Good Cibil score: सिबिल स्कोअर चांगला राखण्यासाठी असा करा क्रेडिट कार्डचा वापर!

Good Cibil score

Good Cibil score सध्या आपले जीवनमान असे झाले आहे की, क्रेडिट कार्डशिवाय कोणाची खरेदीच होत नाही. सध्याच्या नव्या पिढीला तर याची इतकी सवय झालीय की त्यांचे सगळ्याच गोष्टी या क्रेडिट कार्डवर विसंबून असतात. परंतू अनेकांना या क्रेडिट कार्डच्या खर्चाचे किंबहून त्याच्या बिलाचे नेमके नियोजन कसे करावे हेच माहित नसते. 

सध्या क्रेडिट कार्ड फक्त शहरातल्या लोकांपुरते मर्यादित राहिलेले नसून ग्रामीण भागातही त्याचा वापर वाढला आहे. याआधी म्हणजे 7-8 वर्षांपुर्वी  लोक मोठ्या व्यवहारांसाठी किंवा कंपनीच्या डीलसाठी क्रेडिट कार्ड वापरत असत, परंतु आता तसे राहिलेले नाही.  प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर  सर्रास केला जातो.  How to use credit card?

क्रेडिट कार्डचा वापर का वाढला आहे? Benefits of credit card

क्रेडिट कार्ड कंपन्यांनी अगदी हुशारीने या क्रेडिट कार्डची सवय तरुण पिढीला लावलेली आहे. क्रेडिट कार्डने व्यवहार केल्याने वापरकर्त्याला रिवॉर्ड पॉइंट (Reward Points) मिळतात, ज्याचा वापर करून तुम्ही काही कॅशबॅक (Cashback) म्हणजेच एखाद्या खरेदीवर खरेदी केलेले पैसे परत मिळवू शकता किंवा शॉपिंग व्हाउचर देखील मिळवता येते. म्हणूनच सध्या लोक क्रेडिट कार्डचा अधिकाधिक वापर करताना दिसतात. बरेचदा लोक क्रेडिट कार्डचं संपूर्ण लिमिटही संपवतात.

Good Cibil score काय असतं क्रेडिट लिमिट कसे जपणे महत्त्वाचे

क्रेडिट कार्ड हे एकप्रकारचं लोन असते. आपण एखाद्या बँकेकडून पैसे घेऊन ते खर्च करतो आणि नंतर ते फेडतो. प्रत्येक क्रेडिट कार्डावर तुम्हाला क्रेडिट स्कोअरनुसार एक लिमिट दिले जाते. त्या लिमिटपेक्षा तुम्ही अधिक  वापर केल्यास तुम्ही वापरलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याज लावले जाते.

क्रेडिट कार्ड वापराचा आलेख

चांगल्या क्रेडिट स्कोअर म्हणजेच सिबिल स्कोअर cibil score  ठेवण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डच्या वापराचा आलेख म्हणजेच  CUR हा 30-40 टक्के ठेवावा. जर का हा आलेख 50 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर त्याकडे नकारात्मकतेने पाहिले जाते.  आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळविण्यासाठी अडचण येऊ शकते  किंवा कर्जावर जास्त व्याज द्यावं लागू शकते. जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा क्रेडीट कार्ड वापाचा आलोख म्हणजेच CUR –  क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो देखील पाहिला जातो.

कसा मोजाल सीयुआर?

क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो म्हणजेच CUR मोजण्यासाठी क्रेडिट कार्डची एकूण देय रक्कम एकूण कार्डच्या लिमिटने विभागावी लागते. त्यानंतर आलेल्या संख्येला १०० ने गुणाकार करावा. या सूत्राद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या CUR ची संख्या मिळवू शकता.

क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 50% पर्यंत वापरा

क्रेडिट कार्ड  मर्यादेच्या फक्त 50 टक्के वापरल्याने खर्च नियंत्रणात ठेवण्याची सवय लागते. तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 50,000/- रुपये असेल, तर कमाल थकबाकी फक्त 25 हजारांपर्यंत ठेवा. यामुळे तुमचा CIBIL स्कोर चांगला  राहील. त्यापेक्षा जास्त थकबाकी असल्यास तुमचे CIBIL स्कोअर कमी होऊ शकतो.

देय तारखेपूर्वी क्रेडिट कार्डचे बिल भरा

क्रेडिट कार्डचा वापर करावा परंतु तो स्मार्ट पद्धतीने करावा लागतो. क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी 50 दिवस मिळतात. त्यामुळे क्रेडिट कार्डचे पेमेंट कधीच बॅलन्स ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत देय तारखेपूर्वी बिल जमा केल्यास क्रेडिट कार्ड धारकाला त्याचा फायदाच होत असतो.  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेच्या आधीच क्रेडिट कार्डचे बिल भरल्याने तुम्ही कंपनीच्या व्याज आणि अतिरिक्त दरापासून वाचता. आणि अशी परिस्थिती उद्भवली की तुम्ही पूर्ण पेमेंट करू शकत नाही आहात यावेळी किमान दंड टाळण्यासाठी शिल्लक रक्कम तरी भरणे अनिवार्य आहे.

क्रेडिट कार्डसंबंधीत महत्त्वाचा तपशील अनोखळी व्यक्तींना शेअर करणे टाळा

डिजिटल फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड नंबर, तसेच सीव्हीव्ही नंबर,  सिक्युरिटी पिन नंबर, एक्सपायरी डेट  यासारखी माहिती कोणाही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. ही माहिती एखाद्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यास  क्रेडिट कार्डच्या मदतीने मोठा व्यवहार केला जाऊ शकतो, त्यामुळे क्रेडिट कार्ड संबंधिक माहिती गुप्त ठेवा म्हणजेच केवळ तुमच्यापुरतीच ठेवा. तुमच्या क्रेडिट कार्डवरून दुसरी कोणी व्यक्ती खर्च करत असेल तर त्याचा परिणाम शेवटी तुमच्या cibil score वरच होणार असतो.