Land Map Online: जमिनीचा नकाशा ऑनलाईन डाऊनलोड करा, त्यासाठी या स्टेप फॉलो करा

Land Map Online

Land Map Online: शेतकऱ्यांना करिता शेतजमीन जितकी महत्वाची आहे तितकीच कागदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. सातबारा उतारा, 8अ उतारा तसेच फेरफार उतारे आणि जमिनीचा नकाशा फार महत्त्वाचे दस्तावेज आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या माराव्या लागतात. यामध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्हीही जातो. आता ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळतात.

जर तुम्ही शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर तुम्हाला अनेक कामांसाठी जमिनीचा नकाशा लागतो. जमिनीचा नकाशा शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी कुठे सरकारी कार्यालयात किंवा कुठेही बाहेर हेलपाटे मारावे लागणार नाहीत. हे काम तुम्ही अगदी ऑनलाईन घरबसल्या मोबाईलवर करू शकता. अलीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सरकारी कामे जलद गतीने होऊ लागले आहेत.

Land Map Online Maharashtra
सामान्य जनतेच्या सोयीसाठी आवश्यक कागदपत्रे आता ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांना आता सातबारा उतारा, गाव 8अ, नमुना नंबर आठ अ, यासारखे उतारे ऑनलाईन उपलब्ध करून दिली जात आहे.

अनेकांना शेत रस्त्याची अडचण असते. त्यामुळे रस्त्याचा मार्ग काढण्यासाठी जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतो. जमिनीचा नकाशा द्वारे तुम्ही जमिनीच्या हद्दी जाणून घेऊ शकतो. आता सरकारने सातबारा आणि 8अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

How to Check Land Map in Maharashtra Online
जमिनीचा नकाशा प्रत्येक शेतकऱ्यांकडे असणं आवश्यक आहे. जर आपण जमिनीचा विचार केला तर बऱ्याचदा जमिनीच्या हद्दी, बांध तसेच शेत रस्ते इत्यादी वरून वादविवाद उद्भवतात. अशावेळी जितका सातबारा व 8 अ महत्वाचा आहे, तितकाच जमिनीचा नकाशा महत्वाचा आहे.

जमिनीच्या बाबतीत शासनाने अनेक कामे ऑनलाईन केली आहेत. यामध्ये राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तुम्ही सर्व जमिनीची कागदपत्रे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. आपण या लेखात जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा?
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागेल.
या ओपन झालेल्या नवीन पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा एक कॉलम दिसतो. या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचं राज्य आणि कॅटेगिरी यामध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला रुरल जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडाय आणि सगळ्यात शेवटी Village map वर क्लिक करा. Village Map वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होईल.

गुगल पे वर तुमचा सिबील स्कोअर 2 मिनिटात चेक करा


त्यानंतर होम या पर्यायासमोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकतात. त्यानंतर डावीकडे असणाऱ्या अधिक (+) आणि वजा (-) या बटनावर क्लिक केले की नकाशा मोठा किंवा छोटा आकारात तुम्हाला पाहता येतो.

आता जमिनीचा नकाशा कशाप्रकारे काढायचा जाणून घेऊया.. (Land Map Online)
वर दिलेल्या साईटच्या पेजवर Search by Plot Number या नावाचा एक कॉलम त्या ठिकाणी दिसेल.
या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाका.
गट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा त्याठिकाणी ओपन होऊन जाईल.
नकाशा ओपन झाल्यानंतर डावीकडे Plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला दिसून जाईल.


संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय असतो. यावर तुम्ही क्लिक केले की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्या समोर ओपन होतो. त्यानंतर उजवीकडील खाली दिशा असलेल्या पानावर क्लिक केले की तुम्ही तो नकाशा Download करू शकतात.

Land Map तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक त्याखालीच दिसतात. जसे की 222 या गटाशेजारी 223, 224, 225, 226, 227, 228 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात. तसेच खालच्या भागात या गट नकाशात कोण-कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल.