Driving License Renewal Online: आता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे झाले सोपे

Driving License Renewal Online

Driving License Renewal Online ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. आपल्या भारतात कार आणि दुचाकी किंवा इतर विविध गाड्या चालविण्यासाठी आरटीओकडून (RTO) ड्रायव्हिंग लायसेंस देण्यात येत असते. हेच ड्रायव्हिंग लायसेन्सची मुदस संपल्या नंतर त्याचे नुतनीकरण म्हणजेच रिन्यू करण्यासाठी आपल्याला RTO मध्ये जावे लागत असेल. परंतु आता तसे अजिबात नाही. भारत सरकारने प्रत्येक राज्या राज्यांमध्ये ही ऑनलाईन सेवा सुरु केली आहे. ती कशा पद्धतीने ते आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Driving License Renewal Online

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरताना व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन  करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते ती पुढील प्रमाणे.

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅन कार्ड, आधार कार्ड
  • ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट द्यावे
  • पासपोर्ट साईज फोटो

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची प्रक्रिया  how to renew driving license online in Maharashtra?

आता सर्व  शासकीय सुविधा डिजिटल होत असताना महाराष्ट्र मोटर वाहन विभागाने देखील नवी सुविधी सुरु केली आहे, ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स  आणि वाहन परवान्याचे नुतनीकरण आता ऑनलाईन पद्धतीने होई शकते. याआधी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावे लागे. परंतु आता आपला वेळ वाचणार आहे आणि दगदग सुद्धा टाळता येणार आहे. कारण पुढील प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स चे नुतनीकरण म्हणजे रिन्यू करु शकणार आहात.

Step by Step Process of online Driving Licence सर्वप्रथम भारत सरकारच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर sarathi.parivahan.gov.in वर जा.

  • Select state name या ठिकाणी तुम्ही ज्या राज्यात राहता ते राज्याचा पर्याय निवडा.
  • Apply for DL Renewal पर्यायावर क्लिक करा.
  • पुढा तुम्हाला खालच्या बाजूला नोट दिलेली असेल ती काळजीपूर्वक वाचा. जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर Form 1-A भरून त्यावर MBBS डॉक्टरची सही व शिक्का घ्यावा लागेल. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करताना तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. त्यासाठीचा फॉर्म PDF File डाऊनलोड करण्याचा पर्याय तुम्हाला प्रक्रियेमध्ये मिळेल.
  • पुढे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्मतारीख भरा म्हणजे त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील सर्व माहिती ओपन होईल.
  •  तुमची ड्रायव्हिंग लायसन्स माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा आणि बरोबर  असेल तर दिलेल्या पर्यायांतून YES हा पर्याय निवडा व त्याखाली तुम्ही राहत असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर टाकून Proceed या बटनावर क्लिक करा.
  • या पेजवर तुमचा मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, पत्ता, ई-मेल आयडी ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. Proceed या बटनावर क्लिक करा.
  • पुढे दिलेल्या पर्यायांपैकी Renewal of DL निवडा आणि Proceed या बटनावर क्लिक करा.
  • Self-Declaration (Form1) पर्यायावर क्लिक करा, डिक्लेरेशन फॉर्म एका पॉपअप विंडो मध्ये ओपन होईल त्यातील योग्य ते पर्याय निवडा व Submit या बटणावर क्लिक करा. आता परत मागे येऊन सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा एप्लीकेशन फॉर्म सबमिट होईल व व तुम्ही भरलेले सर्व डिटेल्स तुम्हाला समोर स्किनवर दिसतील.  डाव्या बाजूला Application Form (pre filled), print form 1A, Print form 1,  आणि  Print Acknowledgement हे चार पर्याय दिसतील या चारही PDF Files  तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.
  • याच पेजवर खाली येऊन Upload Documents हा पर्याय निवडून तेथे तुम्हाला विचारलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • पुढे Proceed बटनावर क्लिक करा.
  • तुमचा एप्लीकेशन क्रमांक आणि तुमची जन्मतारीख समोर दिसत असलेल्या रकान्यात भरा.  आणि Submit या बटनावर क्लिक करा. (तुम्ही संगणकात किंवा मोबाईलवर डाऊनलोड केलेल्या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर मिळेल.)
  • या ठिकाणी जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर मेडिकल सर्टिफिकेट Form 1A (MBBS डॉक्टरांच्या सही आणि शिक्का असलेले सर्टिफिकेट अपलोड करा.
  •  40 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना हा फॉर्म अपलोड करण्याची गरज नाही. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो वेबसाईटवर अपलोड करा.
  • डॉक्युमेंट्स अपलोड करा पुढे तुम्हाला Fee Payment हा पर्याय निवडा. Payment Receipt ची पीडीएफ फाईल डाउनलोड करून ठेवा आणि फॉर्म सबमिट करा.

अशा प्रकारे तुमची Driving License Renewal ची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही डाऊनलोड केलेले फॉर्म आणि तुमचे ओरिजनल कागदपत्र घेऊन आरटीओ ऑफिस मध्ये जा. तेथील अधिकाऱ्यांकडून तुमची कागदपत्रे व्हेरिफाय केली जातील आणि पुढील काही दिवसातच ड्रायव्हिंग लायसन्स पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल.

ड्रायव्हिंग लायसन्सचे नुतनीकरण करण्यासाठी किती पैसे भरावे लागतात? What is the Fee for Driving Licence Renewal Online in Maharashtra

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन रिन्यू करण्यासाठी पुढील प्रमाणे फी पद्धतीने भरावी लागते.

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी = Rs.415

ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यास    लायसन्स धारकाला 1000/- भरावे लागतात.