Land record: मित्रांनो आत्ताच्या काळात शेतजमिनीचे भाव गगनाला भीडत चालले आहेत. म्हणूनच अनेक नागरिक जमीन घेऊन आपली गुंतवणूक करतात. जमीन घेऊन ठेवली तर ते दुसऱ्या पिढीला उपयोगी पडेल या विचाराने अनेकजण जमिन विकत घेतात. परंतु जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या जमिनीचे दर देखील माहिती असणे आवश्यक असत. हे दर सरकारने ठरवलेले असतात. या शासकीय दरांपेक्षा कमी दराने आपण जमीन खरेदी विक्री करु शकत नाही. आज आपण आपल्या जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात आणि कोठे पाहता येतात याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत.
आपल्या जमिनीचे सरकारी दर कोण ठरवतात?
भारतात प्रत्येक राज्यात महसूल विभाग असतो. या महसूल विभागामार्फतच त्या त्या राज्याच्या जमिनींचे दर ठरवले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता कोणत्याही राज्यातील किंवा कोणत्याही राज्याच्या जिल्ह्यातील जमिनींचे दर ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. अनेकांना असा प्रश्न पडला असले की हे रेडीरेकनरचे दर नक्की कोण ठरवत असेल. आणि कशाच्या आधारे हे दर ठरवले जात असतील. तर त्यासाठी आपण पुढील माहिती पाहू. Ready Reckoner Rates in Maharashtra for 2022
- राज्यातील जमीनीचे आणि मालमत्तेचे शासकीय दर महाराष्ट्र महसूल विभागामार्फत ठरवले जातात.
- प्रत्येक भागाचा सर्वे करुन जमिनीचे दर ठरवले जातात.
- एखाद्या जमिनीतून शासकीय प्रकल्प जाणार असेल तर ज्यांच्या जांच्या जमिनी गेल्या आहेत रेडी रेकनरच्या दरांपेक्षाही जास्त किंमतीने पैसे शासनाकडून दिले जातात.
- शासनातर्फे हा नियम तयार करण्यात आला आहे कारण ज्यांच्या जमीनी शासकीय प्रकल्पांमध्ये गेल्या आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये
- एखाद्या शासकीय प्रकल्पासाठी जमीन मिळविली जाते, त्या भागातील प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून तेथील नागरिकांना रेडीरेकनच्या दुप्पट तिप्पट दर दिला जातो.
जमिनीचे सरकारी दर मिळवणे झाले सोपे
हल्ली सर्वांनाच घरच्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने माहिती मिळवायची असते. त्यासाठी आपल्या राज्यातील कोणत्याही भागातील जमिनीचे शासकीय दर मिळवताना वाटते की सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने व्हावे. म्हणूनच शासनाने रेडीरेकनर चे दर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात फेऱ्या मारणे टाळता येते. तसेच बरेचदा जमिनीचे दर मिळविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून पैसे देखील मागितले जात या जमिनीचे ऑनलाईन पद्धतीने दर मिळविण्याच्या सुविधेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.
ऑनलाईन जमिनीचे दर काढणे
- तुम्हाला तुमच्या जमिनीचे शासकीय दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम संबंधीत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- https://igrmaharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग या अधिकृत वेबसाईटला भेट द्या,
- ज्या जमिनीचे शासकीय दर तुम्हाला काढायचे आहेत त्याचा तालुका, गाव, गट क्रमांक ही सर्व माहिती भरा आणि तुमच्या जमिनीचे दर मिळवा. Land record
जमीन कशी मोजली जाते? ते पाहू
जमीन मोजण्याची एक पद्धत असते, त्यानुसारच जमिनीचे दर ठरवले जातात. जमिनीचे दर ठरवतातना चौरस फुट, गुंठा, एकर अशी मापने आहेत. तुम्ही कोणत्याही राज्यात गेलात तरी ही परिमाण बदलत नाहीत. आणि शासकीय पद्धतीने देखील जमिनीचे दर ठरवताना हीच परिमाणे लक्षात घेतली जातात. परंतू 1 एकर म्हणजे नक्की किती जमीन हे बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यासाठी आपण पुढील माहिती दिली आहे. ती नीट समजून घ्या आणि तुमच्या शेतजमिन किंवा बिगर शेतजमीन असेल तरी जमिनीचे मोजणी करुन घ्या.
● 1 गुंठा म्हणजे किती 1089 चौरस फूट
● 33 फूट x 33 फूट – 1089 चौरस फूट
● 1 एकर म्हणजे 40 गुंठे
● 1 हेक्टर 100 गुंठे
● 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर
● 1 चौ.मी. म्हणजे 10.76 चौ. फु