Best android app: 2023 मध्ये हे पाच Android ॲप्स ठरले लोकप्रिय, ही पहा यादी

Best android app गूगल हे जगभरातील सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मिडिया व्यासपीठ आहे. गुगलचे विविध शाखा आहेत, गुगलचे अनेक प्रोडक्ट आहेत ज्याचा आपण दैनंदिन वापर करीत असतो, जीमेल, ड्राईव्ह, गुगल मॅप, गुगल ट्रान्सलेटर, प्ले स्टोअर अके एक ना अनेक गुगचे प्रोडक्ट आहेत. आजा आपण पाहणार आहोत Android ॲप्स बद्दल. गुगल कंपनीद्वारे दरमहिन्याला प्ले स्टोअरवर नुकत्याच लाँच झालेल्या ॲण्ड्रॉइड ॲप्सची यादी जाहीर केली जाते.  ही यादी युजर्सच्या म्हणजेच वापरकर्त्यांच्या आवडीवरून किंवा किती वापरकर्त्यांनी ते ॲप डाऊनलोड केले आहे यावरुन ठरते. २०२३ या वर्षाच्या शेवटी गुगलने  प्ले स्टोअरवरील  सर्वांत खास असे ॲप्स निवडले आहेत. या ॲप्सला वर्षभरात जगभरातील सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शविली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत जगभरात जास्तीत जास्त पसंतीस उतरलेले कोणते आहेत हे 5 महत्त्वाचे ॲप्स  Year Ender

Moodistory – Mood Tracker – मूडिस्टोरी मूड ट्रॅकर

मूडिस्टोरी मूड ट्रॅकर Moodistory – Mood Tracker या नावाचे एक ॲप असून ते मन ओळखण्याचे ट्रॅकर ॲप आहे. वापरकर्त्यांचा मूड कसा आहे, त्यांच्या मनात काय आहे हे सगळं सांगणारं हे ॲप असून, वापरकर्त्यांनी ‘एकही शब्द न लिहिता’ पाच सेकंदांपेक्षाही कमी वेळेत त्यांचा मूड ट्रॅक करुन देते. या ॲपबद्दल आणखीन सांगायचे तर वापरकर्त्यांच्या मूडशी संबंधित कलर, कोडेड आकडेवारी देखील या ॲपच्या माध्यमातून सांगितली जाते.  मॅटॉफ लॅब्सने मूडिस्टोरी हे ॲप तयार केले आहे. तसेच या ॲपला 4.3 रेटिंग दिली गेली आहे. तब्बल 10,000 पेक्षा जास्त युजर्सकडून हे ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. most downloaded app in 2023

Reelsy Reel Maker Video Editor – रीलसी रील व्हिडीओ एडिटर

आजचा जमाना हा रिल्सचा आहे. डिजिटल व्यासपीठावर रील्स बनवणे एक छंद असून तो करिअरचा भाग देखील बनू लागला आहे. म्हणूनच रील तयार करण्यासाठी लागणारे रील व्हिडीओ एडिटर ॲप आजच्या पिढीमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे. Reelsy वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम रिल्स बनवण्यात मदत करते  तसेच ट्रेंडिंग टेम्प्लेट देखील ऑफर करते. Reelsy हे ॲप Zed Italia Apps द्वारे बनविण्यात आले आहे. या ॲप ला 3.9 इतके रेटिंग आहे. तब्बल 5,00,000 पेक्षा जास्त युजर्सनी हे ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे.  

Threads, an Instagram app – ‘थ्रेड्स’ ए इन्स्टाग्राम ॲप

Threads, an Instagram app हे मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म एक्स X सोबत स्पर्धा करणारे ॲप असून. या ॲपच्या पोस्टमध्ये फोटो, व्हिडीओ किंवा लिंकदेखील समाविष्ट करता येतात.  Year Ender या ॲपला 4.2 रेटिंग  असून तब्बल 100 दशलक्ष युझर्सनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

Voidpet Garden : Mental Health – व्हॉईडपेट गार्डन : मानसिक आरोग्य

Voidpet Garden : Mental Health हे युजर्सचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करणारे  ॲप  आहे. युझर्सच्या निगेटिव्ह विचारांना डोक्यातून काढून टाकणे याबाबत हे ॲप  मदत करते आणि मार्गदर्शन देखील करते. इतकेच नाही तर हे ॲप  मनोरंजक  ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून युझर्सला आनंदी राहण्याचा आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करण्याचा मार्ग दाखवणारे ॲप आहे. या ॲपला 4.4 रेटिंग असून. तब्बल 1,00,000 युजर्सनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. इतकेच नाही तर  जवळ जवळ 9,400 युजर्सनी या ॲपच्या खाली वापरासंबंधीत रिव्हू देखील दिला आहे. most downloaded app in 2023

Insight Journal : Learn & Grow – इनसाईट जर्नल : लर्न ॲण्ड ग्रो

Insight Journal : Learn & Grow हे ॲप युजर्सच्या अडचणींवर, प्रश्नांवर काम करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटिलिजन्स  म्हणजेच AI प्रमाणे काम करते. या ॲपमध्ये छोटे छोटे टास्क दिले जातात आणि प्रश्न देखील दिले जातात. जे सोडवून युजर्स त्यांच्या समस्यांचे निराकरण करु शकतात किंवा त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतात.  या ॲपला 3.6 रेटिंग असून तब्बल 10,000 पेक्षा जास्त युजर्सनी हे ॲप  डाऊनलोड केले आहे.  most downloaded app in 2023