Land record: जमीनीचा मालकी हक्क हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतो कारण आपण राहत असलेली जमिन आपली नसेल तर आपण त्यावर हक्क सांगू शकत नाही, त्यावर शेती करु शकत नाही किंवा त्यावर घर उभारु शकत नाही. म्हणूनच बरेचदा असे प्रसंग येतात की आपल्याला जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करावा लागतो. ग्रामिण भागात असो किंवा शहरी भागात देखील स्वतःच्या मलमत्तेवर हक्क सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. म्हणूनच आम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागतात याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.
जमिनीचे खरेदी खत Kharedi Khat
जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होताना खरेदी खत हे एक कागदपत्र बनवले जाते. जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीत हा प्रथम पुरावा देखील समजला जातो. या जमिनीच्या खरेदी खत कागदपत्रात जमिनीचा व्यवहार कोणत्या तारखेला झाला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला, किती रुपयांसाठी हा व्यवहार झाला याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली असते. मग यापुढे कोणी तुम्हाला खरेदी खत म्हणजे काय? असा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल.
जमिनीचा सातबारा उतारा Satbara Utara (7/12) in Marathi
सातबारा उतारा किंवा 7/12 उतारा हा जमिनीच्या नोंदीशी संबंधीत कागदपत्र आहे. सातबारा उताऱ्याला जमिनीच्या मालकीचा पुरावा देखील म्हटले जाते. शेतजमिनीसाठी, 7/12 उतारा आवश्यक कृषी तपशील असतो. पिकवलेल्या पिकांचे प्रकार, लागवडीखालील जमिनीची व्याप्ती आणि सिंचन स्त्रोतांचे तपशील या सर्व गोष्टींची माहिती या उताऱ्यात नमूद केलेली असते. तसेच जमिनीच्या मालकासंबंधीत देखील संपूर्ण माहिती म्हणजेच जमिनी कोणाकडून कोणाकडे आली किंवा विकली गेली या संदर्भातील माहिती देखील सातबारा उताऱ्यात नमूद केली जाते. त्यामुळे एखादी जमीन कितीही वर्षे जुनी असली तरी त्याचे खरेदीदार आणि विक्रीदार कोण होते ते सर्व या कागदपत्रातून समजते. Land record
जमिनीचा 8 -अ उतारा किंवा खाते उतारा
जमीन ही विविध गट क्रमांकामध्ये विभागलेली असते. या सर्व गटक्रमांकांची एकत्रीत माहिती असलेले कागदपत्र म्हणजे 8- अ प्रमाणपत्र. या 8 – अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमची जमीन कोणकोणत्या गटात विभागली गेली आहे हे समजून येते. आणि एखाद्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करताना हा 8 – अ उतारा पुरावा म्हणून वापरता येतो. Land record
जमीन मोजणीचे नकाशे land map
शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन ती मोजण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घेतली जाते. आणि मालकी हक्काप्रमाणे त्याचे नकाशे बनविण्यात येतात. आता डिजिटलायझेशन मुळे शासनाने अधिकृत नोंदणी असलेले सर्व नकाशे ऑनलाईन प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता कोणालाही घरबसल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळविणे शक्य झाले आहे. तुमच्या देखील जमिनीचा असा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळवून मालकी हक्काचा पुरावा म्हणून तुम्ही तो वापरु शकता. तुम्ही या आधी कधी ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढला नसेल तर तुम्ही https://kopargaonlive.com/land-map-online/ या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती मिळवू शकता.
जमीन महसूल भरलेल्या पावत्या – land receipt
जमीनीच्या मालकाला दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो. हा महसूल भसल्यानंतर तलाठी कार्यालयातून पावती दिसी जाते. ही पावती अत्यंत महत्त्वाची असते. कारण पुढे मागे जमिनीसंदर्भात मालकी हक्क सिद्ध करण्याची वेळ आली तर या पावत्या एक पुरावा म्हणून वापरता येतात. Land record
जमीनीबाबतचे पुर्वीचे खटले
जमिनीसंदर्भात आधीपासून न्यायालयात खटले सुरु असल्यास त्यासंबंधीत कागदपत्रे जपून ठेवा. कारण तुम्हाला तुमच्या जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र पुढे कामी येऊ शकतात. जमिन मालकाचे नाव आणि नोंद असलेला प्रत्येक कागद का अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यात न्यायालयात पुरावा म्हणून वापरला गेलेला किंवा काही खटल्या दरम्याने सादर झालेला कागदपत्र तर अत्यंत महत्त्वाचा असू शकतो. त्यामुळे तुमच्या जमिनीचे आधीपासून काही खटले सुरु असल्यास तुम्ही ते पुरावे जपून ठेवा. पुढे जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी हे पुरावे म्हणून कामी येऊ शकतात. Land record
जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड – land property card
प्रॉपर्टी कार्डला मालमत्ता पत्रक असेही म्हटले जाते. जसे शेतजमिनीच्या मालकी अधिकाराविषयीच्या नोंदी सातबारा उताऱ्यात नमूद असतात तसेच बिगर शेतजमिनीवरील मालमत्तेची नोंदणी, त्यावरील मालकी अधिकार या सर्व बाबी प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रकात नमूद केलेले असतात. प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेतजमिनीतील प्लॅट, बंगला, ऑफिस, फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, मूल्य, शिर्षक, जागेचे क्षेत्रफळ, नोंदणी क्रमांक, कर्ज घेतल्याची माहिती, जमिनीवरील भागीदारी व ती संपत्ति कुणाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे अशी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते.जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. Land record