NAMO Drone Didi scheme: 8 लाख रुपयांचे अनुदान देणारी ड्रोन दीदी योजना 2024 नक्की आहे तरी काय?

NAMO Drone Didi scheme केंद्र शासन महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी विविध योजनांची आखणी करीत आहेत. तसेच केंद्र शासनाचा ग्रामिण भागातील बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून देण्याकडे जास्त कल असल्याचे अनेक योजनांच्या निर्णयानुसार दिसून येते. तशीच एक योजना म्हणजे ‘ड्रोन दीदी योजना’. या योजनेचे स्वरुप आपण आजच्या आपल्या या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

ड्रोन दीदी योजनेची सुरुवात कधी करण्यात आली?

दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र शासनातर्फे ड्रोन दीदी या योजनेची सुरुवात करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. म्हणून या योजनेला NAMO Drone Didi scheme असे देखील म्हटले जाते.  संपूर्ण भागतातील विविध राज्यांमधील तब्बल 15 हजार महिला बचत गटांना नमो ‘ड्रोन दीदी’ कार्यक्रमाशी जोडले जाणार आहे.

काय आहे नमो ड्रोन दीदी’ योजना 2024  – NAMO Drone Didi scheme

शेतकऱ्यांना शेतीची पाहणी करण्यासाठी, शेतातील पिकांवर खतांची फवारणी करण्यासाठी, किटनाशकांची फवारणी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरज असते. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे ड्रोन. या ड्रोनच्या माध्यमातून शेतीची बरीच कामे सोपी होतात, परंतु याची किंमत खूप जास्त असते, त्यामुळे ते एकरकमी खर्च करुन शेतकऱ्यांना विकत घेणे शक्य नसते, म्हणूनच केंद्र शासनाने अशी योजना आणली की, राज्या राज्यांमधील महिला बचत गटांना अनुदान देऊन हे नव्या तंत्रज्ञानाने युक्त असलेले ड्र्रोन विकत घेण्यासाठी मदत करावी. आणि शेतकऱ्यांना हे ड्रोन भाडे तत्वावर उपलब्ध करुन द्यावे. यामुळे दोन कामे साध्य होतात एक म्हणजे शेतकऱ्यांना कमी किमतीत त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेले ड्रोन उपलब्ध होऊ शकतात आणि दुसरे म्हणजे बचत गटांतील महिलांना रोजगार देखील मिळू शकतो. अशा या योजनेला नमो ‘ड्रोन दीदी’ योजना असे नाव देण्यात आले आहे. NAMO Drone Didi scheme

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी मिळणार?

ड्रोन दीदी योजनेअंतर्गत  ड्रोन आणि ड्रोनसंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा  किमान  8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून महिलांना दिली जाणार आहे.

ज्या भागात  आर्थिकदृष्ट्या  ड्रोनचा वापर करणे शक्य आहे त्या  भागातल्या महिला बचत गटांची  शासकीय अधिकाऱ्यांमार्फत निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना ड्रोन पुरवले जाणार आहेत. संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरविण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.

ड्रोनच्या मदतीने केली जाणारी शेतीची मुख्य कामे

शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे ड्रोन हे 50 ते 60 फूट उंच आणि 2 किलोमीटर दूर पर्यंत उडू शकतात. या ड्रोनच्या मदतीने शेतीची विविध कामे करणे शक्य असते, नेमकी ही कोणती कामे आहेत ती आपण समजून घेऊया.

  • ड्रोनच्या मदतीने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे 3-D नकाशे तयार करता येतात.
  • ड्रोनचा वापर करुन शेतातील पिकांवर खतांची फवारणी करता येते.
  • ड्रोनच्या मदतीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव  झाल्यास आहे, कीडनाशकाची फवारणी देखील करता येते.
  • ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सरच्या मदतीने पिकांचे देखभाल आणि मातीचे योग्य परिक्षण करता येते.
  • ड्रोनवर बरवण्यात आलेल्या  कॅमेरा आणि सेन्सरच्या  मदतीने शेतातील जमिनीच्या कोरड्या भागाचा शोध लावून तेथे पाण्याचा  पुरवठा करता येतो. त्यामुळे शेतात विनाकारण होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. NAMO Drone Didi scheme

केद्र शासनाच्या माध्यमातून ड्रोन दीदी योजना, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीएम किसान मानधन योजना, कृषी सोलर पंप योजना अश्या अनेक योजना शेतकरी बांधवासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरु करुन त्याची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांअंतर्गत शासनातर्फे  अनुदान तसेच आर्थिक मदत केले जाते. शासन शेतकऱ्यांना मदत होईल अशा योजना राबवत असल्याने शासनाचे 2030 पर्यंत देशात मोठ्या प्रमाणात अन्नधान्या पिकविण्याचे ध्येय असल्याचे दिसून येत आहे. अशा कृषीप्रधान योजनांसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या NAMO Drone Didi scheme