Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयामध्ये 4629 जागांसाठी भरती, 1 लाख रुपये पगार

Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी जॉब ऑफर आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय विविध रिक्त पदे भरण्यासाठी नोकर भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई मधील उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन इच्छुक व पात्र उमेदवारांनी लगेच आपला अर्ज सादर करावा. या संधीचे सोने करून तुम्ही नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

मुंबई उच्च न्यायालय येथे सुरु असलेल्या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. ममहाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये तब्बल 4629 रिक्त पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचावी. तसेच आम्ही दिलेली माहिती संपूर्ण वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा. जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. या लेखात पदाचे नाव, एकूण रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, अर्जाची पद्धत व तारीख, वयाची अट, अर्जासाठी फी, निवड प्रक्रिया याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या भरती बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Bombay High Court Bharti 2023

भरती संबंधित माहिती :- ही भरती मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

पदाचे नाव (Post Name)
वरील भरती अंतर्गत शिपाई, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखकाच्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण रिक्त जागा (Total Vaccancy)
ही नोकर भरती एकूण 4,629 रिक्त पदे भरण्यासाठी केली जाणार आहे.

1) शिपाई : 1,266 जागा
2) कनिष्ठ लिपिक : 2,795 जागा
3) लघुलेखक : 568. जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
पदांनुसार शैक्षणिक पात्रता आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात कळजीपूर्वक वाचावी.

एवढा पगार मिळणार (Salary)
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार पगार मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये ते 1,22,800 रुपयांपर्यंत पगार मिळेल.

अर्ज पद्धती (Apply Online)
या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Date)
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर दुसरी संधी दिली जाणार नाही, अशी सूचना देण्यात आलेली आहे.

वयाची अट (Age Limit)
मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असणं आवश्यक आहे.
तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्जासाठी फी (Application Fees)
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
तर, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 900 रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया (Selection Process)
भरतीसाठी निवड होण्यासाठी, उमेदवारांना स्क्रीनिंग चाचणी, टायपिंग चाचणी आणि मुलाखत यातून जावे लागेल. निवड प्रक्रियेचे टप्पे जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचावी.

भरती जाहिरात (Bombay High Court Notification)
या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरती कालावधी
या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची खूप मोठी संधी आहे.

मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या नोकर भरतीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. तुम्हाला देखील ही माहिती कळाली असेल. तसेच भरतीची जाहिरात नक्कीच काळजीपूर्वक संपूर्ण वाचावी. तुम्ही देखील पात्र असाल तर अर्ज करू शकता. या भरतीमुळे काही तरुणांना दिलासा मिळेल. तसेच तुमच्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करा.