अनेकदा आपण जमिनीची कागदोपत्री कामे करताना गट क्रमांक असा उल्लेख जरुर ऐकला असेल. हा जमिनीचा गट क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण तुम्ही आता घरबसल्या तुमच्या हातातील मोबाईलच्या मदतीने तुमच्या जमिनीचा गट क्रमांक तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या नावावर असलेल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. हा ऑनलाईन नकाशा कसा मिळवायचा या बद्दल अधिक सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून मिळवणार आहोत. Download Land record map
जमिनीचा गट क्रमांक म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण जमिनीचा गट क्रमांक म्हणजे काय ते जाणून घेऊया. प्रत्येक गावानुसार जमिनीचे तुकडे पाडले गेले आहेत. गट क्रमांक म्हणजे प्रत्येक गावातील शेत जमीनीच्या तुकड्यांचा क्रमांक आहे. Download Land record map
जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा काढायचा
ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा मिळवायचा हे आपण आता पुढील प्रक्रियेच्या मदतीने जाणून घेणार आहोत.
- तुम्हाला जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळवायचा असेल तर सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. तसेच mahabhunakasha.mahabhumi.gov.in या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता.
- आता तुम्हाला त्या वेबसाईटचे होम पेज दिसेल जिथे तुम्हाला एक टेबल दिसेल (प्रीमियम सर्व्हिसेस) ज्यामध्ये तीन नंबरचा पर्याय असेल महाभुनकाशा म्हणजेच जमीनीच्या नोंदी असलेले नकाशे. या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला Location म्हणून एक पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडायचा आहे. Download Land record map
- त्यानंतर पुढे दोन पर्याय असतील 1) ग्रामीण 2) शहरी
- तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर पहिल्या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्ही शहरी भारात राहत असाल तर दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. Download Land record map
- त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तालुक्याचे नाव तुम्हाला निवडावे लागेल आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल. गावाचे नाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसू लागेल.
- हि प्रक्रिया करताच तुम्हाला गावाचा संपूर्ण शेतजमिनीचा नकाशा दिसेल
- हा गावाचा नकाशा समोर आल्यानंतर तुमच्या जमिनीचा गट क्रमांक टाकून तुम्ही शेतजमिनीचा नकाशा पाहू शकता.
- तुमच्या जमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी तुम्हाला गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करावे लागेल (प्लॉट क्रमांकानुसार शोधा). त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या जमिनीच्या 7/12 वरील गट क्रमांक तेथे तुम्हाला भरावा लागेल.
- असे केल्यानंतर अगदी काही सेकंदातच तुमच्यासमोर तुम्ही गट क्रमांक टाकलेल्या जमिनीचा नकाशा येईल.
ऑनलाईन जमिनीचा नकाशा मिळण्याचे फायदे
- जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करताना जमिनीच्या नकाशाची आवश्यकता असते. तो नकाशा नसेल तर जमिनीचे व्यवहार करता येत नाहीत. किंवा जमिनीच्या नकाशासाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करावा लागतो त्यानंतर फी भरुन काही दिवसांच्या कालावधीनंतर आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा मिळतो. परंतू आता शासनाने ई नकाशा प्रकल्पांतर्गत सर्व जमिनींचे नकाशे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयातील फेऱ्या वाचल्या असून, जमिन मालकाला घरच्या घरी त्यांच्या जमिनीचे नकाशे पहायला मिळतात. Download Land record map
- झटपट नकाशा मिळवणे सोपे झाले आहे. ई नकाशा प्रकल्पामुळे कोणत्याही जास्तीच्या खर्चाशिवाय जमिनीचे नकाशे मिळवणे सोपे झाले आहे. ही नागरिकांसाठी अत्यंत सुविधाजनक बाब आहे. Download Land record map
- नागरिकांच्या शासकीय कार्यालयातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. कारण जमिनीचा नकाशा मिळविण्यासाठी नागरिकांना, शेतकरी बांधवांना भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीसंबंधीत कागदपत्रे किंवा नकाशा मिळविण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असत. एकाच वेळी हे काम होतच नसे. अनेकदा तेथील अधिकारी पैशांची देखील मागणी करीत असत. त्यामुळे शेतकऱ्यांना हे सर्व खर्चित होत असे. परंतू आता ई नकाशा प्रकल्पामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीचा नकाशा त्यांना हवा तेव्हा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकत आहे. Download Land record map