how to buy old cars on olx: स्प्लेंडर बाईक आणा फक्त 12000 रुपयांमध्ये

how to buy old cars on olx

how to buy old cars on olx: आपला भारत देश हा सेकेंड हँड वाहनांचा सर्वात मोठा विक्रेता आणि खरेदीदार देखील आहे. ज्यांना नवीन कार घेणे शक्य नाही आणि ज्यांना जुनी कार किंवा टू व्हिलर चालवून कंटाळा आलाय आणि नवीन वाहन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी एक नाही तर हजारो खरेदीदार उभे राहतात. कारण ज्या लोकांचं नवीन कार खरेदी करण्याचे बजेट नसते, असे लोक जुनी वाहने खरेदी करणे पसंत करतात.

भारतीय बाजारपेठेत सेकेंड हँड वाहनांमध्ये अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. अनेकदा एखादी जुनी कार देखील नव्या कार इतका चांगला परफॉर्मन्स देते. परंतु जुनी कार खरेदी करताना ग्राहकाने थोडी काळजी घेणे देखील महत्त्वाचे असते.  तुम्ही एखादी सेकेंड हँड कार किंवा टूव्हिलर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर हा लेख फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण या लेखाच्या माध्यमातून सेकंड हँड वाहन खरेदी करताना घ्यायवयाची काळजीबाबतचे काही टिप्स दिले आहेत.  ज्याता तुम्हाला खूप जास्त उपयोग होणार आहे. Second Hand  Bike

सेकंड हँड वस्तू खरेदी विक्रीचे भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन मार्केट

सेकंड हँड वस्तू असोत किंवा वाहने खरेदी करण्यासाठी तुम्हाला OLXच्या वेबसाईटवर किंवा ऍपवर जावे लागेल.  हे एक भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारची उत्पादने आणि वाहने देखील मिळू शकतात. जर तुम्हाला जुने वाहन खरेदी करायचे असेल, तर OLX हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या गरजेनुसार वाहन  मिळविण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त वेबसाईट आहे. Second Hand Car

OLX ॲप डाऊनलोड करा

  • तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही OLX App डाऊनलोड करा.
  • हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
  • तुम्हाला ज्या प्रकारचे वाहन खरेदी करायचे आहे त्या कंपनीचे नाव आणि मॉडेलचे नाव टाका
  • तुमच्यासमोर अनेक पर्याय येतील.
  • त्यातून निवड करुन तुम्ही सेकंट हँड कार खरेदी करु शकता.

OLX वरुन गाडी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?

हल्ली OLX या वेबसाईट आणि ऍपच्या माध्यमातून सेकंड हँड खरेदीदारांकडून फ्रॉड झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजीपुर्वक वाहन खरेदी करा. तुम्हाला Hero कंपनीची  स्प्लेंडर बाईक खरेदी करायची असो किंवा टाटाची एखादी कार त्यासाठी आम्ही पुढे काही टिप्स दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करा. Second Hand Car

  • OLX वर दिसणाऱ्या वाहनाची माहिती काळजीपूर्वक वाचा

OLX वर तुम्हाला वाहनाची विस्तृत माहिती दिलेली असते. त्या  माहितीमध्ये वाहनाचे मॉडेल, खरेदी वर्ष, किंमत, इंजिन, मायलेज, रंग, फीचर्स इत्यादींचा समावेश असतो. ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच खरेदीचा निर्णय घ्या.

  • OLX वर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वाहनाचे फोटो काळजीपूर्वक पहा

OLX वर विक्री करणारे वाहनांचे फोटो टाकतात. एखादी कार किंवा टूव्हिलर तुम्हाला खरेदी करायची असल्यास हे फोटो काळजीपूर्वक वाचा आणि मगच खरेदीचा निर्णय घ्या, शक्य असल्यास वाहन खरेदी करण्यापूर्वी ते वाहन प्रत्यक्ष पाहण्यासाठी जा. यामुळे तुम्हाला वाहनाची स्थिती आणि वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. वाहनासह त्याचे कागदपत्रे देखील तपासा. शक्य असल्यास खरेदीचे व्यवहार पूर्ण होण्याआधी वाहनाती चाचणी घ्या. यामुळे तुम्हाला वाहनाची कार्यक्षमता समजू शकते. वाहनाची इंजिन, वाहनाची सेटिंग, ब्रेक, सस्पेंशन इत्यादी गोष्टी नीट  तपासून पहा.

  • वाहनाची किंमत व्यवहार्य असल्याची खात्री करा

वाहन चालवून पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री होईल की हे वाहन सुस्थितीत आहे  की नाही, त्यानंतरच वाहनाची किंमत व्यवहार्य असल्याची खात्री होऊ शकेल.  तुम्ही इतर वेबसाइट आणि शोरूममधील किमतींचा तुलना करुन वाहनाच्या किंमतीत वाटाघाटी करु शकता. Second Hand Car

  • वाहन खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रे तपासा

वाहन खरेदी करण्यापूर्वी वाहनाची संबंधीत कागदपत्रे तपासा. यामध्ये वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे अत्यंत महत्त्वाचे असते ते नीट तपासून घ्या. तसेच वाहनाचा इंश्योरन्स, फिटनेस सर्टिफिके ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत.  सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय ऑनलाईन विक्रेत्यास पैसे देऊ नका.  Second Hand Car