CM Fellowship 2025: तुम्ही 21 ते 26 वयोगटातील आहात का? तुमच्याकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आहे का? आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करून प्रशासनाचा अनुभव घ्यायचा आहे का? जर हो, तर मुख्यमंत्री फेलोशिप 2025 ही तुमच्यासाठी एक अनमोल संधी ठरणार आहे.
या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात एक वर्षासाठी नियुक्ती मिळेल. या फेलोशिप अंतर्गत तुम्ही शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकणार आहात. ही फेलोशिप तुम्हाला केवळ अनुभवच देणार नाही, तर या फेलोशिपमुळे तुमच्या करिअरला एक नवी दिशा मिळणार आहे.
फेलोशिपची वैशिष्ट्ये | Maharashtra CM Fellowship
- कालावधी: ही फेलोशिप एकूण १२ महिन्यांची आहे. आणि या १२ महिन्यांच्या कालावधीत तुम्हाला शासनाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
- पगार: तुम्हाला दरमहा ₹५६,१०० पगार (CM fellowship salary) दिला जाईल, शिवाय ₹५,४०० प्रवास भत्ता देखील स्वतंत्रपणे मिळेल.
- इतर सुविधा: अपघाती विमा सुरक्षा, ८ दिवसांची रजा, आणि IIT मुंबई कडून मिळणारे अभ्यासक्रम प्रमाणपत्र या अतिरिक्त सुविधा देण्यात येणार आहेत. फेलोशिप उमेदवार म्हणून तुमच्याकडे शासनाच्या ग्रेड A अधिकाऱ्यासमान अधिकार असतील, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व आणि कामगिरी या दोन्हींचा उत्तम विकास होईल.
पात्रता काय आहे? | CM fellowship eligibility
जर तुम्ही २१ ते २६ वयोगटातले असाल आणि तुमच्याकडे किमान ६०% गुणांसह पदवी असेल, तर तुम्ही या संधीसाठी पात्र ठरणार आहात.
तसेच या फेलोशिपसाठी पात्र होण्यासाठी कामाचा अनुभव असणं सुद्धा आवश्यक असणार आहे, जसे की एखादी पूर्णवेळ नोकरी, इंटर्नशिप, किंवा स्वतःचा व्यवसाय. शासनाला अशा उमेदवारांची गरज आहे, ज्यांना शिक्षण झाल्यांनतर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतला आहे. याशिवाय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, तसेच संगणक आणि इंटरनेटचं मूलभूत ज्ञान असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. सरकारसोबत काम करताना ही कौशल्यं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
अर्ज आणि निवड प्रक्रिया कशी होणार? | CM Fellowship Apply Online
अर्ज प्रक्रिया:
या फेलोशिप साठीची अर्ज प्रक्रिया ही १५ एप्रिल पासून सुरु झाली असून, १५ एप्रिलपासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया ५ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. या फेलोशिप अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांना पुढे दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे: (mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP) तसेच अर्ज करताना ₹५०० अर्ज शुल्क देखील भरावे लागेल.
निवड प्रक्रिया:
१. या फेलोशिप साठी प्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, ज्यात सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित, इंग्रजी, मराठी आणि IT या घटकांवर आधारित प्रश्न असतील.
२. त्यानंतर निबंध लेखन होईल. यातून तुमची विचारशक्ती, मांडणी कौशल्य आणि समाजाशी जोडलेलं भान तपासलं जाईल.
३. त्यांनतर शेवटी, फक्त पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत होईल, जिथे तुमच्या दृष्टिकोनाची, संवेदनशीलतेची आणि काम करण्याच्या तयारीची परीक्षा घेतली जाईल.
शासनाला अशा उमेदवारांची गरज आहे, ज्यांच्यात समस्या सोडवण्याची, नव्या कल्पना मांडण्याची आणि धोरणात्मक काम करण्याची जिद्द आणि क्षमता आहे.
उपलब्ध जागा किती?
ह्या फेलोशिप अंतर्गत या वर्षी एकूण ६० उमेदवारांची भरती होणार आहे. ही जागा अत्यंत मर्यादित आहेत, त्यामुळे स्पर्धा प्रचंड जास्त असणार आहे. जर तुम्हाला सरकारसोबत प्रत्यक्ष काम करायची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका.
मुख्यमंत्री फेलोशिप केवळ एक वर्षाचा अनुभव नाहीये, तर हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. IIT मुंबईकडून मिळणारे विशेष अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि शासनाकडून मिळणारे अधिकृत फेलोशिप प्रमाणपत्र तुमच्या भविष्यातील करिअरसाठी नक्कीच महत्वाचे ठरणार आहे. फेलोशिप पूर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठ्या संधी मिळाल्या आहेत. काहींनी स्वतःची सामाजिक संस्था सुरू केली आहे, काहींनी प्रशासनात मोठ्या पदांवर प्रवेश केला आहे. अशाच प्रकारे तुम्हीही तुमचं स्वप्न सत्यात उतरवू शकता.