शेती करताना शेतकऱ्यांना बरेचदा वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे कठीण होऊन जाते. डुक्कर, वाघ, अस्वले, कोल्हे यांसारखे वन्य प्राणि तसेच चरायला सोडलेले गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या देखील शेतात चालून जातात. यावेळी शेतातील पिकाचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पअंतर्गत तार कुंपन योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी 48,000/- रुपयांपर्यंत शासनाकडून अनुदान मिळणार हे. .
तार कुंपन योजनेअतंर्गत दिले जाणारे अनुदान मिळविण्यासाठी कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे जोडावी आणि अर्जदाराची पात्रता काय असावी या सर्व प्रश्नांची आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर उत्तरे मिळविणार आहोत. Tar kumpan anudan
तार कुंपन योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली तार कुंपन योजना 2023 ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे.
- शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेऊन शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता येणार आहे.
तार कुंपन योजने अंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थ्याची पात्रता
- अर्जदार भारताची रहिवासी असावी
- ज्या शेत जमिनीसाठी कुंपन बांधून घ्यायचे आहे अर्जदार स्वतः त्या जमिनीचा मालक असावा.
- कुंपन करण्यासाठी अर्ज केलेली जमिन ही कायम स्वरुपी शेती करण्यात येणारी जमीन असावी, त्या जमीनीत शेती करण्यात येत असावी. जमीन पडिक असेल तर शासनाकडून अनुदान रद्द केले जाते.
- जमीन अशा ठिकाणी असावी जिथे वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका असेल
- त्या जमिनीवरील पिकाचे मागील काही वर्षात जंगली किंवा पाळीव प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान झालेले असावे.
तार कुंपन योजना अनुदान मिळविण्यासाठीची अर्ज प्रक्रिया:
या शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्याने अर्ज भरून संबंधीत जिल्हा प्रशासन कार्यालयात जमा करावा. अर्जासोबत खालील महत्त्वाची कागदपत्रे जोडावीत
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- अर्जदाराने योजनेअंतर्गत अर्ज करताना आधारकार्ड, मतदार कार्ड आणि रेशन कार्डती प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार जमिनीचा मालक आहे असे दर्शवणारी कागदपत्रे किंवा जमिनीचा नकाशा अर्जासोबत जोडावा
- याआधी जंगली किंवा पाळीव प्राण्यांमुळे नुकसान झाले असल्यास तत्संबंधी ग्रामपंतायीकडून पिक नुकसानीचा अहवाल सोबत जोडावा.
- तार कुंपन करण्याकरीता लागणारे साहित्य खरेदीसाठी अपेक्षित खर्च मांडून अंदाजाची प्रत सोबत जोडावी.
योजनेसंबंधीत अर्ज आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर, जिल्हा प्रशासन कागदपत्रांचे काळजीपूर्वक अभ्यास करेल. आणि शेतकऱ्याने सर्व पात्रता निकष पूर्ण केले असतील तर अर्ज मंजूर केला जातो. अनुदान मंजूर झाल्यानंतर, शेतकरी काटेरी तार आणि खांब खरेदी करुन. पिकांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी शेताभोवती तारांचे कुंपन लावून घेऊ शकतो. त्यानंतर शासकीय अधिकारी येऊन कुंपनाची पाहणी करताता आणि शेतकऱ्याला शासकीय अनुदान त्याच्या बँक खात्यात पाठवले जाते.
तार कुंपन योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते.
तार कुंपन योजनेअंतर्गत शासनाकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ₹48,000 रु. प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब खरेदीसाठीचे आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते. उर्वरीत रक्कम शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागते.
तार कुंपन योजनेसंबंधीत अटी व नियम
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे शेत हे अतिक्रमणात नसावे
- अर्जदारांनी तारकुंपणासाठी निवडलेला परिसरात प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावा.
- कुंपनासाठी निवडलेल्या जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेती व्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाऊ नये, याबाबत हमीपत्र शेतकऱ्याने जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करावे
.केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांच्या मदतीच्या असतात. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पिक वाढवावे आणि आर्थिक विकास करावा हा एकमेव हेतू या योजना राबविण्यामागे असतो. महाराष्ट्र शासन नेहमीच शेतकऱ्याच्या हिताच्या योजना राबवित आहे, शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःचा आर्थिक विकास करावा.