instant loan by google pay सध्यस्थीती पाहता आपल्या भारतात इ-मनी आणि इ- व्यवहार यांच्यावर जास्त जोर दिला जातो. बाजारात, मार्केटमध्ये, मॉल्समध्ये इलोक्ट्रॉनिक व्यवहार जास्त करण्यात ये असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यात सर्वात जास्त इ व्यवहारांसाठी वापरले जाणारे ऍप म्हणज गुगल पे. या आधी गुगल पे केवळ पैशांची देवण घेवाण, बीले भरणे अशा पद्धतीच्या सेवा देत असे. परंतु आता गुगल पे च्या माध्यामातून तुम्ही लोन देखील मिळवू शकणार आहात.
भारतात 19 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन वित्तमंत्री मा. अरुण जेटलीजी आणि Next Billion Users चे व्हाईस प्रेसिडंट आणि जनरल मॅनेजर सीझर सेनगुप्ता यांच्या उपस्थितीत Google Tez app लाँच करण्यात आले. नंतर काही दिवसांनी म्हणजेच 28 ऑगस्ट 2018 रोजी Google Tez appचे नाव बदलून Google pay असे करण्यात आले.
आर्थिक संकटात कर्ज (Loan) मिळवण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आजकाल Google Pay यांसारख्या अनेक UPI अॅप्सनीही त्यांच्या ग्राहकांना झटपट कर्जाची सुविधा देऊ केली आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही कागदपत्रांशिवाय लवकरात लवकर कर्ज मिळवू शकता.Google Pay वरून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला या अॅप्सच्या मूळ कंपनीकडून कर्ज घ्यावे लागेल. Google Pay द्वारे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेऊयात
Google Pay वरुन घेतलेल्या लोनचे वैशिष्ट्य
- Google Pay वरुन घेतल्या गेलेल्या लोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लोन मिळविल्यानंतर केवळ 111/- रुपयांचा EMI आपल्याला भरावा लागतो
- हा EMI अत्यंत कमी असून तो सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
गुगल पे लोन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Google pay loan required document
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- निवासाचा पुरावा म्हणजेच वीजबील किंवा रेशनकार्ड
- मागील ३ महीन्यांचे बँक स्टेटमेंट
- डिजिटल सही आणि फोटो
गुगल पे च्या माध्यमातून लोन मिळवण्याची प्रक्रिया
- गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी अॅप ओपन करा.
- यानंतर मनी ऑप्शनमध्ये लोनचा पर्याय निवडा.
- तुम्हाला येथे विविध प्रकारच्या कर्जाच्या ऑफर दिसतील.
- यामध्ये प्री अप्रुव्ह कर्जाचा पर्याय निवडा.
- येथे तुम्हाला कर्जाची रक्कम आणि परतफेडीची वेळ निवडावी लागेल.
- यानंतर, कर्ज घेण्यासाठी चार्ज पर्यायावर क्लिक करा.
- सर्व तपशील भरल्यानंतर, मोबाइलवर OTP पाठवा.
- तुम्ही अॅपमध्ये ओटीपी टाकताच तुमच्या कर्जाची पुष्टी अॅपद्वारे केली जाईल.
instant loan by google pay गुगल पे वरुन मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी
Google Pay च्या माध्यमातून ग्राहकांना इंस्टंट 15000 हजारांचे कर्ज देखील उपलब्ध कुरुन दिले जाते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो. तुम्हाला Google Pay वरून व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅपवर खाते असणे आवश्यक आहे.
गूगल पे अॅपद्वारे मिळणाऱ्या कर्जाचे फायदे
- सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कागदोपत्री व्यवहारात वाया जाणारा वेळ वाचतो.
- कर्ज घेण्यासाठी कुठेही हेलपाटे मारण्याची गरज नाही.
- मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार
- कर्जाची रक्कम ही कमीत कमी 15 हजार रुपये आहे.
- सॅशे कर्ज घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज पडत नाही.
- तात्काळ मंजुरी मिळून पैसे लगेच बँक खात्यात जमा केले जातात.
- कर्जाची परतफेड ही एकदम सोपी आहे.फक्त 111 रुपये एवढ्या छोट्या हप्त्यांमध्ये परतफेड केली जाऊ शकते.