Atal Bamboo Yojana 2023 बांबू लागवडीसाठी मिळवा 80% शासकीय अनुदान!

Atal Bamboo Yojana 2023

Atal Bamboo Yojana 2023 महाराष्ट्र राज्य वन विभागांतर्गत सुरु करण्यात आलेली अटल बांबू समृद्धी योजना ग्रामिण भागातील रहिवाश्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला बांबू लागवडीसाठी 80% अनुदान शासनाकडून देण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना पारंपरिक शेती व्यतीरिक्त दुसरा रोजगार प्राप्त व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केली आहे.

अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या निवडीबाबतचे निकष

शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  • शेतीचा गाव नमूना 7/12, गाव नमूना आठ, गाव नकाशाची प्रत सादर करावी
  • ग्राम पंचायत/नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या कडून मान्यता प्राप्त असलेला रहिवासाचा दाखला  
  • बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असतांना डूकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय असल्याबाबतचे हमीपत्र.
  • बँक खात्याचा अकाऊंट डिटेल्स व पासबुकची प्रत सादर करणे
  • ज्या बँक खात्यात अनुदान अपेक्षित आहे त्या बँकेच्या धनादेशाची छायांकित प्रत.
  • शेतामध्ये विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे हमीपत्र सादर करावे.
  • शासनाकडे जमिनीचा नकाशा सादर करताना ज्या शेतजमिनीवर किंवा शेताच्या बांधावर बांबू लागवड करायची आहे ते ठिकाण नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.

अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि मतदार कार्ड
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • आर्जदाराच्या शेतीचा सातबारा
  • अर्जदाराच्या जमिनीचा नकाशा
  • 8 अ उतारा
  • अर्जदाराचे बँक पासबुक व अकाऊंट डिटेल्स
  • आर्जदाराचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • शेतामध्ये विहीर, शेततळे, बोर असेल तर संबंधीत प्रमाणपत्र

अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही महाराष्ट्र शासन वन विभागाच्या संकेतस्थाळाला भेट देऊ शकता

https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php

  • वेबसाईटच्या होमपेज वर Bamboo Board मध्ये Bamboo Application वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिनसाठी विचारण्यात येईल.
  • तुमचे नाव, ईमेलआयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करा आणि लॉगिन आयडी मिळवा.
  • लॉगिन युझरनेम आणि पासवर्ड सेट करा. आणि परत लॉगिन करा.
  • तुमच्यासमोर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली संपूर्ण माहिती भरा तसेच विचारण्यात आलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • माहिती भरून झाल्यानंतर Submit बटनावर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतर काय करावे?

  • तुम्ही अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज मान्य करण्यात आला आणि तुमची  लाभार्थी म्हणून निवड झाल्यास संबंधीत महाराष्ट्र शासन बांबू विकास मंडळाकडून निवडी बाबतचे पत्र तुम्हाला देण्यात येईल.
  • लाभार्थ्याने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने ठरवून दिलेल्या रोप वाटिकेतून बांबूच्या रोपांची खरेदी करून लागवड करणे आवश्यक आहे.
  • बांबूच्या रोपांची लागवड केल्यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे योजनेच्या 80% अनुदानाची लेखी मागणी करावी.
  • महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि वन विभागाकडून लागवडीच्या पाहणीसाठी अधिकारी भेट देतील.
  • पाहणी झाल्यानंतरच तुम्हाला अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये नमूद केल्या प्रमाणे 80% अनुदान दिले जाईल.

बांबूचा उपयोग आणि योजना सुरु करण्यामागचा शासनाचा हेतू जाणून घेऊ

महाराष्ट्रातील एकूण सगळ्याच जिल्ह्यातील ग्रामिण भागातील जमीन ही बांबू लागवडीसाठी उत्तम असल्याचे कृषी तज्ञ सांगतात. बांबू या वनस्पतीच्या कोंबापासून ते पानांपर्यत 26 मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, बांबूच्या कोंबापासून लोणचे बनवले जाते. भाजी बनवली जाते. लाकूड, पडदे, फर्निचर, अगरबत्ती, कापड, उर्जा म्हणजेच CNG, Ethanol, Charcoal इत्यादी इंधने बनवता येतात.  बांबूचा कच्चा माल उपलब्ध होण्याकरिता शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठया प्रमाणावर बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित  करणे व  पर्यावरण पूरक प्रकल्प राज्यभर सुरु करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू आहे.