get owner details from vehicle number: गाडीच्या नंबरवरुन मालकाचे नाव काढता येईल अगदी 2 मिनिटात

get owner details from vehicle number

आपण प्रवासात अनेकदा अपघात होताना पाहतो. बरेचदा वाहने रस्त्यावर एकमेकांना ठोकली गेलेली असतात आणि त्यात प्रवास करणारी माणसे जखमांनी विव्हळत असतात अशावेळी एखाद्या कारचा अपघात झाल्यास त्या कार चालकाचा पत्ता किंवा कार मालकाची माहिती कशी शोधावी  हे अनेकांना माहिती नसते. म्हणूनत आम्ही अशी काही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की, तुम्ही सहज अपघातात जखमी असलेल्या व्यक्तींची मदत करु शकाल किंवा त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करु शकाल. बरेचदा आपल्याला एखाद्या कारच्या नंबरप्लेटवरुन त्या कारच्या मालकाचे नाव जाणून घ्यायचे असते तर आता हे करणे सहज आणि सोपे झाले आहे. त्याबद्दल अधिक सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. get owner details from vehicle number

मोबाईल ऍपच्या मदतीने शोधा गाडी मालकाचे नाव

तुम्ही तुमच्या मोबाईलमधील ऍपच्या मदतीने गाडी मालकाचे नाव  आणि मोबाईल नंबर शोधू शकता. ते पुढील प्रमाणे

  • सर्वप्रथम  तुम्ही तुमच्या  प्ले स्टोअर वर जाऊन mParivahan हे ऍप डाउनलोड करा.
  • मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड केल्यानंतर ते Install करा आणि ओपन करा.
  • ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल त्याठिकाणी RC या पर्यायावर क्लिक करा.
  •  ज्या गाडीमालकाचे  गाडीच्या मालकाचे नाव पत्त्यासहीत जाणून घ्यायचे आहे त्या गाडीचा नंबर येथे टाकायचा आहे. गाडी नंबर टाकल्यानंतर सर्च बार वर क्लिक करा.
  • तुम्हाला त्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता हि सर्व माहिती समोर दिसेल. get owner details from vehicle number

 मेसेजकरुन मालकाचे नाव आणि पत्ता काढा

बरेचदा मोबाईलमध्ये डाटा नसल्याने ऍपचा वापर करता येत नाही अशावेळी तुम्ही गाडीच्या नंबर प्लेटवरुन गाडी मालकाची माहिती मिळविण्यासाठी  मेसेजचा वापर करुन शकता. तुमच्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसेल तर हा पर्याय तुमच्यासाठी फार फायदेशीर आहे. आणि सर्वाच महत्त्वाचे म्हणजे सुविधा तुम्ही 24 तास वापरु शकता.

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोनच्या  मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटरमध्ये VAHAN असे टाईप करा.
  • त्यानंतर  स्पेस देऊन ज्या गाडीच्या मालकाचे नाव शोधायचे आहे त्या गाडीचा नंबर टाका.
  • तुम्ही टाईप केलेला मेसेज 7738299899 या नंबर वर पाठवा.
  • मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी काही सेकंदातच ID Vahan कडून मेसेज येईल.
  •  ज्यामध्ये गाडी नंबर असलेल्या मालकाचे नाव आणि पत्ता लिहिलेले असेल.

अधिकृत शासकीय वेबसाईटच्या मदतीने गाडी मालकाचे नाव आणि पत्ता पहा

तुम्हाला परिवहन ऍप तुमच्या मोबाईलमध्ये नससेल आणि ते ऍप डाऊनलोड करण्यात वेळ घालवाचा नसेल तर तुम्ही  वेबसाईटच्या मदतीने देखील गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाचे नाव अगदी 2 मिनिटात शोधून काढू शकाल get owner details from vehicle number

  • सर्वप्रथम तुम्ही  vahaninfos.com या लिंकवर क्लिक करा.
  • तेथे एक वेबसाईट ओपन होईल.
  • तेथे खालच्या बाजूला गाडीचा नंबर टाकून कॅपचा भरा.
  • समोर दिसत असलेला कॅपचा भरुन झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा.
  • अगदी काही क्षणातच तुम्हाला गाडीच्या ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव आणि पत्ता मिळेल.

या तीन पर्यायांचा वापर करुन तुम्ही भारतातील कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन त्या गाडीच्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता गाडीचे रजीस्ट्रेशन कोणत्या शहरात झाले ही सर्व माहिती जाणून घेऊ शकाल. इतकेच नाही तर अनेक पत्रकार बॉलिवूड मधील नट नट्यांच्या नावावरील गाड्यांचे नंबर शोधून काढतात आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या गाडीच्या मागे पळतात इतकेच नाही तर अनेक क्रिकेट प्रेमींना देखील त्यांच्या आवडत्या क्रिकेटरने कोणती कार घेतली हे जाणून घ्यायचे असते. बरेचदा क्रिकेटर्स बसलेल्या कार्सचे नंबर टाकून देखील तपासले जातात ती गाडी कोणाच्या नावावर आहे. तुम्ही देखील या सर्व ट्रिक्स करु शकता आणि तुम्हाला हव्या त्या गाडीच्या नंबर वरुन त्या गाडीच्या मालकाचे नाव पत्ता शोधून काढू शकता. get owner details from vehicle number