How to start Papad business कमी बजेटमध्ये पापड व्यवसाय सुरु करा, भरघोस नफा कमवा

How to start Papad business

How to start Papad business पापड हा असा पदार्थ आहे जो जगभग खाल्ला जातो. ज्याची मगणी देखील मोठी आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, छोटी दुकाने, खानावळी सगळ्याच ठिकाणी जेथे जेवण दिले जाते अशा ठिकाणी पापडाची मागणी असतेच असते. त्यामुळे या व्यवसायाचे महत्त्व देखील तितकेच टिकून आहे. अगदी कमी बजेटमध्ये सुरु करता येणारा हा व्यवसाय भरघोस नफा मिळवून देणारा आहे. म्हणूनच आज पापड बनविण्याच्या व्यवसायासंबंधी माहिती या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. .

How to start Papad business पापड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल

कोणताही व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो व्यवसायातील प्रोडक्ट बनवताना लागणारा कच्चा माल.  तुम्ही कोणत्या प्रकाराचे पापड बनवणार आहात त्यावर तुम्हाला कच्चा माल खरेदी करावा लागतो. तुम्ही उडदाचे पापड बनवणार असाल तर उडिद डाळ, काळी मिरी, खार हा कच्चा माल लागतो, तांदळाचे पापड बनवायला तांदूळ, नाचणीचे पापड बनवण्यासाठी नाचणी असा कच्चा माल लागतो, डाळी किंवा धान्य दळून स्वतःच आणणे जास्त चांगले असते. कारण बाजारातून तयार पिठ घेऊन पापड करायचा विचार करीत असाल तर ते चुकीचे ठरेल कारण हल्ली बाजारात भेसळ युक्त पिठे विकली जातात. त्यामुळे सर्वात चांगले की जवळच्या बाजारातील होलसेल मार्केटमध्ये जाऊन लागणारी डाळ किंवा धान्य आणावे आणि घरीच त्याचे पिठ बनवावे. Papad business

पापड बनविण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी किती खर्च येतो?

बाजारात तुम्हाला पापड बनविण्याचे यंत्र हे 5000 पासून ते 1 लाख रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. तुम्ही तुमच्या बजेट आणि पाप़ड व्यवसायाच्या क्षमतेप्रमाणे मशिन खरेदी करु शकता. Papad Making Machine

पापड व्यावसायासाठी मनुष्यबळ किती लागते

अगदी दोन ते तीन जणांमध्ये सुरु करता येणारा हा व्यवसाय आहे. पापडाचे पिठ मळून त्याचे गोळे तयार करुन मशिनवर पापड बनवण्याच्या कामासाठी किमान तीन जणांची गरज असते. घरच्या घरी सुरु करता येणारा हा व्यवसाय असून घरातील सदस्य देखील यामध्ये मिळून काम करु शकतात . पापडांची मागणी वाढल्यानंतर मात्र दोन ते तीन शिफ्टमध्ये काम सुरु ठेवण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागते. परंतु सुरुवातीला तीन जणांमध्ये हा व्यवसाय सुरु करता येतो.

पापड व्यवसाय नोंदणी आणि परवाना Register your business

व्यवसाय करताना त्याची नोंदणी असेल तर तुम्हाला त्याचा कंपनी बनवण्यासाठी फायदा होतो आणि तुमचे प्रॉडक्ट सुद्धा विश्वसनीय मानले जाते. पापड व्यवसाय करताना  मशिनरी वापरत असाल्याने त्यासाठी परवाना घेणे आवश्यक असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्याबाबत परवाना मिळवावा लागतो.  तुमचा पापड व्यवसाय कायद्यानुसार नोंदणी करुन घेणे आवश्यक असते. पापड हा एक अन्न  पदार्थ असल्याने FASSI  म्हणजेच Food Safety and Standards Authority of India ची नोंदणी व्यवसायासाठी आवश्यक ठरते.  करणे देखील आवश्यक आहे. Papad business

पापड व्यवसायातून नफा किती मिळतो? Benefits from Papad biasness

पापड हा असा पदार्थ आहे ज्याची जगभर मागणी आहे. परंतु बाजारात सध्या विविध प्रकारचे आणि विविध चवीचे पापड उपलब्ध असल्याने तुम्हाला तुमची वेगळी चव आणि दर्जा जपावा लागेल. म्हणजे  पापडांची गुणवत्ता आणि चव लोकांना आवडली तर नक्कीच तुमच्या प्रोडक्टला मागणी वाढेल. तरीही साधारण 35 ते 40 हजार रुपये या व्यवसायातून घरातून देखील काम करुन कमवता येतात. पापड बनवण्याची मशीन छोटी असल्याने त्याला जागा जास्त लागत नाही, फक्त पापड वाळण्यासाठी जागा लागते, त्याचा तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल किंवा पापड ड्रायर मशीन देखील बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या वापराने तुम्ही झटपट पापड सुकवू शकता.

पापड व्यवसायाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग

पापडाची चव आणि गुणवत्ता राखल्याने आपोआपच तुमच्या प्रोडक्टला मागणी येते, परंतु त्यासाठी पापडाचे ब्रँडिंग देखील करणे महत्त्वाचे ठरते. कारण हल्ली ग्राहकांची मानसिकता असते की जे जास्त विकले जाते किंवा जे जास्त दुकानांमध्ये दिसते त्याचा दर्जा चांगला असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोडक्टच्या मार्केटिंग देखील चांगले करावे लागेल.

सध्या बाजारात पापड बनवणाऱ्या काही मोठ्या कंपन्या आहेत जसे की, लिज्जत पापड,  हल्दीराम पापड,  अग्रवाल पापड. या कंपन्या मार्केटमध्ये पापड विकून चांगला नफा कमावतात.  तुम्ही बनवलेले गुणवत्ता पुर्ण आणि चांगल्या चवीचे पापड ग्राहकांना एकदा आवडू लागले की आपोआपच तुमच्या पापडांना मागणी वाढेल आणि भरघोस नफा देखील मिळू लागेल.