Google Maps Features: नव्या वर्षात गुगल मॅपमध्ये बदल होणार असून काही फीचर बंद होणार आहे.

Google Maps:  गुगल मॅप हे आज प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्यात मोबाईलमध्ये असणारे ऍप आहे. या ऍपचे अनेक फायदे आहेत. त्यामुळेच हे जगभरातील प्रत्येकाच्यात मोबाईलमध्ये दिसून येते.

परंतु आता नव्या वर्षात गुगल मॅप अॅपमध्ये- Google Map मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.  कदाचीत याचा  फटका कार चालकांना बसू शकतो. गुगल कंपनीने   2020 मध्ये एक घोषणा केली होती की, Google Maps चे असिस्टंट ड्रायव्हिंग मोड -Assistant Driving Mode हे वैशिष्ट्य बंद करण्यात येणार आहे. जवळपास 4 वर्षानंतर गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हींग फीचर बंद करीत आहे. Google Map असिस्टंट ड्रायव्हिंग मोड हे फिचर फेब्रुवारी 2024 मध्ये बंद होईल. पण हे एक वैशिष्ट्य बंद होत असले करी गुगल नव्या वैशिष्ट्यांची भर घालणार आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे म्हणजे गुगल मॅपच्या वापराने कारचालक पेट्रोल किंवा डिझेलची बचत करु शकणार आहेत. या बद्दल अधिक माहिती घेऊया या लेखाच्या माध्यमातून.

गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचर का आहे खास?

गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरमुळे फोनमध्ये एक डॅशबोर्ड मिळते. यामध्ये वापरकर्त्यांना मीडिया सजेशन, ऑडिओ कंट्रोल आणि मॅप ही वैशिष्ट्ये मिळतात.  असिस्टेड ड्रायव्‍हिंग मोड Android Auto ने बदलता येईल.  Android Auto हे गुगलचेच एक प्रोडक्ट आहे, जे  खास कार चालकांसाठी बनविण्यात आले आहे. कारच्या एंटरटेन्मेंट बोर्डला हे अँड्रॉइड ऍप कनेक्ट सुद्धा करता येणार आहे.  Google Maps Features

गुगल मॅपला मिळणार नवीन यूजर इंटरफेस

Google कडून आलेल्या माहितीनुसार Google Map या ऍपला लवकरच एक नवीन इंटरफेस मिळणार आहे. गुगल मॅप मध्ये आतापर्यंत असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरमध्ये प्ले होत असलेल्या मीडियाची माहिती, नकाशे आणि स्ट्रीमिंग अॅप्सची माहिती दिली जाते. यानंतर पुढे  अँड्रॉईड युजर्स कार चालकांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच गुगल मॅपला नवीन यूजर इंटरफेस मिळेल. Google Maps Features

Google Maps  आता पेट्रोल, डिझेलची बचत करणार

खाजगी गाड्या म्हणजेच स्वत:च्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सचे इंधन बचतीचे फिचर  अत्यंत उपयोगाचं ठरणार आहे. हे मॅप वैशिष्ट्य आतापर्यंत जागातील काही मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले होते.  आता लवकरच गुगलच्या माध्यमातून भारतीय चालकांसाठी देखील  फिचर अॅपमध्ये अॅड करण्यात येणार आहे.

या नव्या फीचरचे नाव आहे फ्यूल सेव्हिंग फीचर fuel saving features. ज्यांची स्वतःची वाहने आहेत त्यांना प्रवास करण्यासाठी गुगल मॅप्सचे इंधन बचतीबाबतचे वैशिष्ट्य – फिचर खूप जास्त उपयोगी  ठरणार आहे. Google Maps Features

गुगल मॅप्स फ्यूल सेव्हिंग फीचर सुरु करण्याची प्रक्रिया  – How to start  Google maps fuel saving features?

  • सर्वात आधी फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा, त्यानंतर तुमच्या प्रोफाईल पिक्चर किंवा अॅपमध्ये दिसणाऱ्या सुरुवातीच्या (तुमच्या नावाचं आणि आडनावाचं पहिलं अक्षर) टॅप करा.
  • पुढे सेटिंग्जमध्ये जाऊन नेव्हिगेशन पर्यायावर क्लिक करा.
  • नेव्हिगेशन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रूट ऑप्शनवर जावे लागणार आहे. त्यामुळे  त्यानंतर Prefer fuel-efficient routes वर क्लिक करा आणि Google maps fuel saving features हे फीचर ऑन करा.
  • यानंतर इंजिन प्रकारावर क्लिक करून दिलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडा.

Google Maps Features गुगल मॅपची वैशिष्ट्ये

  • गुगल मॅप वापरकर्त्यांना विशिष्ट शहरांचे नकाशे डाउनलोड करण्याची सुविधा देतो.  एखाद्या व्यक्तीला प्रवास करण्यापूर्वी ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवता येतो. आणि त्याची आवश्यकता नसल्यास नंतर डिलीटही करता येतो.
  • Google Map वाहन आणि रहदारीच्या परिस्थितीनुसार वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम मार्ग ऑटोमेटिक पद्धतीने काढून देते,
  • तुम्ही ज्या वाहनाने प्रवास करीत असाल त्या वाहनाचा सिंम्बॉल निवडून तुमच्या प्रवासाची दिशा आणि वेळ ठरवू शकता.
  • Google Mapच्या मदतीने ट्रॅफिकची संपूर्ण माहिती देऊन वाहन चालकाचा वेळ वाचवला जातो.