Beer Bar License: बियर बार व्यवसाय कसा सुरू करावा? कसे काढावे लागते लायसन्स व किती येतो खर्च? वाचा संपूर्ण माहिती माहिती

Beer Bar License

Beer Bar License:  अनेकांना व्यवसाय करणे  हे नोकरी करण्यापेक्षा चांगले वाटते. कारण व्यवसायात आपल्याला दबावाशिवाय तुमच्या मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळते.  व्यवसायात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या संकल्पनांचा समावेश होतो.  काही व्यवसाय सुरु करताना लागणारी गुंतवणूक ही कमीत कमी असते तर काही व्यवसायांसाठी खूप जास्त गुंतवणूक करावी लागते, तसाच एक व्यवसाय म्हणजे बियर बार व्यवसाय.

बियर बार  व्यवसायात गुंतवणूक मोठी असली तरी नफा देखील खूप मोठा असतो. म्हणूनच अनेक व्यवसायिकांचे बियर बार टाकणे हे स्वप्न असते. तुम्हाला देखील बियर बार व्यवसाय  करायचा असेल तर आम्ही आजच्या या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा. Beer Bar Licence

बिअर बार व्यवसायातील महत्त्वाच्या संधी

बियर बार या व्यवसायाचा ट्रेंड सध्या खूप जास्त आहे. उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यां या बियर बार मध्ये होतात.  एखादा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी सध्याच्या लोकांना बिअर बारमध्ये जायला आवडते. Beer Bar business

बियर बार व्यवसाय करण्यासाठी किती भांडवलाची गरज असते?

अनेकांना बियर बार व्यवसाय करण्याची इच्छा असते. कारण हा व्यवसाय  50 टक्के निश्चित नफा  देणारा व्यवसाय आहे. परंतु सुरुवातीच्या गुंतवणीकाला देखील विसरुन चालणार नाही. बियर बार व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान 15 ते 20 लाख रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असते. इतके भांडवल असेल तरच तुम्ही बियर बार व्यवसाय सुरु करु शकता.   

बियर बारचा व्यवसाय कुठे कुठे करता येत नाही.

भारतात अशी काही राज्ये आहेत जेथे कायद्याने दारुबंदी लागू करण्यात आली आहेत. त्यामुळे बियर बार व्यवसाय तुम्ही अशाच ठिकाणी करु शकता ज्याठिकाणी सरकारने अल्कोहोल किंवा तत्सम सॉफ्ट ड्रिंक पिण्यास मान्यता दिलेली असेल. भारतात गुजरात आणि बिहार या राज्यांमध्ये शासनामार्फत दारूबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शासनातर्फे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. Beer Bar License

वैध परवान्याशिवाय अल्कोहोलयुक्त पेय विकता येत नाही

बियर बार व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे त्याचे लायसन्स म्हणजेच वैध परवाना असणे तितकेच आवश्यक असते.  वैध परवान्याशिवाय तुम्ही अल्कोहोलयुक्त पेय जर विकू शकत नाही. आणि तसे केल्यास तो एक कायद्याने दंडणीय अपराध  मानला जातो.  त्यामुळे तुम्हाला बियर बार व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी परवाना  मिळवावा लागेल. राज्य सरकारच्या एक्साईज विभागाकडे अर्ज करून हा बियरबार परवाना मिळवता येतो.

बियर बार परवाना मिळविण्याची प्रक्रिया

  • बियर बार परवाना म्हणजेच बियर बार लायसन्स मिळविण्यासाठी  excise department म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अर्ज करणे आवश्यक
  • सर्वप्रथम तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या Excise ऑफिसमध्ये जावे लागेल.
  • त्या ऑफिसमध्ये बियर बार व्यवसाय परवान्यासाठी अर्ज मोफत मिळतो, तो घ्यावा. त्यामध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा.
  • तुमचे पासपोर्ट साईज दोन फोटो आणि एक कोर्ट स्टँप लावून अर्ज पूर्ण करा.
  • सोबत तुम्हाला काही पुढील कागदपत्रे जोडावी लागतील,
  • आधारकार्ड आणि पॅनकार्ड ची झेरॉक्स
  • रेशनकार्डची झेरॉक्स
  • मागील तीन वर्षांचा ITR रिपोर्ट
  • या सर्व कागदपत्रांसह तुम्ही भरलेला अर्ज तुमच्या जिल्हा पातळीवरील Excise ऑफिसमध्ये सबमीट करा. अर्जाची तपासणी करुन तुम्हाला परवान्यासंबंधी फोन केला जाईल. Beer Bar Licence application

बियर बार व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

बियर बार व्यवसाय करताना काही गोष्टींची आवश्यकता असते, त्या नेमक्या कोणत्या गोष्टी ते आपण पुढे पाहू. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत या गोष्टींची तपासणी केल्यानंतरच तुम्हाला बियर बार परवाना लागू केला जातो. 

  • बिअर बार व्यवसाय करण्यासाठी  800 ते 1000 स्क्वेअर फुट जागा आवश्यक असते.
  • बियर बारमध्ये विविध पेये बनवण्यासाठी आवश्यक मशीन्स खरेदी कराव्या लागतात.
  • तुमच्या व्यवसायासाठीचा जीएसटी क्रमांक लागेल.
  • मॅनेजर पासून वेटर, डिश वॉशर, स्टोअर कीपर इत्यादी कामांसाठी तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते
  • बियर थंड असते त्यामुळे मोठ मोठे रेफ्रिजरेटर तुम्ही खरेदी करणे गरजेचे असते.