Get owner details from Vehicle number: गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे?

Get owner details from Vehicle number सध्या आपण घरातून बाहेर पडलो की आपल्याला अनेक विविध कंपन्यांच्या गाड्या दिसतात.  Ola, Uber या खाजगी कंपन्यांच्या ट्रान्सपोर्ट लायसन्स गाड्या देखील असतात आणि पर्सनल खाजगी कार्स चारचाकी आणि दोनचाकी वाहनाची आपल्याला रस्त्यांवर वर्दळ दिसून येते. भारतात अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या दिवसागणित मोठे रुप धारण करत आहे. या गाड्यांच्या नंबरवरुन आपण गाडीमालकाची माहिती मिळवू शकतो.

डिजिटल क्रांतीमुळे आपल्याकडे आता सर्वच शासकीय माहिती ऑलाईन स्वरुपात प्राप्त होते, तसेच शासकीय सुविधा देखील ऑनलाईन स्वरुपात आपल्याला पहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे आपण कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन त्याच्या मालकाचे नाव माहित करुन घेऊ शकतो.  Get owner details from Vehicle number

गाडीच्या नंबर वरुन मालकाचे नाव आणि पत्ता कसा काढायचा?

चारचाकी, दुचाकी वाहन असो किंवा कोणतेही वाहन असो त्या वाहनाच्या नंबर वरुन आपण वाहनाच्या मालकाचे नाव, पत्ता काढू शकतो. वाहन मालकाची माहिती काढण्यासाठीच्या तीन पद्धती उपलब्ध आहेत. त्यांतील तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही अवलंबू शकता.  Get owner details from Vehicle number

मोबाईल ऍपचा वापर करुन वाहन मालकाचे नाव आणि पत्ता काढणे

  • सर्वातआधी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जाऊन mParivahan नावाचे ऍप डाउनलोड करा. ऍप तुमच्या मोबाईलमध्ये Install करा व ओपन करा.
  • ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर डॅशबोर्ड दिसेल. तेथील RC या पर्यायावर क्लिक करुन गाडीचा नंबर टाका.
  • तुम्हाला ज्या गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता माहित करुन घ्यायचा आहे त्या गाडीचा नंबर तेथे टाकल्यानंतर काही सेकंदातच तुमच्यासमोर गाडीमालकाची सर्व माहिती येते.  Get owner details from Vehicle number

मेसेजच्या माध्यमांतून वाहन मालकाचे नाव आणि पत्ता काढणे

  • तुमच्या मोबीलमध्ये इंटरनेट डाटा नसेल आणि तुम्हाला एखाद्या वाहनाच्या नंबरवरुन त्या वाहनाच्या मालकाचे नाव शोधून काढायचे असल्यास शासानाची अजून एक सुविधा कार्यरत आहे.
  • तुम्ही तुमच्या मोबाईलमधून मॅसेज पाठवून एखाद्या वाहनाच्या नंबर वरुन त्या वाहनाच्या मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेऊ शकता.
  • हि सुविधा तुम्ही २४ तास वापरु शकता. 
  • तुम्ही तुमच्या मेसेज बॉक्समध्ये कॅपिटल लेटरमध्ये VAHAN असे टाईप करा. मग स्पेस देऊन गाडीचा नंबर टाका. हा मेसेज 7738299899 या नंबर वर पाठवा. (उदा: VAHAN <space> गाडीचा नंबर)
  •  मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला ID Vahan कडून एक मेसेज येईल. ज्यामध्ये गाडी नंबर असलेल्या मालकाचे नाव आणि पत्ता तुम्हाला पहायला मिळेल. Get owner details from Vehicle number

 वेबसाईटच्या माध्यमातून वाहन मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेणे.

  • वेबसाईटच्या मदतीने तुम्ही फक्त काही सेकंदात  गाडीचा नंबर टाकून  वाहन मालका विषयी संपूर्ण माहिती मिळवू  शकता.
  • vahaninfos.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही वेबसाईटवर जा.
  • तुम्हाला ज्या वाहनाविषयी माहिती हवी आहे, त्याचा नंबर टाकून खाली दिलेला कॅपचा भरा
  • कॅपचा भरुन झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा.  तुम्हाला गाडीच्या नंबर वरुन गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता ही सगळी माहिती मिळेल.
  •  गाडीचा अपघात झाल्यानंतर लोक पळून जातात. अशा वेळी त्या गाडीचा नंबर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि पोलिसांना मदत देखील करु शकतो.
  • आपण मार्केटमध्ये सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करायला जातो तेव्हा जी सेकंड हॅन्ड गाडी आवडली आहे ती नक्की कोणाची होती, केव्हा घेतली होती तसेच गाडीला किती वर्षे झाली आहेत या संदर्भात सर्व माहिती आपल्याला मिळू शकते.
  • एखाद्या गाडी मालकाचे नाव आणि पत्ता जाणून घेण्यासाठी इंटरनेट डाटाची देखील गरज नाही, तुम्ही मॅसेजच्या माध्यमातून देखील वाहन मालकाचे नाव आणि पत्ता मिळवू शकता.

1 thought on “Get owner details from Vehicle number: गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे?”

Comments are closed.