Maha Food Bharti 2024 अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग (Maha Food) अंतर्गत पुरवठा निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनातर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरतीसाठी उमेदवारांना करावयाची अर्जप्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. जाहिरातीत दिल्याप्रमाणे उमेदवाराची पात्रता, कागदपत्रे, किती पदे रिक्त आहेत या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या लेखामध्ये मिळतील. तुम्ही पदवीधर असाल आणि तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये सेवा बजावण्याची आवड असेल तर हा संपूर्ण लेख वाचून आजच तुम्ही नोकरीसाठी अर्ज करा.
अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत कोणत्या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. Maha Food Bharti 2024
- पुरवठा निरीक्षक (गट-क)
- वरिष्ठ लिपिक (गट-क)
एकूण रिक्त पदे किती आहेत?
अन्न व नागरी पुरवठा विभागा अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या 345 असून जिल्हा निहाय ही रिक्त पदे देण्यात आली आहेत.
- पुरवठा निरिक्षक पदांची भरती
कोकण विभागात 47 पदे रिक्त आहेत
पुणे विभागात 82 पदे रिक्त आहेत
नाशिक विभागात 49 पदे रिक्त आहेत
छत्रपती संभाजीनगर विभागात 88 पदे रिक्त आहेत
अमरावती विभागात 35 पदे रिक्त आहेत
नागपूर विभागात 23 पदे रिक्त आहेत.
- उच्चस्तर लिपिक पदांची भरती
वित्तिय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई येथे 21 पदे रिक्त आहेत.
ही सर्व रिक्त पदे अन्न व नागरी पुरवठा विभाग महाभरती 2024 अंतर्गत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आजच अर्ज करा आणि तुमचे शासकीय नोकरीचे स्वप्न पुर्ण करा. Maha Food Bharti 2024
अर्जदाराची शैक्षणिक पात्रता काय असावी?
- पुरवठा निरीक्षक पदासाठी
अर्जदार भारताचा नागरिक असावा.
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण आणि कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय गटास 5 वर्षांची सुट देण्यात आली आहे.
अर्जदार कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीप्राप्त असावा.
अर्जदाराकडे अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान संबधीत पदवी असल्यास प्राधान्य
- वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
अर्जदार भारताचा नागरिक असावा.
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण आणि कमाल 38 वर्षे असावे. मागासवर्गीय गटास 5 वर्षांची सुट देण्यात आली आहे.
अर्जदार कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीप्राप्त असावा.
अन्न व नागरी पुरवठा विभागा अंतर्गत कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
- उमदेवाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि रेशनकार्ड
- ग्रॅज्युएशन पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- बोनाफाईड सर्टिफिकेट
अन्न व नागरी पुरवठा भरतीअंतर्गत अर्ज फी किती आहे?
- खुल आणि ओबीसी अर्जदारांना १००० रुपये फी भरुन अर्ज करता येईल
- मागासवर्गीय किंवा दिव्यांग आणि अनाथ अर्जदारांसाठी ९०० रुपये फी ठरवण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा भरतीअंतर्गत पदभरतीचे ठिकाण कुठे असेल?
अन्न व नागरी पुरवठा विभाग राज्य शासनाअतंर्गत या विभागाचा कारभर चालत असला तरी संपूर्ण महाराष्ट्रभर पदनियुक्ती करण्यात येणार आहे. Maha Food Bharti 2024
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीसंबंधीत महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात करण्याची तारीख १३ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत महाभरतीसाठी अर्ज करावयाचा असल्यास महत्त्वाच्या लिंक खालील प्रमाणे Maha Food Bharti 2024
भरतीसंबंधीत जाहिरात लिंक
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23
अन्न व नागरी पुरवठा विभागाची अधिकृत वेबसाईट
https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
या लेखाच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळवून तुम्ही आजच अन्न व नागरी पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या पदभरती साठी अर्ज दाखल करु शकता. शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 असल्याने तुम्हाला घाई करावी लागले. आजच अर्ज दाखल करा आणि शासकीय नोकरीचे स्वप्न पुर्ण करा.