Bank Cheque Signature Rules:  चेकच्या मागच्या बाजूस बँका सही का घेतात? कारण जाणून घ्या आणि नुकसान टाळा

Bank Cheque Signature Rules

Bank Cheque Signature Rules: सध्या कॅशने केले जाणारे व्यवहार कमी झाले असले तरी अनेक ठिकाणी चेकच्या स्वरुपातच व्यवहार केले जातात.  डिजिटल पेमेंट करणे सध्या सर्वांनाच सोयीचे झालेले आहे, परंतु शाळेती फी, सोसायटीचे मेंटेनन्स, कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार अशा बऱ्याच ठिकाणी आजही चेक काढले जातात. याचे कारण  चेकने केलेला व्यवहार हा नेहमीच सुरक्षित समजला जातो.

परंतु अनेकांना  बँकेच्या चेकबुक संदर्भात असलेले नियम माहितीच नसतात. अशावेळी आर्थिक फसवणूकीला देखील सामोरे जावे लागते. बँकेच्या चेकबुक संदर्भातील नियम प्रत्येक खातेदाराला माहिती असले पाहिजेत. चेक कसा भरावा इथ पासून ते बँकेच्या चेकवर सही कुठे करावी? इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियम ठरलेले आहेत.  रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकेतील चेकबुक आणि चेक भरण्यासंदर्भात काही नियम तयार केलेल आहेत. जे बँकेचे व्यवहार करतात त्यांना तर नक्कीच  हे नियम माहित असणे गरजेचे असते.  बरेचदा चेकच्या मागच्या बाजूस खातेधारकाला सही करावी लागते? याबाबत बँकेचा काय नियम आहे याबाबत आज आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळवणार आहोत.  Bank Cheque Signature Rules

बँकेचा चेक म्हणजे काय?

एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्फर करण्यासाठी किंवा स्वतःच्याच खात्यातून पैसे काढण्यासाठीची लेखी हमी म्हणजे बँकेचा चेक असतो.  तो खातेदाराकडून बँकेसाठीचा लेखी आदेश असतो.

Bank Cheque Signature Rules चेकच्या मागील बाजूस सही करण्याचे कारण..

        बँकेचा चेक आणि त्यावरील रक्कम ही अत्यंत महत्त्वाची गोष्टी असते. या दोन्ही गोष्टींमुळे आर्थिक व्यवहार होणार असतो. बँका चेकच्या मागील बाजूस सही करण्यास सांगतात  याचे कारण आपण पुढील माहितीत पाहणार आहोत.

कोणत्या चेकच्या मागे खातेधारकाची सही असावी लागते?

बेअरर  चेकच्या मागच्या बाजूस खातेधारकाची सही असावी असा नियम आहे. याचे कारण बेअरर चेक म्हणजे जो बँकेत जमा केला जातो आणि त्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. या अशा चेकच्या मदतीने कोणीही बँकेतून पैसे सहज काढू शकतो.

खाते धारकाच्या मंजूरीने म्हणजेच सहीने इश्यू केलेल बेअरर चेक बँक तत्काळ मान्य करते. तसेच सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे  या अशा चेकमुळे झालेल्या फसवणुकीला बँक जबाबदार नसते. एकंदरीत प्रत्येक चेकवर मागच्या बाजूला सही करण्याची गरज नसते. बँकेत केवळ आणि केवळ बेरर चेकच्याच मागच्या बाजूस सही करण्याची गरज असते.  Bank Cheque Signature Rules

फसवणूक टाळण्यासाठी करा चेकच्या मागच्या बाजूस सही

केवळ बेअरर चेकच्या मागच्या बाजूस खाते धारकाची सही असावी असा नियम आहे. कारण एखाद्या वेळेस फसवणूक होणारच असेल तर अशा वेळेला चेकच्या मागील बाजूला करण्यात आलेली सही मुळे ही फसवणूक टाळता येते.  बँकेच्या नियमामुळे अशा प्रकारे खातेधारकाला आर्थिक फसवणूकीपासून वाचवता येते.  यातून फसवेगिरी रोखता येते.

बँकेचा चेक लिहिताना कायम लक्षात ठेवण्या सारखे महत्त्वाचे मुद्दे.

बँकेत एखाद्या रकमेचा चेक द्यायचा असेल किंवा आपल्याला बँकेतून चेकच्या माध्यमातून पैसे काढायचे असतील तेव्हा रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चेक भरला जाणे गरजेचे असते.  नाहीतर चेक बँकेकडून नाकारला जाऊ शकतो. म्हणूनच आपण इथे जाणून घेणार आहोत की बँकेचा चेक  लिहिताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या असतात.

  • चेकच्या वरच्या  बाजूस डाव्या कोपर्‍यात, ‘OR BEARER’ शब्द हटवा आणि ‘A/C Payee’ शब्द लिहा. तसे केल्यास बँकेस कळते की,  ज्या व्यक्तीच्या नावाने चेक काढलेला आहे त्या व्यक्तीशिवाय इतर कोणालाही  चेकमध्ये नमूद केलेली रक्कम दिली जाऊ नये.
  • प्राप्तकर्त्याचे नाव किंवा प्राप्तकर्त्याचे नाव आणि आडनाव या शब्दांमध्ये जास्त मोकळी जागा सोडू नये.
  • चेकमधील रक्कम शब्दात लिहिल्यानंतर ‘Rupee’ स्तंभाच्या शेवटी ‘/-‘ हे चिन्ह वापरावे.
  • चेक भरताना ओव्हरराईटिंग किंवा खाडाखोड करु नये.  

चेकमध्ये  योग्य तारीख भरणे आवश्यक असते.