Facebook-Instagram Down: सध्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि इन्स्टाग्रॅम हे अत्यंत लोकप्रीय ऍप आहेत. येथे जगभरातील करोडो लोकांचे अकाऊंट्स आहेत. जेथे त्यांच्या Identity असतात. अनेकाचे व्यवसाय असतात तर अनेकांना स्वतःची ओळख या व्यासपीठांच्या माध्यमातून तयार करायची असते. परंतु गेल्या काही तासांपासून फेसबूक आणि इंन्स्टाग्राम हे दोन्ही ऍप अनेकांच्या मोबाईलमधून अचानक लॉग आऊट होत आहेत. या सगळ्यामागे नेमके काय कारण आहे हे आपण आपल्या आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Facebook-Instagram Down
घाबरून जाऊ नका
जगभरात एकाच वेळी सगळ्यांचेच Facebook आणि Instagram अकाऊंट्स लॉगआऊट होऊ लागले आणि एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी मेहनतीने फॉलोअर्स जमवलेले verified अकाऊंट्स असे अचानक लॉगआऊट झाल्याने नव्या पिढीतील सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर असो किंवा व्यावसायिक असो सर्वांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे. पण तुम्ही घाबरुन जाऊ नका. याबद्दल Facebook आणि Instagram या दोन्ही सोशल मिडिया कंपन्यांकडून ऑफिशिअल स्टेटमेंट्स येतीलच. परंतु त्यापुर्वी या दोन्ही सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवरील तुमचे अकाऊंट्स सुरु ठेवण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ते या लेखाच्या माध्यमातून समजून घ्या. Facebook-Instagram Down
जुने पासवर्ड बदलू नका
काही तासांपुर्वी जगभरातील सगळ्यांच्याच मोबाईलमधील Facebook आणि Instagram अचानकच लॉगआऊट झाले आणि मोठी खळबळ उडाली आहे. अनेकांना कळत नाहीये की नक्की काय केले पाहिजे. जुना पासवर्ड लॉगीन होत नसल्याने अनेकांनी पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला परंतु बदललेला पासवर्ड देखील स्वीकारला जात नाहीये. Facebook आणि Instagram च्या काही वापरकर्त्यांना असे वाटले की त्यांचे अकाऊंट्स हॅक झाले की काय? पण तसे काहीही झालेले नसून हा एक टेक्निकल error आहे. त्यामुळे हायपर होऊन तुम्ही कोणीही तुमच्या Facebook आणि Instagram अकाऊंट्सचे जुने पासवर्ड बदलू नका. तुमचे हे दोन्ही ऍप्स पुन्हा सुरु ठेवण्यासाठी नेमके काय केला पाहिजे ते आपण पुढे पाहू. Facebook-Instagram Down
FB आणि Insta अकाऊंट पुन्हा सुरु करण्याचा उपाय काय?
फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही ऍप तुम्हाला पहिल्यासारखे सुरु रहावेत तेही तुमच्या जुन्या अकाऊंटवरुन असे वाटत असेल तर अजीबातच घाऊ गडबड करु नका. हे दोन्ही ऍप पुन्हा सुरु करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा. Facebook-Instagram Down
- सर्वात आधी Facebook आणि Instagram हे दोन्ही ऍप तुमच्या मोबाईलमधून डिलीट करा.
- डिलीट करताना uninstall असा पर्याय येईल, त्याची निवड करा. दोन्ही ऍप तुमच्या मोबाईलमधून uninstall करा.
- त्यानंतर मोबाईलमधील Play store मध्ये जा आणि एक एक करुन Facebook आणि Instagram इन्स्टॉल करा.
- आता हे दोन्ही ऍप नव्याने तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतील, तेव्हा तुम्हाला तुमचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल.
- त्यावेळी तुम्ही तुमचा जुनाच लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाका.
- OTP येऊन पुन्हा एकदा तुमची Facebook आणि Instagram हे दोन्ही ऍप्स सुरु होतील. Facebook-Instagram Down
ट्रेंडिंग #facebookdown
सध्या कोणतीही समस्या असो किंवा चांगली बातमी सोशल मिडियावर त्याबद्दल एखादा शब्द ट्रेंड होत असतो. तसेच #facebookdown हे सध्या ट्रेंड होत आहे. तुमच्या देखील मोबाईलमधून तुमचे फेसबूक अकाऊंट्स अचानक लॉगआऊट झाले असेल तर तुम्ही हा हॅशटॅग वापरून तुमचे मत किंवा तुमचा आत्ताच्या काही तासांपुर्वीचा अनुभव इतरांशी शेअर करु शकता.
सध्या सोशल मिडियामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. प्रत्येकजण स्वतःची ओळख या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अनेकांची उपजीविका या सोशल मिडियावरील Facebook आणि Instagram या दोन्ही ऍप्सवर अवलंबून असल्याचे देखील आपल्याला दिसून येते, त्यामुळे हे असे अत्यंत महत्वाचे आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी, त्यांच्या ओळखीशी, त्यांच्या व्यवसायाशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आमदनीशी निगडीत ऍप्स असे अचानक लॉग आऊट व्हायला लागल्यास नक्कीच खळबळ तर माजणारच. आता यापुढे Facebook आणि Instagram या दोन्ही कंपन्यांकडून कोणती अधिकृत माहिती मिळते आहे ते पाहणे आपल्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. #facebookdown