HDFC Scholarship: एचडीएफसी बँकेमार्फत 1ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

HDFC Scholarship

HDFC Parivartan Scholarship 2023: एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या हुशार आणि गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून एचडीएफसी बँकेकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 एचडीएफसी बँक परिवर्तन योजना या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी यासंदर्भातील सर्व माहिती या लेखाच्या माध्यमातून आम्ही दिली आहे. HDFC Scholarship

HDFC बँक परिवर्तन योजनेच्या 2023-24 मधील शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • मागील इयत्तांचे गुणपत्रक
 • विद्यार्थ्याचे आधारकार्ड
 • विद्यार्थ्याच्या नावाने बँकेत सुरु केलेल्या खात्याचा तपशील
 • महाविद्यालयीन, तसेच शालेय विद्यार्थ्याचे ओळखपत्र
 • बोनाफाईट
 • पासपोर्ट साईज फोटो
 • पालकांच्या उत्पन्नाचा दाखला
 • जात प्रमाणपत्र

HDFC बँक परिवर्तन योजनेच्या 2023-24 मधील शिष्यवृत्तीसाठी  विद्यार्थ्याची आवश्यक पात्रता HDFC Scholarship

 • शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा.
 • 1 ली चे 12 वी सर्व शाखांमधील विद्यार्थी आणि डिप्लोमा, आयटीआय चे विद्यार्थी देखील या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करु शकतात.
 • पदवी  आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा  HDFC बँक परिवर्तन योजना 2023-24 चा लाभ घेऊ शकतात. 
 • अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षात किंवा मागील इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
 •  शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

HDFC बँक परिवर्तन योजना 2023-24 अंतर्गत शिष्यवृत्तीसाठीची अर्ज प्रक्रिया

 • एचडीएफसी बँकेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
 • https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecss-programme या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संबंधित योजनेच्या पेजवर जाऊ शकता. तेथे तुम्हाला  शिष्यवृत्ती योजनेचे नाव शोधून Apply बटनवर क्लिक करायचे आहे.
 • फॉर्ममध्ये विचारलेल्या बाबींची पूर्तता करुन कागदपत्रे अपलोड करा.
 • आणि फॉर्म म्हणजेच ऑनलाईन अर्ज सबमीट करा.  HDFC Scholarship

HDFC बँक परिवर्तन योजना 2023-24 अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

 शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छित  विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

HDFC बँक परिवर्तन योजना 2023-24 अंतर्गत शिष्यवृत्तीमार्फत किती पैसे देण्यात येणार आहेत?

HDFC बँक परिवर्तन योजना 2023-24 अंतर्गत प्रत्येक इयत्तेमार्फत आणि शैक्षणिक खर्चाचा विचार करता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाल्यास किती पैसे मिळणार आहेत ते आपण आता समजून घेऊया.

 • इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.
 • इयत्ता ७ वी ते १२ वीचे सर्व शाखांचे विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत १८ हजार रुपये दिले जाणार आहेत.
 • आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत १८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 • पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत २५ ते ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
 • पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. HDFC Scholarship

HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 एचडीएफसी बँक परिवर्तन योजना या शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळात आर्थिक अडचणीमध्ये मदतगार योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकतील. एक उत्तम समाज घडवण्यासाठी HDFC बँकेने उचललेले हे पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक सर्वोत्तम भारत घडवण्याकडे केलेली वाटचाल आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक मदत मिळवून आपले शिक्षण योग्य पद्धतीने पुर्ण करावे. शैक्षणिक खर्च करता येत नसल्याने कोणाचेही शिक्षण अपूर्ण राहू नये हा एकमेव हेतू ही योजना सुरु करण्यामागे आहे. HDFC Scholarship 2023-24