IDBI Bank Recruitment 2024 बँकेत नोकरी असणे ही अत्यंत सन्मानाची गोष्ट समजली जाते. कारण बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधा मिळतात. तसेच करामध्ये सवलत, 2 टक्क्याने गृहकर्ज मिळते. त्यामुळे अनेक तरुण बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असता. तुम्ही देखील असे स्वप्न पाहत असाल तर IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चला तर मग पाहूया या बँकेची माहिती आणि भरतीची प्रक्रीया.
IDBI म्हणजेच Industrial Development Bank of India Limited इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड या बँके अंतर्गत उमेदवारांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर junior assistant manager या पदासाठीच्या 500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती मिळविणार आहोत. IDBI Bank Recruitment 2024
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी कधी जाहिरात करण्यात आली?
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासंबंधी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024पासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छूक तरुणांनी हा लेख काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या IDBI Bank Recruitment 2024
IDBI बँकेतील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख
IDBI बँकेतील भरतीसाठीचा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. 12 फेब्रुवारी पासून अर्जदार अर्ज करु शकणार आहेत. आणि 26 फेब्रुवारीला आता अगदी काहीच दिवस बाकी असल्याने तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात करा.
IDBI बँकेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कला, वाणिज्य, विज्ञान यापैरीकोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. IDBI Bank Recruitment 2024
IDBI बँकेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 25 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
IDBI बँकेतील ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठीची भरती प्रक्रिया
IDBI या बँकेच्या निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. या ऑनलाईन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे. या बँकेसाठी होणारी ऑनलाइन परीक्षा Objective प्रकारची असणार आहे.
IDBI बँकेतील पदासाटी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे शुल्क किती असेल?
IDBI बँकेतील भरतीसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून पुढील प्रमाणे शुक्ल असणार आहेत.
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200/- रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
- इतर वर्गांतील उमेदवारांसाठी 1000/- रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
IDBI बँकेत अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या
IDBI बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर पुढील प्रमाणे ही अर्ज प्रक्रिया असून ही अर्ज प्रक्रिया समजून घ्या आणि तुम्ही अर्ज करा. IDBI Bank Recruitment 2024
- सर्वप्रथम IDBI बँकेच्या http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाईटच्या होम पेजवर जा आणि करिअर लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर current openings या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर परीक्षेचा फॉर्म ओपन होईल तो काळजीपूर्वक भरा.
- फॉर्म भरताना योग्य कागदपत्रे सोबत अपलोड करा.
- वरील माहितीत सांगितल्या प्रमाणे आरक्षित असाल तर 200 रु शुल्क आणि इतर प्रवर्गातील असाल तर 1000 रु. परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
- पुन्हा एकदा संपुर्ण फॉर्म योग्य पद्धतीने भरला असल्याची खात्री करुन घ्या. आणि तुमचा फॉर्म सबमीट करा.
- तुम्ही भरलेल्या फॉर्मची एक प्रिंटआउट घ्यायला विसरु नका.
अशा पद्धतीने तुम्ही IDBI बँकेच्या ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठ अर्ज करु शकता. IDBI Bank Recruitment 2024
आमचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजून तुम्हाला कोण कोणत्या विषयावरील लेख वाचायला आवडतील ते देखील आम्हाला कळवत रहा. तुमच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. IDBI Bank Recruitment 2024