download best weather application भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे शेतीवर अवलंबून असणारा समाज जास्त आहे म्हणूनच आपण इतर देशांना धान्य आणि विविध शेतीपासून विकसीत केलेल्या वस्तू निर्यात करतो. परंतु अडचण एकच आहे ती म्हणजे आजची भारतातील शेतकरी हवामानावर अवलंबून आहे. आपल्या भारतात कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे परंतु ते खूप खर्चिक देखील आहे. आजही भारतात पाऊस एखाद्या प्रदेशात जास्त पडतो तर एखाद्या प्रदेशात कमी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच आजही पावसाचे पाणी साठवण्यासाठी योग्य पद्धती अवलंबल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज कळणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच आज आम्ही या लेख्याच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ते म्हणजे अचूक हवामानाचा अंदाज सांगणारे 7 ॲप्सची माहिती आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा. best weather application
१) पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप्लिकेशन
हवामान अंदाज सांगण्यासाठी पंजाबराव डख ही व्यक्ती प्रसिद्ध आहे. कारण त्यांचा हवामानसंदर्भात तितका अभ्यास देखील आहे. आणि शेतकऱ्यांचा त्यांच्यावर तितका विश्वास देखील आहे. म्हणूनच पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप्लिकेशन योग्य आणि अचूक अंदाज देणारे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये काम करत आहे. या ॲप्लिकेशन मध्ये पंजाबराव डख यांचे ॲप्लिकेशन आहे. या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये हवामान अंदाज वर्तवला जातो. आठ ते पंधरा दिवसांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांना आधीच समजतो. इतकेच नाही तर जिल्हा आणि तालुक्यानुसार हवामान अंदाज वर्तवला जातो. download best weather application
अशा विविध प्रकारे हवामान अंदाज दिला जातो. या ॲपच्या माध्यमातून मधून दिला जाणारा हवामान अंदाज हा अचूक असतो. हे ॲप फक्त महाराष्ट्रासाठी सध्या कार्यरत आहे. महाराष्ट्र मधील प्रत्येकासाठी हे ॲप खूपच महत्त्वाचे कार्य बजावत आहे.
२) शासकीय प्रणालीने विकसीत केलेले मेघदूत ॲप
भारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना हवामानाच अचूक अंदाज देण्यासाठी मेघदूत हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मेघदूत अॅपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेऊन त्यांच्या पिकांचे नियोजन करणे सोपे झाले आहे. इतकेच नाही तर त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारे नुकसानही टाळण्यास मदत झाली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार तसेच तेथील मातृभाषेत ही माहिती उपलब्ध करुन दिली जाते. ॲपच्या माध्यमातून देशभरातील 658 जिल्ह्यात हवामाचा माहिती दिली जात आहे. download best weather application
३) AccuWeather – अचूक हवामानाचा अंदाज वर्तवणारे ॲप
जगातील सर्वात लोकप्रिय हवामान अंदाज ॲप्लिकेशन्सपैकी एक म्हणजे AccuWeather हे ॲप आहे. हे ॲप्लिकेशन भारतासह जगभरातील शहरांसाठी हवामान अंदाज देत असते. भारत आणि जगभरातील देशांमधील अनेक शेतकरी शेतीसाठी या ॲपचा विश्वासाने उपयोग करतात. कारण हे ॲप अचूक हवामान अंदाज सांगत असते.
४) The Weather Channel
The Weather Channel हे देखील अचूक हवामान अंदाज सांगणारे लोकप्रिय ॲप आहे. हे ॲप्लिकेशन भारतासह जगभरातील 2.5 दशलक्षाहून अधिक शहरांसाठी हवामान अंदाज देत असते. The Weather Channel ॲप्लिकेशनमध्ये विविध प्रकारचे वैशिष्ट्ये आहेत, ज्यात वास्तविक वेळेतील हवामान, 10 दिवसांचा हवामान अंदाज, वादळ चेतावणी आणि हवामान ट्रेंड यांचा देखील समावेश आहे.
५) Windy
एक पॉवरफूल हवामान अंदाज देणारे ॲप्लिकेशन म्हणून Windy ॲप ओळखले जाते. रोजचे बदलते हवामान, पाऊस, वादळ या सर्व नैसर्गिक वातावरणाची योग्य आणि अचूक माहिती या ॲपच्या मदतीने मिळू शकते. भारतासह जगभरातील अनेक शेतकरी हे ॲप विश्वासाने वापरतात आणि या ॲपच्या माध्यमातून मिळालेली माहिती खरी देखील ठरते. download best weather application
६) Openweather
एक सोपे आणि वापरण्यास अत्यंत सोपे असलेले हवामान अंदाज देणारे ॲप म्हणजे Openweather. हे ॲप विविध देशांमध्ये काम करीत असून त्या त्या देशांमधील वेळांप्रमाणे आणि तेथील बदलत्या ऋतुंप्रमाणे हे ॲप काम करते. Openweather या ॲपची अनेक वैशिष्ट्ये आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्सुनामी, भुकंपा, वादळ या सगळ्यांच नैसर्गिक आपत्तींचे योग्य अंदाज लावण्यात हे ॲप खूपच मदतदायक आहे. download best weather application.
७) Weather pro
स्थानिक स्तरावर अतिशय अचूक हवामान अंदाज देणारे महत्त्वाचे ॲप म्हणजे Weather pro. विविध भागातील शेतकऱ्यांना वापरल्या नंतर त्यांना झालेला फायदा या ॲपच्या मुळ पेजवर नोंदवला आहे. शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस या सर्वच गोष्टींची अचूक माहिती देणारे हे ॲप असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांचे नियोजन करणे सोपो होतो. download best weather application