Hydroponics Farming: आधुनिक शेतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार देणार 50% अनुदान!

तंत्रज्ञानाने गगनभरारी घेतलेली असताना आता शेती व्यवसायात देखील विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. 20-25 वर्षांपुर्वी कोणी म्हटले असते की मातीशिवाय आणि कमी पाण्याच्या उपयोगाने शेती करता येऊ शकते. तर नक्कीच कोणी यावर विश्वास ठेवला नसता. परंतु आता हे शक्य आहे. अनेक देशांनी हे शक्य करुन दाखवले आहे. या प्रकारच्या शेतीला Hydroponics Farming  म्हणजेच हायड्रोपोनिक शेती असे म्हणतात. आपले महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने शेती करण्यासाठी 50%अनुदान देत आहे. आज आपण याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. hydroponic farming subsidy in india

जाणून घ्या Hydroponics Farming म्हणजे नक्की काय?

Hydroponics Farming  ही शेती व्यवसायात क्रांती आणणारी संकल्पना आहे. मातीशिवाय रोपे वाढवण्याच्या पद्धतीला हायड्रोपोनिक शेती करणे असे म्हणतात.  वनस्पतींची वाढ व्हावी म्हणून मातीऐवजी आवश्यक पोषक द्रव्ये पुरवण्यासाठी पोषणयुक्त पाण्याचे द्रावण वापरले जाते.  वनस्पतींची मुळे पाण्याच्या द्रावणात बुडवून ठेवली जातात आणि चांगल्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये योग्य दिली जातात. ही शेती घरामध्ये तसेच घराबाहेर देखील केली जाऊ शकते. पालेभाज्यांपासून ते टोमॅटोपर्यंत विविध प्रकारची शेती करताना ही पद्धत वापता येऊ शकते. परदेशात या अशा प्रकारच्या शेतीला सुरुवात झाली आहे आणि आता आपल्या भारतात देखील अनेक राज्यांमध्ये हायड्रोपोनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. hydroponic farming subsidy in india

कमी पाणी आणि कमी जागेत होणारी शेती

आधुनिक पद्धतीची असलेली हायड्रोपोनिक शेती ही  कमी जागेत करता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी पाणी वापरुन करता येते. पारंपरिक शेतीच्या तुलनेत ही शेती अत्यंत लाभकारक ठरताना दिसून येत आहे. ज्या भागात मर्यादित संसाधने किंवा जमीन कमी आहे किंवा माती कमी आहे अशा भागात अन्न उत्पादन वाढवण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय मानता जात आहे. hydroponic farming subsidy in india

पाईपमध्ये केली जाते शेती

कमी पाणी आणि मातीविना केली जाणारी ही शेती चक्क पाईपच्या मदतीने केली जाते. पाण्यासाठी जे पाईप वापरले जातात त्यांना छिद्रे पाडून वनस्पती पाहेर येईल इतकी जागा ठेवली जाते आणि ही शेती केली जाते. या शेतीसाठी वापरण्यात येणारी रसायने मनवी शरीरासाठी हानीकारक नसल्याचे सांगण्यात येते. तसेच पारंपरिक शेतीच्या तुलनेने या शेतीला कमी जागा लागत असली तरी तुलनेने Hydroponics Farming मधील उत्पन्न लवकर मिळते. hydroponic farming subsidy in india

राज्य सरकार देणार 50% अनुदान

भारत सरकारने नेहमीच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनांची आखणी केलेली आहे. या योजनांती तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हावी म्हणून संबंधीत अधिकारी वर्ग देखील नेमण्यात आलेले आहेत. हायड्रोपोनिक शेतीला राज्या राज्यांमधील शेतकरी समजून घेऊन ही पद्धत आत्मसात करावी यासाठी देखील केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र हायड्रोपोनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातील शेतीचा चेहरा मोहरा बदलेल आणि हायड्रोपोनिक शेती पद्धतीने घेण्यात येणारे उत्पन्न निर्यात देखील केले जाऊ शकते. hydroponic farming subsidy in india

हायड्रोपोनिक शेतीमध्ये पिकांवर फवारणीची गरज नसते

Hydroponics Farming करताना सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पिकांवर कोणत्याही रासायनिक फवारणीची गरज लागत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोग होण्याच्या शक्यता कमी होतात. तसेच बरेचदा दुषित मातीमुळे तीच तत्वे वनस्पतीमध्ये देखील उतरताना दिसुन येतात, परंतु या प्रकारच्या शेतीमध्ये मातीचा उपयोग केला जात नसल्यामुळे कोणत्याही प्रकारे पीक दुषित होण्याची शक्यता नसते. अत्यंत सोपी आणि उपायकारक अशी ही Hydroponics Farming असल्याने शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची शेती करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे असे राज्य सरकारचे उद्देश आहे. त्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून अनुदान जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. https://www.nhb.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही अनुदानासाठी अर्ज देखील करु शकता. अर्ज दाखल करताना तुमचे राज्य निवडायला विसरु नका कारण त्यानुसारच तुम्हाला अनुदानाची टक्केवारी दिली जाणार आहे. hydroponic farming subsidy in india