Land Record Registry Documents: शेतजमिनीचे रजिस्ट्री रेकॉर्ड व इतर आवश्यक कागदपत्र आता मोबाईलवर पहा

Land Record Registry Documents

Land Record Registry Documents भारतीत डिजिटल क्रांती सुरु झाली आणि शासकीय व्यवहारांमध्ये देखील डिजिटलायझेशन दिसून येऊ लागले. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने नक्कीच शेती आणि जमिनीची कागदपत्रे देखील ऑनलाईन मिळवण्याची सुविधा शासनाने नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. याआधी शेतकऱ्यांना विविध प्रकारची कागदपत्र तहसील कार्यालय व इतर ठिकाणाहून मिळवावी लागत असत. त्यामध्ये दिरंगाई, अधिकाऱ्यांचा लाजखोरपणा या सगळ्याच गोष्टांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असे. परंतु शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता शासनाकडून जमिनीसंबंधीतचे रजिस्ट्री, फेरफार माहिती, ऑनलाइन फेरफार इत्यादी गोष्टी मोबाईलवर पाहण्याची महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेबाबत आज आपण लेखाच्या माध्यमातून माहिती मिळवणार आहोत. Land Record Registry Documents

जमिनीसंबंधीत कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवायचे?

शेतकऱ्यांना शेतीसंबंधी किंवा जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्यांना जमिनीसंबंधीचे रजिस्ट्री रेकॉर्ड, सातबारा उतारा, फेरफार यासंबंधीची माहिती ऑनलाईन मिळविण्यासाठी पुढील प्रक्रिया करा. Land Record Registry Documents

•      जमिनीचे रजिस्ट्री रेकॉर्ड, फेरफार मिळविण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in ही लिंक गुगलवर सर्च करा

•      सर्च केल्यानंतर  महाराष्ट्र राज्य महसूल विभागाची वेबसाइट तुमच्या स्क्रिनवर ओपन होईल.

•      सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही वेबसाईटवर तुमच्या नावाने रजीस्ट्रेशन करुन लॉगिन आयडी मिळवा.

•      तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल तो भारा त्यानंतर  तुम्ही वेबसाईटच्या मुख्य पानावर येता.

•      वेबसाइटच्या उजव्या बाजूला तुम्हाला जमिनीसंबंधी जे कागदपत्रे मिळवायचे आहे ते निवडा. त्यावर क्लिक करा.

•      तुम्हा या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने देखील लॉगीन करु शकता.  त्यानंतर तुम्हाला OTP Based Login पर्यायावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलवप OTP प्राप्त होईल तो समोरील रकान्यात भरा.

•      त्यानंतर  एक ‘आपला सातबारा’ असे एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल. त्यावर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी 7/12, डिजिटल स्वाक्षरी 8A, डिजिटल स्वाक्षरी मालमत्ता कार्ड, टॉप अप खाते, पेमेंट इतिहास, पेमेंट स्थिती असे विविध पर्याय दिसतील. त्यातील रजिस्ट्री रेकॉर्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

•      तुमच्यासमोर “डिजिटल रजिस्ट्री रेकॉर्ड” नावाचे पान उघडेल.  त्यावर तुम्हाला “डाउनलोड केलेल्या प्रत्येक कागदपत्रासाठी 15 रुपये शुल्क आकारले जातील ही रक्कम उपलब्ध शिल्लकमधून वजा केली जाईल”अशी  सुचना दिसेल, 

•      त्यासाठी आधी तुम्ही खात्यात पैसे जमा करणे आवश्यक आहे. नंतर तुमची नवीन नोंदणी पूर्ण करा. Land Record Registry Documents

•      वेबसाईटच्या खात्यात पैसे जमा करण्याचे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट, नेट बँकिंग किंवा BHIM UP च्या मदतीने पैसे भरु शकता.

•      त्यानंतर डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा मिळविण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरा.

•      त्यानंतर पुढे  तुम्हाला जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे आहे. तुमच्या जमिनीचा सर्वेक्षण किंवा गट क्रमांक टाका. Land Record Registry Documents

•      त्यानंतर पुढे तुम्हाला डाउनलोड पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावर डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा PDF स्वरुपात डाऊनलोड होईल.

•      या सातबारा उताऱ्यावर  लिहिलेले असते  की, हा सातबारा डिजिटल स्वाक्षरीने तयार केलेला असल्याने त्यावर शिक्का सही मारण्याची गरज नाही. Digitally signed Satbara Maharashtra

या प्रक्रियेने तुम्ही जमिनीसंबंधीत खालीलपैकी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता.

  • फेरफार परत डाऊनलोड करणे
  • मालमत्ता पत्रक डाऊनलोड करणे
  • मिळकत पत्रिका फेरफार
  • फेरफार स्थिती अधिकार क्षेत्र
  • प्रलंबित दिवाणी न्यायालय प्रकरण
  • अभिलेख पडताळणी
  • ई-रेकॉर्ड्स
  • ई-नकाशा भू-नकाशा
  • ई-मोजणी
  • आपली चावडी ई-चावडी
  • जमीन महसूल भरणा
  • डिजिटल सातबारा उतारा
  • डिजिटल 8अ उतारा डाऊनलोड