Personal Loan Interest Rates : ‘या’ बॅंका देत आहेत सर्वात कमी व्याजदरात पर्सनल लोन; लगेच वाचा

Personal Loan Interest Rates

Personal Loan Interest Rates: अनेकदा जास्त पैशांची आवश्यकता असते. यासाठी लोक पर्सनल लोन घेत असतात. पण वैयक्तिक कर्जाच्या व्याजदर हे इतर कर्जापेक्षा जास्त असते. होम लोन, गोल्ड लोन, कार लोन या कर्जाचे व्याजदर कमी असते. परंतु, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे सर्वाधिक असते. त्यामुळे वैयक्तिक कर्ज तेव्हाच घेतले पाहिजे तेव्हा जास्त आवश्यकता व दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. अनेक बॅंका तुम्हाला वैयक्तिक कर्ज देतात. अशातच वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी बॅंकाच्या ऑफर बघून ज्या बॅंकेकडून चांगली ऑफर मिळत आहे, त्या बॅंकेकडून पर्सनल लोन घ्यावे.

जी बॅंक तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे, त्या बॅंकेकडून पर्सनल लोन (personal loan) घ्यावे. तसेच प्रक्रिया शुल्क किती याची माहिती देखील घेणं आवश्यक आहे. तसेच क्रेडिट स्कोअर कसा आहे, हे देखील तपासून घ्यावे. जितका क्रेडिट स्कोअर चांगला तितक्या कमी व्याजदरात कर्ज मिळते. या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला योग्य पद्धतीने कर्ज घेता येईल. तसेच आम्ही देखील तुम्हाला यामध्ये मदत करणार आहोत. यामध्ये आपण आज अश्या 5 बॅंकाबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बॅंका तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देत आहेत.

1) बॅंक ऑफ इंडिया personal loan व्याजदर
बॅंक ऑफ इंडिया चांगली बॅंक आहे. ही बॅंक तुम्हाला अनेक कर्ज देत असते. यामध्ये जर पाहिले तर Bank of India तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.25% किंवा त्याहून अधिक व्याजदर आकारते. (Bank of India Personal Loan interest) कर्जाची परतफेड करण्यासाठी ही बॅंक तुम्हाला 84 महिन्यांचा कालावधी देते. अशाप्रकारचा बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचा पर्सनल लोनचा व्याजदर आहे.

2) इंडसइंड बॅंक वैयक्तिक कर्ज व्याजदर
या बॅंकेची देखील व्याप्ती मोठी आहे. ही बॅंक देखील वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. या बॅंकेकडून 30 हजार किंवा त्याहून अधिक 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले तर 10.25 टक्के ते 32.02 टक्के व्याजदर देत आहे. (Indusind Bank Personal Loan Rate of Interest) याचा कालावधी 12 ते 60 महिन्यापर्यंत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही बॅंकेला भेट द्या.

3) बॅंक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज व्याजदर (Bank of Baroda Personal Loan interest rate)
बॅंक ऑफ बडोदा ही देखील विश्वासू बॅंक आहे. ही बॅंक तुम्हाला 50 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.35 टक्के ते 17.50 टक्के व्याजदर आकारते. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 48 ते 60 महिन्यापर्यंतचा कालावधी दिला जातो.

4) बॅंक ऑफ महाराष्ट्र personal loan interest rate
बॅंक ऑफ महाराष्ट्र ही देखील सरकारी बॅंक असून तुम्हाला वैयक्तिक कर्ज देते. (Bank of Maharashtra Personal Loan Interest Rate) या बॅंकेकडून 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदर देत आहे. यासाठी 84 महिन्यांचा कालावधी असेल. या बॅंकेकडून देखील तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता.

5) पंजाब आणि सिंध बँक वैयक्तिक कर्ज व्याजदर
पंजाब आणि सिंध बँक 3 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 12.80 टक्के व्याजदर देत आहे. यासाठी 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी आहे. (Panjab & Sind Bank Personal Loan Interest Rate) ही देखील विश्वासू बॅंक आहे. अधिक माहितीसाठी बॅंकेच्या शाखेला भेट द्या.

या काही बॅंका आहेत, ज्या तुम्हाला कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात. अशा अनेक बॅंका तुम्हाला कर्ज देतात. परंतु, आम्ही तुम्हाला सरकारी आणि विश्वासू बॅंकेच्या बाबत माहिती दिली. वैयक्तिक कर्जाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बॅंकेच्या शाखेला भेट द्या. परंतु, इतर कर्जापेक्षा पर्सनल लोनचे व्याजदर जास्त आहे, तुम्हाला या माहितीमध्ये दिसून आले असेल. त्यामुळे जेव्हा जास्त गरज असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्यावे.