dealings of sale and purchase of land महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज घेतल्याची आणि जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येत आहेत. बोगस सातबारा उतारा वापरून कर्ज घेतल्याने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे मग सातबारा उताऱ्याच्या आधारावर व्यवहार करताना तो उतारा खरा आहे की खोटा हे तपासणे गरजेचे ठरते. मग हा जमीनीचा सातबारा उतारा बोगस आहे हे कसें ओळखायचे त्याचे 3 सोपे उपाय आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Fraud 7/12 utara
जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाविषयी आणि त्या जमिनीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते. पण हल्ली बनावट सातबारा तयार करून जमीन व्यवहाराची बेकायदेशीर कामे केली जात आहेत. एखादी जमीन खरेदी किंवा विक्री करताना तुम्हाला सातबारा उतारा पाहून जर व्यवहार करायचे असतील तो सातबारा खरा आहे की खोटा आहे हे पाहणे खूप गरजेचे असते. मग एखाद्या जमीनीचा सातबारा उतारा बरोबर आहे की बोगस हे कसे ओळखायचे याच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या पुढील प्रमाणे.
जमीनीच्या सातबारा उताऱ्यावरील तलाठ्याची सही
जमीनीचा सातबारा खरा आहे की खोटा हे ओळखण्याचे पहिले लक्षण म्हणजे सातबारा उताऱ्यावरील तलाठ्याची सही. सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही ही असतेच. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्य जमीनीविषयी व्यवहार करीत असाल तर त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा 100% बोगस असल्याचे तुम्ही समजू शकता. तरीही सध्या सरकारने सर्व सरकारी व्यवहारामध्ये डिजिटलायझेशन केल्याने सध्या तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून दिला जातो. How to identify Fraud 7/12 utara
तसेच एखाद्या डिजिटल सातबाराच्या खालील बाजूस “सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची गरज नाही” अशा प्रकारची सुचना दिसून येत असले तरीह देखील तो बोगस सातबारा समजावा.
एलजी कोड (LG code) आणि ई महाभूमीचा लोगो
जमीनीच्या सातबारा संबंधात होणाऱ्या फसवणूकीमुळे शासनाने जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर हल्ली शासकीय बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत, त्यानुसार नवीन डिजिटल स्वरूपाच्या सातबारा उताऱ्यावर शेत जमिनीच्या माहितीसोबतच संबंधित गावाचा एक युनिक कोड असतो. प्रत्येक गावाचा हा युनिक कोड त्या गावातील जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासमोर कंसामध्ये लिहिलेला असतो. तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या सातबारा उताऱ्यावर हा संबंधीत गावाचा कोड नसेल तर तो उतारा बोगस किंवा बनावट आहे असे समजावे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने सातबारा आणि 8-अ च्या उताऱ्यावर वरच्या बाजूस इ-महाभुमी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन यांचा लोगो अनिवार्य करण्यात आला आहे. म्हणजे हा लोगो नसेल तर तुम्ही सातबारा उतारा बोगस आहे असे समजू शकता.
तुमच्याकडे असलेल्या डिजिटल सातबारा उताऱ्यावर जर एलजी कोड (LG code) आणि ई महाभूमीचा लोगो या दोन्ही गोष्टी नसतील तर तो उतारा बोगस आहे असे समजावे. How to identify Fraud 7/12 utara
जमीनीच्या सातबाऱ्यावर असलेला क्यूआर कोड (Quick Response code)
सध्या डिजिटलायझेशन मुळे कोणतेही ऑनलाईन फ्रॉड होऊ नयेत म्हणून सातबारा उताऱ्यावर डिजिटल माध्यमातून विविध बदल करण्यात आलेले आहेत. त्या बदलांमधील एक सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जमीनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्यूआर कोड. जमीनीच्या सातबारा उताऱ्याच्या प्रिंट वरती असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यावर संबंधीत सातबारा उतारा दिसतो. परंतू तुम्ही एखादा जमीनीचा व्यवहार केलात आणि त्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर जर क्यूआर कोड नसेल तर नक्कीच त्या जमीनीचा सातबारा उतारा बोगस आहे असे समजण्यास हरकत नाही.
तुमच्या हातात असलेल्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यात वरील तीन्ही गोष्टी नसतील तर नक्कीच तो सातबारा बनावट आहे असे समजावे.