SBI recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8773 पदांसाठी होणार भरती, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2023

SBI recruitment 2023

SBI recruitment 2023 SBI ही भारतातील 200 वर्षे जुनी बँक आहे. SBI चा फुलफॉर्म आहे state bank Of India असा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. आणि नवी  दिल्ली, पटना, कानपूर, हैदराबाद, भोपाल,  बेंगलुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, चंदिगड येथे या बँकेची स्थानिक कार्यालये आहेत. या बँकेची भारतात 22,219  शाखा आहेत. ही बँक जगभरातील विविध देशात काम करते, सध्या भारतामध्ये या बँकेची 57  प्रादेशिक कार्यालये आहेत. भारतात आणि परदेशात एसबीआयच्या बँकिंग सुविधेने नागरिक समाधानी असल्याचे दिसून येते. तसेच नागरिकांचा विश्वास जपणारी अशी ही एक बँक आहे.

जाहिरातीमार्फत SBI बँकेने आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती जाहीर केली आहे. जे तरुण तरुणीं पदवी परीक्षा उत्तीर्ण आहेत ते या पदांसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी हा लेख आम्ही  घेऊन आलो आहोत. तुम्ही पदवीधर असाल आणि वयोमर्यादेत बसत असाल तर तुमचे बँकेत नोकरी मिळविण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. हा लेख पुर्ण वाचा आणि आजच नोकरीसाठी ऑनलाईन आर्ज करा.

SBI मध्ये कोणत्या पदासाठी भरती सुरु आहे?

       SBI मध्ये लिपिक म्हणजेच कनिष्ठ सहकारी या पदासाठी भरती सुरु आहे.  

SBI जाहिरातीनुसार भरतीसाठी एकूण पदसंख्या किती?

SBI ने घेषित केलेली भरतीमध्ये 8773 इतकी पदे भरली जाणार आहेत.

SBI भरतीसाठी अर्जदारांची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी?

SBI मध्ये लिपिक या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही  कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

SBI भरतीसाठी अर्जदाराची वयोमर्यादा किती असावी?

  • खुला गटातील अर्जदाराचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • ओबीसी अर्जदाराचे वय 31 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • एससी आणि एसटी अर्जदाराचे वय 33 वर्षांपेक्षा जास्त असू नये
  • अपंग व्यक्ती (सामान्य गट) अर्जदाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये
  • अपंक व्यक्ती (एससी, एसटी गट) अर्जदाराचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त असू नये

SBI मध्ये अर्ज करताना अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराने कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • 10वी आणि 12वी चे गुणपत्रक  
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (अनुभव असल्यास)
  • फोटो – size 20kb to 50kb; dimension 200*230
  • मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी (ऑनलाईन रजीस्ट्रेशनसाठी)

SBI भरतीसाठी अर्ज भरण्याची फी किती आहे?

•      शासनाकडून सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अर्जदारांसाठी 750/- रु. फी ठेवण्यात आली आहे.

•      एसटी, एससी, पीडब्ल्यूडी अर्जदारांनी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

SBI मार्फत तब्बल 8773 इतक्या पदांसाठी भरती सुरु झाली आहे. तुम्ही देखील पदवीधर असाल आणि तुमचे वय वरती सांगितलेल्या अटीमध्ये बसत असेल तर तुम्ही आजच या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करा.

  • SBI च्या या लिपिक पदासाठीच्या परिक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे.
  • जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे

 https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरु शकता.

लिपिक पदाची नोकरी मिळाल्यानंतर पगार किती असेल?

SBI ची परिक्षा पास होऊन लिपिक पदाची नोकरी मिळाल्यानंतर 26 ते 29 हजार रुपयांपर्यंत पगार असणार आहे.

SBI भरतीसंदर्भातील अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरु शकतो?

दिनांक  17 नोव्हेंबर 2023 पासून भरतीसाठीचे अर्ज अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि दि. 7 डिसेंबर 2023 पर्यंतच अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

State Bank Of India मधील नोकरी करण्याचे फायदे

•      या बँकेतील कर्मचाऱ्यान केवळ 2 टक्के व्याजावर होमलोन घेता येते.

•      बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या आर्थिक धोरणानुसार पगारवाढ मिळत असते.

•      SBI कर्मचाऱ्यांना बुक ग्रांट, मेडिकल सुविधा, न्यूजपेपर अलाउंस, फोन बिल, कन्वेयंस अलाउंस, ब्रीफकेस अलाउंस, एलटीसी/ एलएफसी, महागाई भत्ता असे विविध भत्ते पगारासोबत मिळत असतात.

•      भारतात विविध ठिकाणी एसबीआयच्या शाखा असल्याने भारतातील कोणत्याही राज्यात नोकरी मिळू शकते.