Maratha Aarakshan – 27 जानेवारी 2024 या दिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील विजयी सभा घेण्यात आली आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणातील मागण्या मान्य झाल्याचे घोषीत केले. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे जवळजवळ 3 ते 4 कोटी मराठ्यांचा ओबीसी समाजामध्ये समावेश झाला. मागील 5 महिन्यांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आले. मागच्या 5 महिन्यात या आंदोलनाची अनेक रुपे अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहेत. कधी उपोषण, कधी दौरे, कधी जाहिर निषेध तर कधी मुंबईकडे धाव घेणारा विराट मोर्चा या सगळ्या गोष्टी पाहून नेहमीच अनेकांच्या भुवया ताणल्या जायच्या. एक मराठा लाख मराठा म्हणत खरचं लाखोंच्या गर्दिंचे परंतु अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होणारे हे मराठा आरक्षणाचे मोर्चे अनेकांचे लक्ष वेधून घ्यायचे आणि एकच चर्चा कानावर यायची की जरांगे पाटील यांच्या मागे नक्की अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी त्यांना या सगळ्या गोष्टींचे नियोजन आणि मराठा आरक्षणाला प्रगतीच्या दिशेने धावण्यासाठी बळ देत आहेत त्याच महत्त्वाच्या सात व्यक्तींबद्दल आपण आजच्या या लेखामध्ये माहिती मिळवणार आहोत.
पांडुरंग तारख
सर्वात पहिले नाव येते अंतरवली सराटी येथील सरपंच असेलले पांडुरंग तारख. गावात चार पॅनल असूनही सरपंच निवडणूकीत तब्बल 200 मतांनी विजय झालेले पांडुरंग तारख हे नेहमीच सावलीसारखे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संपूर्ण आंदोलना दरम्याने दिसून आले. मराठा आरक्षणात जी देणगी जमा झाली त्याचे नियोजन आणि खर्चाच्या आयोजनाचे काम पांडुरंग तारख यांच्याकडे आहे. आंदोलनाच्या वेळी अनेक मंत्री, खासदार , आमदार जरांगे पाटील यांना भेटायला यायचे त्यांच्याकडे नेहमी काहीना काही कागद असायचे हे कागदपत्र सांभाळून ते योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील पांडुरंग तारख यांच्याकडेच असायचे. दिडशे एकरावर झालेल्या सभेचं नियोजनही तारख यांनीच केल्याचे सांगण्यात येत आहे. अंतरवली ते मुंबई हा मराठा आरक्षणाच्या मागणीचा शेवटचा टप्पा मानला जातो या टप्प्यातही महत्त्वाची भूमिका बजावर पांडुरंग तारख मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अगदी सावलीसारखे दिसून आले.
श्रीराम कुरणकर
अखिल भारतीय छावा संघटनेचे सदस्य असलेल्या श्रीराम कुरणकर यांची मनोज जरांगे पाटिल यांच्याशी मैत्री झाली ती या संघटनेच्या कामा दरम्यानेच. त्यांतर जरांगे पाटील यांनी 2011 मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली ती कुरणकर यांच्या सोबतीने, जालना जिल्ह्यातील शेतकरी असलेले हे श्रीराम कुरणकर नेहमीच त्यांच्या जिवलग मित्राच्या सोबतीने म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतीने मराठी आरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. सतत जरांगे पाटिल यांच्यासोबत राहून त्यांचे योग्य वेळी योग्य माणसांशी बोलणं करुन देणे, दौऱ्यावर असताना जरांगे पाटील कोणत्या गाडीत बसणार, कुठून कुठे प्रवास करणार या सगळ्यावर अगदी बारकाईने लक्ष ठेवणारे कुरणकर अनेकांच्या नजरेस पडले. Manoj Jarange News
प्रदीप सोळूंके
छत्रपती संभाजीनगर मध्ये शिक्षकी नोकरी करणारे हे गृहस्थ नेहमीच त्यांच्या उठवदार वाणीने केलेल्या किर्तन आणि भाषणं यांमुळे प्रसिद्ध आहेत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते नेहमीच समाजकारणात सक्रिय होते, 2020 साली त्यांच्या नावाची विधानपरिषदेच्या पदासाठी चर्चा झाली होती. त्यानंतर 2023 मध्ये शिक्षक मतदार निवडणूकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. परंतु मराठा आरक्षणामध्ये मात्र प्रदीप सोळूंके यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. त्यांनी गावागावत मराठा आरक्षण का मह्त्तवाचे आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारकडे केल्या जात आहेत या सर्व गोष्टी नागरिकांना समजावून सांगायचे. जरांगे पाटलांच्या भाषणाला पुरक अशी पार्श्वभूमी उभी करण्यात प्रदीप सोळूंके यांचा मोठा हात होता. Manoj Jarange News
स्वप्नील तारख
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सोशल मिडियाच्या माध्यामातूनही मोठा पाठिंबा मिळाला. परंतु अनेरदा या मराठा आरक्षणाच्या बाबात चुकीच्या बातम्या देखील सोशल मिडियावर येत होत्या अशा चुकीच्या बातम्यांचे खंडन करुन योग्य ते अपडेट्स पोहोचवण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने काढण्यात आलेल्या एका सोशल मिडिया अकाउंटवरुन केले जायचे. त्यासोबत जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची माहिती, आंदोलनाची पुढची दिशा काय असे अशा संपूर्ण अपडेट्स मराठा समाजापर्यंत डिजिटल स्वरुपात पोहोचवण्याचे काम स्वप्निल तारख यांनी केले आहे. Manoj Jarange News
रमेश तारख
रमेश तारख हे अंतरवली गावात झालेल्या आंदोलनापासून ते साष्टी पिंपळगांव येथे झालेल्या प्रत्येक आंदोलनात पुढे होते. मनोज जरांगे यांच्या सोबत विविध नियोजनात आणि चर्चेमध्ये ते भाग घेत होते. आंदोलना दरम्याने येणारे मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासोबत बोलणी करीत होते. Manoj Jarange News
संजय कटारे
मराठा आरक्षणातील प्रत्येक दौऱ्यात सभेत आणि गर्दिचे नियोजन करण्यात संजय कटारे हे नेहमची कायम महत्त्वाची भूमिका बजावत होते. मराठा आरक्षणाचे गेल्या चार वर्षात महाराष्ट्रभर अनेक दौरे झाले या सगळ्या दौऱ्यांमध्ये नियोजनात्मक काम पाहणारे संजय कटारे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. Maratha Arakshan 2024
धनंजय दुफाके
शेतकरी कुटुंबातील धनंजय दुफाके यांनी देखील मनोज जरांगे पाटिल यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, महाराष्ट्रात ज्या ज्या भागांमधून आमच्याकडे दौरा करा अशी मागणी यायची तेथील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बोलून आंदोलनासाठी जागेची व्यवस्था करण्यापासून ते येणाऱ्या मराठा बांधवांच्या सोयी सुविधां पुरविण्यासाठीचा बंदोबस्तात हे सगळेच चेहरे काम करीत होते. Maratha Arakshan 2024