Indian Railway: दरमहा रेल्वेला भरावे लागते एवढे वीज बिल? 1 किलोमीटर धावण्यासाठी एवढा खर्च?

Indian Railway: भारतातील बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात. लोकल ही तर मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. यामुळे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकतात. यासाठी रेल्वे प्रवाशांकडून अत्यल्प पैसे घेते. पण या इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या ट्रेनचे विजेचे बिल किती येत असेल? याचा कधी विचार केला आहे का? किंवा या रेल्वे किती वीज वापरतात? चला तर मग याबद्दल पुढे अधिक जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेच्या अर्ध्या गाड्या ह्या विजेवर तर काही गाड्या डिझेलवर धावतात. 1 किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यासाठी सुमारे 20 युनिट्स खर्च येतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजमेर रेल्वे सेक्शनवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेन, एक किलोमीटर अंतर हे 20 युनिटमध्ये कापतात. विशेष गोष्ट म्हणजे अशी की डिझेल इंजिनपेक्षा इलेक्ट्रिक रेल्वे ह्या अधिक किफायतशीर आणि स्वस्त असल्याचं दिसत आहे.

गाड्यांमधील वीजबिलाबाबत जर सांगायचे झाले तर, रेल्वे प्रति युनिट विजेसाठी सुमारे 6.50 रुपये देते. अशा परिस्थितीत 1 किलोमीटरच्या प्रवासात 20 युनिट वीज वापरण्यात आली तर एक किलोमीटरचा एकूण खर्च 130 रुपये होईल.

त्यामुळे रेल्वेचे वीज बिल हे एका महिन्यात किती वीज वापरली जाते यावर अवलंबून असते. याशिवाय तुमच्या मनात हा प्रश्नही येऊ शकतो की कधी कधी अनेक भागात बराच वेळ वीज जाते, तर त्या भागतील ट्रेन का थांबत नसेल?

आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगतो की, रेल्वेला (Indian Railway) वीज ही थेट पॉवर ग्रीडमधून देण्यात येते. त्यामुळे कधीही ट्रेनमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचं तूम्ही ऐकल नसेल. ही वीज, वीज केंद्रातून पॉवर ग्रीडमध्ये जाते आणि तेथून सबस्टेशनला पाठवण्यात येते. त्यामुळे रेल्वे स्थानकांजवळ सबस्टेशन्स असल्याचे दिसतात.

वीज पुरवणारी संस्था कोणती? | Which is the electricity supplier?

रेल्वेला विविध वीज कंपन्या/डिस्कॉम्स तसेच पॉवर स्टेशन्सकडून वीज मिळते. अपवाद म्हणजे पॉवर स्टेशनमधून थेट वीज मिळण्याची शक्यता नाही आहे, कारण सामान्य औद्योगिक वीज ग्राहकांपासून रेल्वे ही वेगळी आहे. विद्युत कायदा 2003 च्या तरतुदीनुसार रेल्वेला डीम्ड वितरण परवाना देण्यात आला आहे.

केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) 15 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाने स्पष्ट केले की रेल्वे ही रेल्वे कायद्यांतर्गत एक अधिकृत संस्था आहे जी विजेचे प्रसारण आणि वितरण दोन्ही करू शकणार आहे. म्हणून, 2016 मध्ये, रेल्वेने 4 रुपये 70 पैसे रुपये दराने, रत्नागिरी गॅस पॉवर प्लांट लिमिटेडकडून 500 मेगावॅट वीज खरेदी करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रेल्वेने सरळ बिहारमधील नबीनगर पॉवर प्लांटमधून देखील स्वस्त दरात वीज खरेदी केली आहे.

भारतीय रेल्वे द्वारे दरवर्षी 20 अब्ज kWh1 विजेचा वापर करण्यात येतो, जे मुख्यपणे डिझेलच्या रूपात असते. आणि हा वीज वापर प्राथमिक ऊर्जा वापर वगळता, देशाच्या एकूण विजेच्या वापराच्या सुमारे 2% आहे.

रेल्वेला थेट पॉवर ग्रीडमधून वीज मिळते. या ग्रीडमध्ये पॉवर प्लांटमधून वीज येते आणि नंतर ग्रीडद्वारे सबस्टेशनमध्ये पाठवण्यात येते. त्यामुळेच अनेकदा रेल्वे स्थानकाशेजारी सबस्टेशन्स बघायला मिळतात.

रेल्वे किती वीज वापरते? | How much electricity does the railway use?

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, नॉन-एसी डब्यातील रेल्वेगाड्या ताशी 40 लिटर डिझेल वापरतात. एका वातानुकूलित कोचसाठी ताशी 65-70 लिटर वीज लागते. सुमारे तीन युनिट वीज ही एक लिटर डिझेल द्वारे निर्माण होते. त्यामुळे वातानुकूलित नसलेल्या कोचमध्ये ताशी सुमारे 120 युनिट वीज वापरली जाते. Indian Railway