Digitally Signed Satbara:  ऑनलाइन सातबारा उतारा कसा काढायचा? मोबाईल नंबर वापरून सातबारा कसा काढायचा?

Digitally Signed Satbara

Digitally Signed Satbara: जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार असो किंवा शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून अनुदान मिळवायचे असो जमीनीचा सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधी आपल्याला जमिनीचा हा अत्यंत महत्त्वाचा हस्तावेज मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असत. परंतु भारतात सगळीकडे डिजिटल क्रांती उदयास येत असताना आता जमिनीसंबंधीत सर्व कागदपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने मिळविणे सोपे झाले आहे.   तसेच डिजिटल सही असलेला सातबारा उतारा मिळविणे देखील आता तितकेचे कठिण राहिलेले नाही. अगदी काही सेकंदातच तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरच्या मदतीने डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 तारा ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळवू शकता. याबद्दल सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आजच डिजिटल स्वाक्षरी असलेला तुमच्या जमिनीचा सातबरा उतारा ऑनलाईन पद्धतीने मिळवा.  digital 7/12 download

असा मिळवा तुमचा डिजिटल सहीचा सातबारा उतारा

  • डिजिटल सहीचा सातबारा मिळविण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in ही लिंक गुगलवर सर्च करा
  • सर्च केल्यानंतर  महाराष्ट्र राज्य महसूल विभागाची वेबसाइट तुमच्या स्क्रिनवर ओपन होईल.
  • सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही वेबसाईटवर तुमच्या नावाने रजीस्ट्रेशन करुन लॉगिन आयडी मिळवा.
  • नंतर परत तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल तो योग्य रितीने भरल्यानंतर तुम्ही वेबसाईटच्या मुख्य पानावर येता.
  • वेबसाइटच्या उजव्या बाजूला तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी 7/12 पाहण्यासाठी येथे क्लिक करा किंवा Digitally Signed 7/12 असे पर्याय दिसतील  त्यावर क्लिक करा.
  • तुम्हा या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने देखील लॉगीन करु शकता.  त्यासाठी तुम्हाला OTP Based Login पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवप OTP प्राप्त होईल तो समोरील रकान्यात भरा.
  • त्यानंतर  एक ‘आपला सातबारा’ असे एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल. त्यावर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी 7/12, डिजिटल स्वाक्षरी 8A, डिजिटल स्वाक्षरी मालमत्ता कार्ड, टॉप अप खाते, पेमेंट इतिहास, पेमेंट स्थिती असे विविध पर्याय दिसतील. त्यातील Digitally signed 7/12 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  तुमच्यासमोर “डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा” नावाचे पान उघडेल. आणि समोर एक सुचना दिसेल,  डाउनलोड केलेल्या प्रत्येक सातबारासाठी 15 रुपये शुल्क आकारले जाईल. ही रक्कम उपलब्ध शिल्लकमधून वजा केली जाईल. हे वाक्य इंग्लिश मध्ये लिहलेले असेल.
  • त्यासाठी आधी तुहाला खात्यात पैसे जमा करणे आवश्यक आहे. नंतर तुमची नवीन नोंदणी पूर्ण करा.
  • वेबसाईटच्या खात्यात पैसे जमा करण्याचे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट, नेट बँकिंग किंवा BHIM UP च्या मदतीने पैसे भरु शकता.
  • त्यानंतर डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा मिळविण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरा.
  • येथे तुम्हाला जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे आहे. तुमच्या जमिनीचा सर्वेक्षण किंवा गट क्रमांक टाका.
  • त्यानंतर तुम्हाला डाउनलोड पर्याय येईल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावर डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा PDF स्वरुपात डाऊनलोड होईल.
  • या सातबारा उताऱ्यावर  लिहिलेले असते  की, हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केलेला असल्याने त्यावर शिक्का सही मारण्याची गरज नाही. Digitally signed Satbara Maharashtra

जमिनीवर स्वतःची मालकी सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते? जाणून घ्या!

एखादी जमीन शेतजमीन असो किंवा बिगरशेतजमीन ती स्वतःच्या मालकीची आहे हे सिद्ध करणारे कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या जमिनीचे मालक असलात तरी शासकीय नियमानुसार तसे मानले जाणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे एखादी जमीन तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे हे सिद्ध करणारे पुरावे तुम्ही सादर करीत नाही. मग हे नेमके कोणकोणते पुरावे आहेत ते आपण पुढे पाहू. Digitally Signed Satbara

  1. जमिनीचा सातबारा उतारा
  2. जमिनीचे खरेदी खत
  3. जमिनीचा 8 अ उतारा
  4. जमिन मोजणीचा नकाशा
  5. जमिन महसूल भरलेल्या पावत्या
  6. प्रॉपर्टी कार्ड
  7. जमिनीसंबंधीत काही खटले सुरु असतील तर त्याचे दस्तावेज

1 thought on “Digitally Signed Satbara:  ऑनलाइन सातबारा उतारा कसा काढायचा? मोबाईल नंबर वापरून सातबारा कसा काढायचा?”

Comments are closed.