Track your mobile using find my device app तुमचा मोबाईल हवण्याआधी वापरायला सुरु करा फाईंड माय डिवाईस ऍप; तुमच्या मोबाईलचे लोकेशन 1 सेकंदात ट्रॅक करा

Track your mobile using find my device app कधी बसमध्ये तर कधी बाजारात तर कधी मित्राच्या घरी बरेचदा आपल्याकडून किंवा आपल्या कुटुंबियांकडून फोन विसरला जाऊ शकतो. अनेकदा तर फोन चोरी होतो, कारण हल्ली फोन चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या आपल्या आजूबाजूला फिरताना दिसतात.  मग अशावेळी नवा फोन घेण्याशिवाय पर्याय नसतो परंतु आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही माहिती घेऊन आलो आहोत की तुम्हाला नवीन फोन घ्यायची गरज लागणार नाही. तर तुमचा जुना फोन अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही स्वतः शोधून कढू शकता. चला तर मग पाहूया कोणती आहे ती आयडीया. Track your mobile using find my device app

Find my Device वापरुन असा शोधा तुमचा फोन

Find my Device या फिचर्सचा वापर करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंट वरुन एँड्रॉइड फोन सेटअप करा म्हणजे Find my Device तुमच्या फोनवर आपोआप एक्टिवेट होईल. या फिचरचा वापर करुन तुम्ही तुमच्या फोनवर मोठ्याने रिंग प्ले करु शकता. फक्त तुम्ही हरवलेल्या फोन पासून इतक्या अंतरावर उभे रहा की जेथून तुम्हाला रिंग ऐकू येईल.

  • तुमच्या संगणकाच्या डेस्कटॉपवर किंवा दुसऱ्या मोबाइल बेव ब्राऊजर ओपन करा आणि android.com/find या लिंकवर क्लिक करा.
  • तुमच्या हरवलेल्या मोबाइलमध्ये ज्या गुगल अकाऊटने  साइन इन केलेले आहे त्या अकाऊंटने तुम्ही तुमच्या डेस्कटॉप किंवा दुसऱ्या डिवाईसमध्ये  साइन इन करा.
  • साइड बारमधून हरवलेल्या फोनची च्या मॉडेलची निवड करा
  • त्यानंतर ‘Play Sound’ मेनूची निवड करा.
  • हे फिचर तुम्हा वापरताच तुमच्या हरवलेल्या अँड्रॉइड फोनवर मोठ्याने रिंग वाजू लागेल जरी तुमचा फोन सायलेंटवर असला तरी देखील ही रिंग वाजतच राहील. इतकेच नाही तर ही रिंग 5 मिनिटे सुरुच राहील.
  • मोबाइलवर पॉवर बटन प्रेस करून किंवा फाईंड माय डिवाइसवर stop ringing  प्रेस करून देखील रिंग बंद करता येईल.
  • अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे वैशिष्ट्य वापरताना Device located हे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मोबाईलवर दिसले पाहिजे. Track your mobile using find my device app

अशा पद्धतीने तुमच्या फोनची सेटिंग करुन ठेवा

आज आपण वापरतो तो प्रत्येक फोन स्मार्ट फोन आहे. सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्यात हातात स्मार्टफोन दिसतो. त्यामध्ये गुगल हा एक असा पर्याय आहे जो डिजिटलायझेशन च्या दिशेने प्रत्येकाला घेऊन जातो. गुगलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे गुगलचे ऍप आणि सर्वर सर्वच ठिकाणी गुगल कंपनी ऍडव्हान्स फिचर्स लाँच करीत असते. काळानुसार आणि ग्राहकांच्या गरजांनुसार बदलत असते. त्याचाच एक भाग म्हणजे गुगल मॅप. आज गुगल मॅपच्या मदतीने आपण हवे तिथे आणि हव्या त्या मार्गाने जाऊ शकतो. जगभरातल सगळीकडेच गुगल मॅपने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. परंतु तुम्हाला हे  माहित आहे का? की, गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन शोधू शकता. ते पुढील प्रोसेसच्या मदतीने Track your mobile using find my device app

  • तुम्ही तुमच्या मोबाईलमधील गुगल ऍपमध्ये तुमचे लोकेशन तुमच्या जवळच्या किंवा तुम्हीच वापरत असलेल्या दुसऱ्या मोबाईलवर शेअर करुन ठेवा.
  • जर का तुमचा मोबाईल हरवला तर तुम्ही अगदी सहजपणे गुगल लोकेशनच्या मदतीने तुमचा मोबाईल शोधून काढू शकाल.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे या ऍपमुळे अनेकांनी त्यांचे हरवलेले फोन शोधून काढले आहेत आणि ज्यांचे ज्यांचे फोन ते काही कारणांनी एखाद्या ठिकाणी विसरले होते ते परत मिळाले आहेत. Track your mobile using find my device app