Free Silai Machine Yojana प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2023 – संपूर्ण माहिती

Free Silai Machine Yojana

Free Silai Machine Yojana – free Sewing machine scheme 2023

भारत सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. महिलांनी आत्मनिर्भर बनावे यासाठी विविध शासकीय योजना आखल्या जातात त्यांतीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2023 free Sewing machine scheme  2023  या योजनेमार्फत ग्रामिण तसेच निमशहरी भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहेत.  

मोफत शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट –

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हे सरकारच्या मोफत शिलाई मशीन योजनेचे 2023 चे उद्दिष्ट आहे. free Sewing machine scheme  2023 या  योजनेमध्ये भारतातील प्रत्येक राज्यामध्ये 50000 हून अधिक गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवण्याचा भारत सरकारचा मानस आहे.

 भारतातील  दुर्बल महिलांना घरबसल्या शिवणकाम करून उत्पन्न मिळवता यावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी शासनाने मोफत शिलाई मशीन योजनेद्वारे कष्टकरी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

मोफत शिलाई मशीनसाठी महिला अर्जदाराची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांचे पती नोकरी करत आहेत त्यांचे उत्पन्न बारा हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये.
  • ज्या महिला आर्थिक आणि दुर्बल गटामध्ये येतात त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे.
  • निराधार महिलांदेखील प्रमाणपत्र सादर करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ही योजना ग्रामीण आणि निमशहरी दोन्ही भागातील महिलांसाठी आहे

शिलाई मशीनसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  1. आधारकार्ड
  2. वयाचा पुरावा
  3. ओळखपत्र
  4. राहण्याचा पुरावा
  5. उत्पन्नाचा पुरावा
  6. अर्जदार अपंग किंवा दिव्यांग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
  7. अर्जदार विधवा असल्यास निराधार प्रमाणपत्र
  8. मोबाईल नंबर
  9. पासपोर्ट आकाराचे फोटे

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया –   free Sewing machine scheme  2023

  • नगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयामधील महिला व बालकल्याण विकास विभागामध्ये  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज  https://www.india.gov.in/ या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावा.
  • सर्व माहिती योग्य व अचूक भरून सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून सर्व कागदपत्रे एकत्र करून ती तलाठी किंवा पंचायत समितीमध्ये सबमिट करा.
  • केलेल्या अर्जाची पोचपावती घ्या.
  • यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जाईल त्या अर्जाची व्यवस्थित पडताळणी होईल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जाई

 मोफत शिलाई मशीन योजनेच्या 2023 free Sewing machine scheme  2023 माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल, तसेच या सिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत होईल यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

मोफत शिलाई मशीन योजनेच्या 2023 free Sewing machine scheme  2023 ही योजना सुरु असलेल्या राज्यांची यादी

  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
  • मध्य प्रदेश
  • गुजरात
  • हरियाणा
  • राजस्थान
  • महाराष्ट्र
  • छत्तीसगड
  • तामिळनाडू
  • बिहार

प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेच्या 2023 free Sewing machine scheme  2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे आणि तुम्ही वयोमानुसार पात्र असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती भरली गेल्यास तुमचा अर्ज रद्द देखील होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या मार्गाने या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करु नका. वेबसाईटवरुन डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर विचारलेली सर्व माहिती भरुन सोबत योग्य ते कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपी जोडा. तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत जोडा. तुमच्या उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रे तपासून तुम्ही या योजनेच्या लाभाची खरोखरच गरज आहे हे अधिकाऱ्यांना समजल्यास तुम्हाला नक्कीच शिलाई मशीन मिळेल. त्यानंतर महिलांनो तुम्ही तुमचा कपडे शिवण्याचा व्यवसाय करु शकता आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकता. आत्मनिर्भर बनू शकता.