Reliance SBI Card: दिवाळी आधीच बाजारात आले रिलायन्स एसबीआय कार्ड, ग्राहकांना मिळणार जबरदस्त ऑफर्स

Reliance SBI Card

Reliance SBI Card स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. तसेच ही बँक म्हणजे ग्राहकांना प्युअर-प्ले क्रेडिट देणारी अत्यंत विश्वसनीय बँक मानली जाते. या बँकेसोबत भारतातील आघाडीची रिटेलर कंपनी रिलायन्स रिटेल यांनी हातमिळवणी करीत रिलायन्स एसबीआय कार्ड लाँच केले. Reliance SBI Card  हे एक-प्रकारचे जीवनशैलीसंबंधित क्रेडिट कार्ड  आहे. अगदी सर्वसाधारण ते प्रीमियम गटात मोडणाऱ्या ग्राहकांच्या विविध गरजांचा विचार करुन ग्राहकांच्या फायद्याचा खरेदी अनुभव देण्यासाठी हे कार्ड लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Reliance SBI कार्डधारकांना रिलायन्स रिटेलच्या व्यापक आणि वैविध्यपूर्ण इकोसिस्टममध्ये व्यवहार करताना रिवॉर्ड्स आणि फायदे अनलॉक करण्यास सक्षम करते, फॅशन आणि लाईफस्टाईलपासून ते किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ते फार्मा, फर्निचर ते दागिने आणि बरेच खरेदी पर्याय कार्डवर उपलब्ध आहेत. याशिवाय, रिलायन्स एसबीआय कार्ड वापरकर्ते एसबीआय कार्डद्वारे सुरू असलेल्या विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या ऑफरचा आनंदही घेऊ शकतात. (Reliance SBI Card)

रिलायन्स एसबीआय कार्डचे वैशिष्ट्य –  Features of Reliance SBI Card

हे कार्ड दोन प्रकारांमध्ये ग्राहकांना देण्यात येणार आहे.  त्यात रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम  असे प्रकार आहेत. या दोन्ही कार्डचा वापर करुन फॅशन आणि लाइफस्टाइलपासून ते किराणा सामान, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ते फार्मा, फर्निचर ते दागिने आणि बऱ्याच गोष्टी खरेदी करताना ग्राहकांना ऑफर्स मिळणार आहे, खरेदीवर सूट देखील मिळणार आहे.

रिलायन्स एसबीआय कार्डचे सुरुवातीचे चार्जेस काय असणार आहेत? Charges of Reliance SBI Card

  • रिलायन्स SBI कार्ड PRIME 2999 रुपये + कर
  • रिलायन्स एसबीआय कार्ड 499 रुपये + कर

कार्डधारकाने एका वर्षात रिलायन्स एसबीआय कार्ड PRIME वर 3 लाख रुपयांची एकूण खर्च मर्यादा गाठल्यास कार्डचे नूतनीकरण शुल्क माफ केले जाऊ शकते. रिलायन्स एसबीआय कार्डसाठी ही मर्यादा एका वर्षात 1 लाख रुपये आहे.

रिलायन्स एसबीआय कार्डचे फायदे Benefits of Reliance SBI Card

  • 3 लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क माफ केले जाईल असे सांगण्यात येत आहे. 
  • ओपनिंग ऑफर अंतर्गत ग्राहकांना 3000 रुपयांचे रिलायन्स रिटेल व्हाउचर देखील मिळणर आहे.
  • तसेच 11,999 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर विविध रिलायन्स ब्रँडसाठी उपलब्ध असतील.
  •  या कार्डवर 8 देशांतर्गत आणि 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांचे लाउंज फायदे ग्राहकांना मिळणार आहेत.
  • बुक माय शोवर दर महिन्याला 250 रुपये किमतीचे चित्रपटाचे तिकिटही रिलायन्स एसबीआय कार्डसोबत मोफत मिळेल.
  • सर्व पेट्रोल पंपांवर सवलत मिळेल. पेट्रोल पंपावरील खर्च 500 ते 4000 रुपयांच्या दरम्यान असावा (यात जीएसटी आणि इतर शुल्क समाविष्ट नसतील).

ग्राहकांना विशेष लाभ देण्यासाठी आणि ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्डने भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत, रिलायन्स रिटेल ग्राहक एसबीआय कार्डच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना ट्रॅव्हल आणि मनोरंजनसह इतर अनेक क्षेत्रात लाभ मिळतील.

रिलायन्स एसबीआय कार्ड लाँच करणाऱ्या रिलायन्स रिटेल बाबत जाणून घेऊ

रिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कॉर्पोरेट कंपनी  रिलायन्स रिटेलकडे एकाच ठिकाणी कंझमशन बास्केटमध्ये स्टोअर्स आणि डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. प्रमुख किरकोळ ब्रँड्समध्ये रिलायन्स स्मार्ट, स्मार्ट बाजार, रिलायन्स फ्रेश सिग्नेचर, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स ट्रेंड्स, जिओमार्ट, आजिओ, रिलायन्स ज्वेल्स, अर्बन लॅडर, नेटमेडस् आणि बरेच काही समाविष्ट आ आरव्हीएलनं ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २६०,३६४ कोटींची उलाढाल आणि ९१८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.

रिलायन्स रिटेल ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी आहे आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या कंपनीच्या संचालक आहेत.