How to Check Cibil Score: सध्यस्थिती पाहता आपण घरातील प्रत्येक गोष्ट ही लोनवर घेत असतो. अगदी रोजच्या वापरातील मोबाईल असो वा टिव्ही, वॉशिंगमधीन, फ्रिज या सगळ्याच गोष्टी EMIवर मिळतात. त्याचे दरमहा हप्ते भरायचे असतात. घरासाठी लोन असो किंवा कारसाठी लोन घ्यायचे असो प्रत्येक बँकेत तुमचा सिबिल स्कोअर विचारला जातो. हा सिबिल स्कोअर म्हणजे नक्की काय आणि तो तुम्हाला अगदी का सेकंदात कसा तपासता येईल या सगळ्या बाबी आपण आजच्या लेखात सविस्तरपणे मांडणार आहोत.
सिबिल स्कोअर म्हणजे काय?
सीबील स्कोर हा त्या त्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरचा तीन अंकी सारांश असतो. CIBIL म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या सीबील किंवा क्रेडिट स्कोरची नोंद ठेवली जाते. याद्वारे एखाद्या व्यक्तीने स्वतःचे आर्थिक उत्पन्न कसे वापरले आहे, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट स्कोर यांची माहिती मिळते. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला बॅंकेकडून लगेच कर्ज मिळू शकते. त्याचबरोबर बॅंक कमीतकमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. पण जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यास खूप अडचणी येऊ शकतात. साधारणत: 750 आणि त्यावरील स्कोअरला चांगला सिबिल स्कोअर मानला जातो. क्रेडिट स्कोअरच्या हिस्ट्रीमध्ये हे सुद्धा पाहिलं जातं की, पूर्वीची कर्जे तुम्ही दिलेल्या मुदतीत फेडली आहेत की नाही.
चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय?
सिबिल स्कोअर मोजण्यासाठी एक पॅरामिटर ठरविण्यात आलेला आहे. 300 ते 900 पर्यंत असतो. जेवढा जास्त स्कोअर तेवढी चांगली गोष्ट. तुम्ही जर 900 सिबिल स्कोअर च्या जवळ असाल, तर हा चांगला स्कोअर मानल्या जातो. जर तुमचा सिबिल स्कोअर 300 च्या आसपास असेल तर ही वाईट बाब आहे.
सिबिल स्कोर चांगला असेल तर…
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज लोन मिळू शकेल. State Bank of India तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमीतकमी व्याजदराने लोन देते. जसे की, तुमचा सिबिल स्कोअर 800 च्या वर असेल तर तुम्हाला 8.55 टक्के व्याजदराने होम लोन मिळू शकेल. 750-799 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.65 टक्के दराने, 700-749 या दरम्यान स्कोअर असेल तर 8.75 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. 650-699 सिबिल स्कोअर असलेल्यांना 8.85 टक्के आणि 550-649 स्कोअर असलेल्यांना 9.05 टक्के दराने कर्ज मिळू शकेल.
सिबिल स्कोअर मोबाईलवर कसा पाहायचा? how to check cibil score on mobile
तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर मोबाईलवर देखील पाहू शकता. तोही एका क्लिकवर. CIBIL Score | Credit Score | Credit Report | Loan Solutions हे गुगलवर सर्च करुन तुम्ही त्या त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा सिबिल स्कोअर चेक करु शकता. साईटवर गेल्यावर तुम्ही Get your CIBIL SCORE वर तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमचा सिबिल स्कोअर पाहू शकता.
तसेच हल्ली प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये Gpay किंवा Phonepe ही ऍप्स असतात.या दोन्ही ऍपमध्ये Get your CIBIL SCORE असा पर्याय असतो. त्यात जाऊन तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटचा सिबिल स्कोअर तपासू शकता.
तुमच्या बँक अकाऊंटचा आतापर्यंतचा संपूर्ण आर्थिक इतिहास
तुमच्या बँक अकाऊंटचा आतापर्यंतचा संपूर्ण इतिहास म्हणजे अंकात मांडलेला सिबिल स्कोअर असेही आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आतापर्यंत घेतलेली कर्जे, फेडलेले ईएमआय. एखादा हफ्ता उशीरा फेडल्यास किंवा एखादे कर्ज बुडवल्यास तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. आणि तुम्हाला पुन्हा कर्ज मिळविण्यास खूप अडचणी येऊ शकतात. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे यासाठी तुम्ही स्वतः काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिले म्हणजे एकाच वेळी जास्त कर्जे घेऊ नयेत आणि दुसरे म्हणजे एखादे कर्ज घेतले असल्यास त्याचा EMI म्हणजेच हफ्ता वेळेवर भरावा.
3 thoughts on “How to Check Cibil Score सिबिल स्कोअर अशा प्रकारे तपास मोबाईलवर तेही २ मिनिटांमध्ये”
Comments are closed.