केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करीत आहे. तसेच पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत होणारे नुकसान आणि हवालदिल होणारा शेतकरी हे चित्र पाहता शासनाने शेतकऱ्यांसाठी जोडधंडा म्हणजे कुक्कुटपालन किंवा गाय गोठ्यासाठी अनुदान योजना जाहीर केली आहे. या अनुदानाची रक्कम किती असेल आणि कोणकोणत्या निकषावर हे अनुदान देण्यात येणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जणून घेणार आहोत. cow shed subsidy
गाय गोठा अनुदान योजनेचे उद्देश
शेतकऱ्यांना व्यवसाय संधी प्राप्त व्हावी आणि कुक्कुटपालन करुन किंवा गायींचे पालन करुन किमान दुध व्यवसायातून शेतकऱ्यांना जोडव्यवसाय सुरु करता यावा तसेच ग्रामिण तरुण आत्मनिर्भर व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने गाय गोठा अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी किती अनुदान दिले जाते?
गाय गोठा अनुदान योजनेननुसार या योजनेसाठी 10 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
- भारत सरकार कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयामार्फत गाय गोठा अनुदान योजना सुरु करण्यात आली असून महाराष्ट्र सरकार या योजनांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे.
- या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे शेड बांधण्यासाठी अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.
- ऑनलाईन सुविधेमुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
- या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना, पशुपालकांना मिळणारे अनुदानाचे पैसे डीबीटीच्या मदतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. cow shed subsidy
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे
- जमिनीचा सातबारा उतारा
- जमिनीचा 8 अ
या योजनेअंतर्गत कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे
गायगोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी योग्य पशु संवर्धनासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत गाई-म्हशींसाठी काँक्रीटचे शेड बांधणे अनिवार्य आहे. दोन ते सहा गुरांसाठी मोठे शेड बांधून घ्यावे. यासाठी शासनाकडून 77 हजार 188 रुपये अनुदान दिले जाणार आहे. जर 6 पेक्षा जास्त गायी असतील म्हणजे बारा गायी असतील तर अनुदान या रकमेच्या दुप्पट होईल. 12 ते 18 गुरांना तिप्पट अनुदान मिळणार परंतु इतक्या जास्त गुरांसाठी लागणारी जागांदेखील मोठी असावी. जनावरांचे टॅगिंग करणे देखील आवश्यक असेल. तसेच गुरांना 200 लिटर पिण्याच्या पाण्याची टाकीही बांधूण घेणे याच प्रकल्पांतर्गत असेल. cow shed subsidy
कोणते अर्जदार पात्र असतील?
गाय गोठा अनुदान योजन ही मनरेगा योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींमध्ये मनरेगाचे विविध प्रकल्प सुरु आहेत त्यातील हा क प्रकल्प असून या योजनेच्या निकषांनुसार स्वत:ची जमीन असलेले लाभार्थी आणि वैयक्तिक लाभाच्या निकषांनुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी सदर कामाचा लाभ मिळण्यास पात्र असतील. cow shed subsidy