Internet Boost Tips: मोबाईलमध्ये ही सेटींगकरा इंटरनेट चालेल सुपरफास्ट

Internet Boost Tips: सध्या इंटरनेट ही प्रत्येकाची मुलभूत गरज झाली आहे. इंटरनेटमध्ये क्रांती होत होत आता चक्का 5वी अपग्रेडेशन सुरु आहे ज्याला आण  5G इंटरनेट असे म्हणतो. हल्ली प्रत्येकाकडे फोन असतो, फोन आणि इंटरनेट हे एक समीकरणच बनले आहे.  इंटरनेटचा वेग देखील 4G आणि 5G  असेलेल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. कारण बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाचे व्यक्तीप्रमाणे गरजा देखील अपडेट होत आहेत. म्हणूनच आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट असूनही योग्य स्पीड मिळत नसेल तर नेमके काय करावे, असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो, म्हणूनच आज आम्ही याच विषयावर लेख घेऊन आलो आहोत.   Mobile setting

आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण विविध सेटिंग्सच्या मदतीने मोबाईलमधील इंटरनेटचा वेग कसा वाढवायचा ते सागंणार आहोत. त्यामुळे लेख संपूर्ण वाचा आणि तुमच्या मोबाईल मधील इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी योग्य ती सेटींग करा. Internet Boost Tips

मोबाईलमध्ये फास्ट इंटरनेटसाठी करा ही सेटिंग

तुम्हाला देखील मोबाईलचे इंटरनेट वापरताना अडथळा येत आहे. किंवा इंटरनेट सुरळीत येत नसेल तर काळजी करु नका तुम्ही देखील 5G नेटवर्क वापरु शकता. फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पुढीलप्रमाणे सेटिंग करणे गरजेचे आहे.  खालील पद्धतीने सेटींग केल्यानंतर तुमचा मोबाईल 5G नेटवर्क कनेक्ट करु शकेल आणि तुम्ही इंटरनेच्या मदतीने वेगाने सर्फिंग करु शकाल. व्हिडिओ पाहणे असो किंवा एखादा ऑनलाईन चित्रपट पाहणे असो तसेच तुम्ही एखादी महत्त्वाची माहिती सर्फिंग करत असाल तर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही हे काम करु शकता. Internet Boost Tips

  • तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्क सेटिंग मध्ये जा
  • त्या ठिकाणी असलेल्या 5G किंवा ऑटो म्हणून Preferred Network Type हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर नेटवर्क सेटिंग मध्ये Access Point network ची सेटिंग तपासा. कारण इंटरनेट वेगाकरिता योग्य एक्सेस पॉईंट नेटवर्क सेटिंग असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
  • म्हणूनच APN Setting menu मध्ये जा आणि setting default पर्याय सेट करा
  • तसेच इतर सोशल मीडिया ॲप्स म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक सारखे ॲप्स बॅग्राऊंडला सुरु राहत असतील तर तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड कमी करतात. त्यासाठी तुम्हाला त्या त्या ॲप्समध्ये जाऊन सेटींग बदलावी लागेल.
  • वरील प्रोसेस केल्याने तुमच्या मोबाईल मध्ये इंटरनेटचा स्पीड नक्कीच वाढू शकेल आणि तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचे काम करु शकाल.

तुमच्या मोबाईलचा इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी auto update apps हा पर्याय बंद करा

आपल्या मोबाईलमध्ये आधीपासूनच अशी सेटींग असते की आपण डाऊनलोड केलेले किंवा इन्स्टॉल केलेले अ‍ॅप्स आपोआप अपडेट होत राहतात. या अ‍ॅप्सच्या आपोआप अपडेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये इंटरनेट वापरला जातो. त्यामुळे देखील बरेचदा मोबाईलमधील इंटरनेटचा वेग कमी होत असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील  auto update apps हा पर्याय बंद करावा लागेल.  ही सेटींग करताच तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड आधी पेक्षा जास्त आहे. आणि तुम्ही सुरळीतपणे तुमचे इंटरनेटच्या वापराचे काम करु शकत आहात. Internet Boost Tips

मोबाईलमधील auto play download पर्याय बंद ठेवल्याने तुमचा इंटरनेट स्पीड वाढेल

आपण स्मार्टफोन वापरत असताना विविध सोशलमिडिया ॲप्सचा वापरत करीत असतो. उदा. व्हॉट्सॲप, टेलिग्राम या सारख्या ॲप्समध्ये सतत काही ना काही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट आपल्या मोबाईलवर येत असतात. अशावेळी जर का आपल्या मोबाईलमध्ये  auto play download हा पर्याय सुरु असेल तर इंटरनेटच्या वापराने ग्रुप्सवर किंवा पर्सनल चॅट्समध्ये आलेले फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट डाऊनलोड होत राहतात. या सगळ्या गोष्टी आपल्या नकळत होत असतात. त्यासाठी तुम्हाला mobile setting मध्ये जाऊन auto play download हा पर्याय बंद करावा लागले. कारण त्याचा परिणाम तुमच्या मोबाईलच्या इंटरनेट वापरावर होत असतो. Internet Boost Tips

5G इटंरनेटचे महत्त्व

आज आपण ज्या इंटरनेट क्रांतीच्या विश्वात राहत आहोत तेथे 5G नेटवर्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकांचे घर या इंटरनेटच्या वापराने केलेल्या कामातून चालतात. अनेकांचे आयुष्य या इंटरनेटवर अवलंबून आहेत. आज आपल्याकडे इंटनेट नसेल तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक बेरोजगार होतील. त्यांना अर्थाजनाचे पर्याय बंद होतील. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेटचे अनन्य साधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण देखील त्या सबंधीत बाबींविषयी अपडेट होणे तितकेच महत्त्वाचे आहे. Mobile setting