E-mudra loan: तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती

E-mudra loan

E-mudra loan भारतात असे अनेक नवतरुण आहेत ज्यांच्याकडे उद्योग करण्यासंदर्भात उत्तमोत्तम आणि भन्नाट  संकल्पना असतात परंतु केवळ आर्थिक अडचणीमुळे किंवा उद्योगासाठी भांडवल नसल्यामुळे या लघुउद्योजकांची अडचण होते. बँका अशा नवउद्योजकांना कर्ज देताना अनेक फेऱ्या मारायला लावते, तसेच कागदपत्रांचा फापटपसारा असतो. म्हणूनच भारताचे पंतप्रधाना माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजने अंतर्गत भारतातील कोणत्याही राज्यात राहणाऱ्या लघु उद्योजकाला शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ घेऊन व्यवसायासाठी भांडवल उभे करता येईल.  

E-mudra loan प्रधानमंत्री मुद्रा योजनेची उद्दिष्टे

केंद्र सरकारमार्फत सुरु असलेल्या प्रधानमंत्री  मुद्रा योजनेची  काही उद्दिष्टे  आहे ज्यामुळे भारतीय लघुउद्योजकांना फायदा होणार आहे. ही उद्दिष्टे कोणती ती आता आपण पाहूया.

 • नागरिकांना  स्वयंरोजगारासाठी सोप्या व सरळ मार्गाने व्यावसाय कर्ज उपलब्ध करुन देणे .
 • छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे सोपे व्हावे म्हणून मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे..

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाचे प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लघु उद्योजकांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे तीन प्रकार आहेत. उद्योजकांने मांडलेली व्यवसाय संकल्पना आणि लागणारे भांडवल या आधारे अर्जदाराला कोणते कर्ज द्यावे हे ठरवले जाते.

 • शिशु कर्ज –

यामध्ये उद्योजकांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.

 • किशोर कर्ज –

यामध्ये लघु उद्योजकांना  50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

 • तरुण कर्जे –

यामध्ये लघु उद्योजरांना 5 लाख ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्जदाराची पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा
 • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 65 वर्षे पुर्ण इतके असावे.
 • अर्जदाराकडे किमान तीनवर्षांचे कर भरल्याच प्रमाणपत्र असावे म्हणजेच ITR सर्टिफिकेट असावे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • रेशनकार्ड
 • जातीचा दाखला
 • बँकेचे 3 महिन्यांचे स्टेटमेंट
 •  मागील तीन वर्षांचा ITR भरल्याचे प्रमाणपत्र

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2024 मध्ये कसा अर्ज करावा? E-mudra loan    apply online

  केंद्र शासनाची प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी तयार करण्यात आलेली अधिकृत वेबसाईट आहे.

https://mahamudra.maharashtra.gov.in/Site/Home/FrmPMMYLoanForm.aspx

 • वरील लिंकवर क्लिक करुन तुम्ही सरळ अर्जाच्या फ़ॉर्मवर जाऊ शकता. समोर मुद्रा कर्जाचा फॉर्म दिसेल तो काळजीपूर्वक भरा
 • जिथे कागदपत्रांविषयी विचारण्यात आले आहे तिथे तुमची कागदपत्रे जोडा.
 • तुमचे आधारकार्ड मोबाईलनंबरला लिंक असणे आवश्यक आहे. नसेल तर आमच्या या लिंकवर जाऊन तुम्ही आधारकार्ड मोबाईलनंबरला लिंक करण्याची प्रकिया पूर्ण करु शकता.
 • अर्जाचा फॉर्म भरुन पूर्ण झाल्यानंतर सबमीट म्हणा, तो केंद्र शासनाच्या मुख्य कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने जमा होईल आणि तुम्ही राहत असलेल्या जवळीत योजना केंद्रामार्फत तुम्हाला पुढील माहिती दिली जाईल.
 • तुमचा फॉर्म मान्य झाला आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या ईमेलवर देखील मेल पाठवून सांगितले जाईल.

मुद्रा कार्ड – Mudra card

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ज्या ज्या उद्योजकांना कर्ज मंजूर झाले आहे त्यांना मुद्रा कार्ड दिले जाते. जेणेकरून त्यांच्या खात्यात आलेले पैसे त्यांना जेव्हा जेव्हा वापरायचे आहे तेव्हा ते वापरू शकतात. E-mudra loan

प्रधानमंत्री मुद्रा लोन अंतर्गत मिळेल महिला उद्योजकांना डिस्काऊंट E-mudra loan

केंद्र शासनाच्या या मुद्रा लोन योजनेअंतर्गत विविध बँका अंतर्भूत आहेत, त्या बँकाची यादी याच लेखाच आम्ही देत आहोत. परंतु SBI बँकेने केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना कमी व्याजदराने  कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.  या मुद्रा योजनेतंर्गत महिलांना मिळणाऱ्या कर्जावर 08.40 ते 12.35 टक्के इतका व्याजदर आकारला जाणार आहे. तसेच महिला उद्योजकांचा व्यवसाय चांगला सुरु असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाणार आहे.  

 प्रधानमंत्री मुद्रा लोन PMMY योजनेअंतर्गत कर्जाचा  व्याजदर किती असतो.

प्रधानमंत्री मुद्रा लोन  योजनेअंतर्गत वेगवेगळ्या बँका मुद्रा लोनसाठी वेगवेगळा व्याज दर आकारू शकतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा उद्योग आणि उद्योगादरम्याने  जोखीम किती आहे यावरूनच व्याज दर निश्चित केले जातात. सामान्यपणे कमीत कमी व्यार दर 9.30% ते 12% इतका आहे. E-mudra loan

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांचा यादी

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांचा यादी खालील प्रमाणे दिली आहे. या केंद्र शासनाने मुद्रा योजनेसाठी अधिकृत केलेल्या बँका असून तुम्ही या बँकांमध्ये मुद्रा योजनेसाठी अर्ज करु शकता. E-mudra loan bank

 • Axis Bank Limited
 • City Union Bank Limited
 • Catholic Syrian Bank Limited
 • DCB Bank Limited
 • HDFC Bank Limited
 • ICICI Bank Limited
 • IndusInd Bank Limited
 • Karnataka Bank Limited
 • Kotak Mahindra Bank Limited
 • South Indian Bank
 • Nainital Bank Limited
 • Yes Bank Limited
 • The Ratnakar Bank Limited
 • IDFC Bank Limited
 • Public Sector Banks
 • State Bank of India
 • State Bank of Travancore
 • State Bank of Bikaner & Jaipur
 • Bank of India
 • Bank of Baroda
 • Canara Bank
 • Bank of Maharashtra
 • Corporation Bank
 • Canara Bank
 • IDBI Bank Limited
 • Dena Bank
 • Oriental Bank of Commerce
 • Indian Bank
 • Punjab National Bank
 • Union Bank of India
 • Allahabad Bank
 • Vijaya Bank
 • Bhartiya Mahila Bank
 • Andhra Bank
 • Central Bank of India
 • Punjab & Sind Bank
 • Indian Overseas Bank
 • State Bank of Mysore
 • State Bank of Hyderabad
 • United Bank of India