर पाठवून चुकीच्या आर्थिक ट्रान्झ्याक्शन बाबत सांगण्यात यावे.