Anganwadi Sevika महाराष्ट्रात लहान मुलांच्या शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्यात येते. ही योजना ही देशात 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरु झाली करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात 1985 पासून योजना कार्यान्वित असून, सध्या सर्व 11 तालुक्यात 18 प्रकल्पाद्वारे 4799 अंगणवाड्यांमधून योजनेच्या शासकीय सेवा लाभार्थींपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाजी सेविका व मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीविषयी शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. हा नेमका कोणता निर्णय आहे आणि त्याचा एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला कोणता फायदा होणार आहे हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
सेवानिवृत्तीचा दिनांक 30 एप्रिल निश्चत
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयीन नोंदीनुसार 1 जानेवारी ते 1 मे हे दोन्ही दिवस धरुन या संपुर्ण कालावधीत जन्म दिनांक असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 30 एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्यात येईल. तसेच जन्म दिनांक 2 मे ते 30 डिसेंबर (दोन्ही दिवस धरून)या दरम्यान असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुढील कॅलेंडर वर्षाच्या 30 एप्रिल या दिवशी सेवानिवृत्ती करण्यात येईल. शासकीय निर्णयानुसार असे सांगण्यात आले आहे. Anganwadi Sevika
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ होण्याकरिता निर्णय
एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेली योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या नोंदणी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय 30 नोव्हेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयनव्ये निश्चित करण्यात आले आहे. तसेच योजनेसंबंधीत कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाने अटी व शर्ती देखील निश्चित करण्यात आल्या आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक प्रत्येक वर्षाचा 30 एप्रिल हा निश्चित करण्याबाबत केंद्र शासनाने यापूर्वीच सूचना दिलेल्या होत्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती बाबत 30 नोव्हेंबर 2018 व 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना 13 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. Anganwadi Sevika
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश्य काय आहे?
- ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
- बालकांना योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासासाठी सर्व सोयी पुरविणे
- अर्भक मृत्यू , बालमत्यू, कुपोषण व शाळा गळती या प्रश्नांसाठी काम करणे.
- बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे.
- योग्य पोषण आहार पुरविणे व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी बालकांच्या मातांना सक्षम बनविणे. Anganwadi Sevika
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे अंतर्गत देण्यात येणा-या सेवांची माहिती
- पूरक पोषण आहार
- आरोग्य तपासणी
- लसीकरण
- संदर्भ सेवा
- अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण
- आरोग्य व पोषण शिक्षण
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमुळे गाव पातळीवरील लहान मुलांना अगदी 0 ते 16 वर्षापर्यंत आरोग्य आणि शिक्षण याबाबातच्या सुविधा पोहोचवणे सोपे होते. त्यामुळे या अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी घेतला गेलेला हा सेवानिवृत्तीविषयीचा निर्णय अत्यंत महत्वाचा होता. यामुळे नक्कीच या महिलांना फायदा होईल.