कुसुम सोलर पंप योजना 2023 Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply ग्रामीण भागात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काही ठिकाणी पाणी असूनही वीज नसल्याने किंवा लोडशेडींमुळे शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण होत असताना. केंद्र सरकारने यावर तोडगा म्हणून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2023 सुरु केली आहे.

केंद्र शासन आणि  राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

शासनाचे शेतीविषय हे अभियान महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे On-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

7/12 उतारा (शेतात विहिर/कुपनलिका असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक) नावे एकापेक्षा जास्त असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • जमीन आराखडा प्रत
  • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते मागील 6 महिन्यांचे विवरण

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला महाउर्जा अभियान या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल,
  • यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल,
  • आता तुम्हाला सर्वप्रथम या योजनेंतर्गत तुमचे गाव पात्र आहे का हे तपासावे लागेल.
  • त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या सेफ व्हिलेज लिस्ट या पर्यायावर क्लिक करा,
  • या लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव पाहावे लागेल, यामध्ये तुमच्या गावाचे नाव असेल तर तुम्ही डीझेल पंप नाही हा पर्याय निवडून अर्जाची पुढील प्रक्रिया करू शकता.
  • या लिस्ट मध्ये जर तुमच्या गावाचे नाव नसेल तर डीझेल पंप वापरत असल्याचा पर्याय निवडून त्याठिकाणी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता.
  • जर तुम्हाला पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करून ते ऑनलाइन करू शकता.
  • सर्वप्रथम, तुम्ही या महाराष्ट्र पीएम कुसुम योजना नोंदणी लिंकवर क्लिक करा. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
  • तुमच्या समोर एक नोंदणी पृष्ठ उघडेल. या पेजवर तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे. नवीन किंवा बदली डिझेल पंपासाठी विनंती [जर नसेल तर]
  • तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल जिथे शेतीची जमीन आहे, यानंतर तालुका निवडावा लागेल आणि गावाचे नाव,
  • आता तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर पुढील रकान्यात तुम्हाला जाती संबंधित माहिती भरावी लागेल, समोर असलेल्या पर्यायांपैकी निवडून पुढे आपला ई-मेल आयडी प्रविष्ट करा.
  • यानंतर पुढील पेजवर तुम्हाला नोंदणीसाठी 100 रुपये ऑनलाइन फीस भरावी लागेल.
  • आता यानंतर तुमच्या मोबाइलवर युजरनेम आणि पासवर्ड पाठवल्या जाईल, जे वापरून तुम्ही पोर्टलवर लॉगिन  करायचे आहे.
  • वेबसाईटवरील सूचनांनुसार तुमची कागदपत्रे अपलोड करा व  पुढील प्रक्रिया पुर्ण करा.
  • संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सबमीट बटक क्लिक करा.

कुसुम सोलर पंप योजना 2023 अनुदान

Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy

कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 2023 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला फक्त खाली दिलेली रक्कम भरावयाची आहे,  शेतकर्यांना अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही. शासनातर्फे कुसुम सोलर पंप योजनेचे  लाभार्थ्यांनी भरावयाचे नवीन दर जाहीर झाले आहेत.

3 एच.पी. च्या सोलर पंप साठी भरावयाची रक्कम

खुला – 19,380/-

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 9,690/-

5 एच पी च्या सोलर पंप साठी भरावयाची रक्कम

खुला – 26,975/-

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 13,488/-

7.5 एच.पी.च्या सोलर पंप साठी भरावयाची रक्कम

खुला -37,440/-

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 18,720/-

कुसुम सोलर पंप योजना 2023 संबंधीच महत्त्वाच्या बाबी

  • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. www.mahaurja.com registration
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार आहे.
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय यामार्फत शासन करीत आहे.