Bad CIBIL LIC Policy Loan 2024: आयुष्यात अनेक वेळा आपल्या सर्वांना पैशाची अचानक आणि तातडीची गरज भासते, परंतु त्या गरजेच्या आणि अडचणीच्या वेळेला आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे आपण हतबल होतो आणि वेगवेगळ्या मार्गांनी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू करतो. आपण पैसे मिळविण्याचे एक ना अनेक मार्ग शोधत असतो, त्यापैकी एक म्हणजे ज्याद्वारे आपल्याला कर्ज मिळते. मग वेगवेगळ्या ठिकाणाहून असेल, जसे की बँका किंवा वित्तीय संस्थांकडून आपण कर्ज घेऊ शकतो, किंवा आपण सावकाराकडून देखील कर्ज घेतो. पण काही वेळेस कर्ज घेताना प्रश्न येतो तो म्हणजे CIBIL स्कोअरचा. पण आज आम्ही तुम्हाला अशा कर्जाबद्दल सांगणार आहोत, जे घेण्यासाठी आपल्याला चांगला CIBIL स्कोर असणे आवश्यक नाही. Bad CIBIL LIC Policy Loan 2024
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण, तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC द्वारे कर्ज (Bad CIBIL LIC Policy Loan 2024) देखील घेऊ शकता आणि हे कर्ज घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोर चांगला आहे की नाही ह्याला फार काही महत्त्व नाही. जवळपास आपल्या सर्वांकडेच भारतीय आयुर्विमा महामंडळाची म्हणजेच LIC ची पॉलिसी आहे, आणि ही LIC पॉलिसी पॉलिसीधारकाला क्रेडिट सुविधा देखील प्रदान करते.
जर तुम्हाला कधी तातडीची आर्थिक मदत हवी असेल तर अशा आर्थिक संकटाच्या वेळी तुम्ही एलआयसी इन्शुरन्सद्वारेही कर्ज घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणाहून वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्हाला व्याजदर जास्त द्यावा लागेल, मात्र जर तुम्ही एलआयसी पॉलिसी अंतर्गत कर्ज घेतले असेल तर इतर तुम्हाला कर्जाच्या तुलनेत खूपच कमी व्याजदर द्यावा लागेल. तर आता आपण जाणून घेऊया की LIC पॉलिसी अंतर्गत कर्ज घेण्याचे नियम काय आहेत?
हे आहेत एलआयसी पॉलिसी अंतर्गत कर्ज घेण्याचे महत्त्वाचे नियम | Bad CIBIL LIC Policy Loan 2024
• जर तुम्ही एलआयसी विम्याअंतर्गत कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ते कर्ज फक्त पारंपारिक पॉलिसी आणि एंडोमेंट पॉलिसीद्वारेच मिळवू शकणार आहात.
• LIC विम्यांतर्गत तुम्हाला दिली गेलेली कर्जाची रक्कम ही तुम्ही LIC विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमच्या अमाऊंट वर किंवा एक रकमी विमा पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर अवलंबून असणार आहे. कर्ज हे LIC पॉलिसीच्या एकूण सरेंडर मूल्याच्या 80% ते 90% पर्यंत मिळते.
• LIC पॉलिसी अंतर्गत देण्यात येत असलेल्या कर्जावरील व्याज दर हा 9 टक्के एवढा असतो. कर्जाची रक्कम अनेकदा पॉलिसीधारकाच्या प्रोफाइलवरही अवलंबून असते.
एलआयसी कर्ज घेण्यासाठीचे महत्त्वाचे नियम (Bad CIBIL LIC Policy Loan 2024)
• ज्यावेळी पॉलिसीधारक हा त्याच्या LIC पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो, तेव्हा कंपनीकडून त्याच्या पॉलिसीचे बाँड गहाण ठेवले जातात.
• समजा आता तुम्ही तुमच्या पॉलिसीवर कर्ज घेतले आहे आणि रकमेची परतफेड करण्यापूर्वीच पॉलिसी लॅप्स झाली आहे. तर त्यानंतर कंपनी कर्जाची रक्कम आणि व्याज पॉलिसीच्या एकूण रकमेतून वजा करते.
एलआयसी पॉलिसी अंतर्गत कर्जासाठी अर्ज कसा करावा? Bad CIBIL LIC Policy Loan 2024
तुम्ही पॉलिसी कर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा | Apply in online mode.
तुम्हाला कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास, तुम्ही LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, LIC ई-सेवांवर नोंदणी करून आणि तुमच्या खात्यात लॉग इन करून कर्जासाठी अर्ज करू शकता.
ऑफलाइन मोडमध्ये अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा | Apply in offline mode.
जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता. कर्जासाठी अर्ज करताना, KYC साठी काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील, जसे की तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि विमा कागदपत्रे, त्यामुळे ही कागदपत्रे आठवणीने घेऊन जा. Bad CIBIL LIC Policy Loan 2024