SSC CGL Recruitment 2024: तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन अतंर्रगत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारच्या शासकीय विभागांमध्ये गट ब ते गट ड पर्यंत कर्मचारी भरती करणारी शासकीय संस्था आहे. थोडक्यात सांगायचेच झाले तर केंद्रीय कर्मचारी निवड आयोग असेही या विभागाला म्हटले जाते. यामार्फत निवड झालेले उमेदवार भारतातील विविध राज्यांमधील मंत्रालयातील विविध विभागांमध्ये, शासकीय संस्थांमध्ये कर्मचारी म्हणून नियुक्त केले जातात. तुम्ही देखील अशा पद्धतीच्या शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. तुमच्या सोयीसाठी या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
एकूण किती जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?
स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत एकूण 17727 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही एक मेगा भरती आहे, आणि तब्बल 20 विविध विभागांमधील पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. तसेच 20 पैकी 19 विभागांमधील पदे भरताना शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक अशी आहे त्यामुळे तुम्ही जर का पदवीधर असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज दाखल करा आणि परिक्षेची तयारी करायला सुरुवात करा. SSC CGL Recruitment 2024
दोन टप्प्यात होईल परीक्षा
स्टाफ सिलेक्शन कमीशन CGL ही परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार आहे.
टियर 1 – सप्टेंबर – ऑक्टोबर 2024
टियर 2 – दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी होईल.
या परीक्षेत यशस्वी उमेदवार निवडले जाणार आहेत आणि या उमेदवारांना भारत सरकारच्या विविध मंत्रालयेस शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये गट ‘ब’ गट ‘क’ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. SSC CGL Recruitment 2024
अर्जदाराची वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे. तसेच या भरतीमध्ये उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पदे दिली जाणार आहेत. जे उमेदवार पदवीच्या शेवटच्या वर्षात आहेत ते देखील या भरतीअंतर्गत अर्ज करु शकणार आहेत.
परीक्षा शुल्क किती आहे?
खुल्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी 100 रुपये परीक्षा फी ठेवण्यात आली असून. आरक्षित जाती जमाती आणि महिलां, दिव्यांग, माजी सैनिक यांना 6+
कोणकोणत्या पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे?
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
- इन्स्पेक्टर.
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट.
- सब इंस्पेक्टर (CBI)
- सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- सिनियर एडमिन असिस्टंट
- कर सहाय्यक
वरील सर्व पदांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. SSC CGL Recruitment 2024
- केवळ कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदासाठी पदवी व 12मध्ये गणित विषयात किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
येथे अर्ज करा
https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर झालेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्ज दाखल करताना तुमची शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य पद्धतीने भरा कारण पुढील परीक्षांचे नोटिफिकेशन्स ईमेल किंवा फोन नंबरवर येत असतात. SSC CGL Recruitment 2024
अर्ज करण्याची अंतीम तारीख
स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 24 जुलै 2024 असून इच्छूकांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा. SSC CGL Recruitment 2024