ST Bus new seating arrangement: एसटीची आसन व्यवस्था 1 जानेवारी 2023 पासून बदलणार. जाणून घ्या कशी असेल आसन व्यवस्था

ST Bus new seating arrangement महाराष्ट्र राज्यातील शासकीय वाहन सोवा पुरविणारी एस टी म्हणजेच state transport.  महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी  एसटी महामंडळाची स्थापना करण्यात आली.  एसटी महामंडळामार्फत सवलतीनुसार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती अशी की येत्या नवीन वर्षात एस टीच्या आसन व्यवस्था बदलण्यात येणार आहेत. याबाबात सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून देत आहोत. तुम्ही जर करा नेहमीच एस टी महामंडळाच्या बसेस ने प्रवास करत असाल तर हा लेख नक्की वाचा. ST Bus new seating arrangement

1 जानेवारी 2024 पासून बदलणार आसन व्यवस्था

 आता एसटी महामंडळाच्या प्रवाशांना शासकीय बसेसमध्ये आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी पासून नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात येणार असून विधिमंडळ सदस्यांना आता साध्याबस मध्ये १, २ ऐवजी ७, ८ आसन राखीव करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, पत्रकार, एसटी कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था सुद्धा बदलण्यात आली आहे. ST Bus new seating arrangement

एसटीमध्ये नव्या आसनव्यवस्थेनुसार महिलांना आरक्षित जागा

1 जानेवारी 2024 पासून बदलण्यात येणाऱ्या नव्या आसन व्यवस्थेनुसार एसटी मध्ये महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी प्रवाशांच्या माहितीकरीता नवीन आसन व्यवस्थेनुसार आरक्षणाची कार्यपध्दती अमलांत येईपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व बसस्थानकांवर वाहन प्रकारानुसार आसन क्रमांकांचे पुर्वीचे व आत्ता बदलण्यात आलेले  तक्ते फलकावर प्रदर्शित करण्याच्या सूचना सुद्धा एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिलेल्या आहेत. ST Bus new seating arrangement

एसटीचे ब्रिदवाक्य काय आहे? ST Bus

एसटीची सेवा  संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यांमध्ये गावोगावी दिली जाते.  गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी ही एसटी विभागाची ब्रिदवाक्ये आहेत. या  ब्रीदवाक्यानुसार  एसटी चा विस्तार हा खेड्यापासून शहरापर्यंत झालेला आहे.

राज्यभरातील एसटी विभागाचा विस्तार

महाराष्ट्रात तब्बल ३१ विभागांमार्फत एसटीचे विभागीय कामकाज सुरु असते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा या राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. सध्या महाराष्ट्र परिवहन विभागाकडे म्हणजेच एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे 15 हजार 512 वाहने उपलब्ध आहेत.

तसेच एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये समाजातील विविध घटकांना सेवा सवलती दिल्या जातात. ज्यामध्ये साधी, निमआराम, विनावानानुकूलित शयनआसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान या सर्वांमध्ये विविध प्रकारांमध्ये राखीव आसने उपलव्ध करुन दिलेली आहेत.

एसटी महामंडळात नव्याने ईटीआयएम-ओआरएस कार्यप्रणाली

नव्या तंत्रज्ञानानुसार एसटीने देखील कार्यप्रणालीमध्ये बदल करुन घेतले आहेत. सध्या एसटी महामंडळात ईटीआयएम-ओआरएस कार्यप्रणाली कार्यान्वित झालेली आहे. जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसेसचे वेगवेगळे सीट उपलब्ध होते. तसंच बस प्रकारानुसार विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील देण्यात आले होते. परंतु आता ही आसनव्यवस्था बसच्या प्रकारांनुसार बदलण्यात आली आहे.

एसटीमध्ये आधीच्या आसन व्यवस्थेनुसार प्रवाशांच्या अनेक तक्रारी महामंडळाकडे प्राप्त होत होत्या. म्हणूनच  सदर तक्रारी निर्माण होऊ नयेत याकरीता आणि  आसन व्यवस्थेमध्ये एकसुत्रता निर्माण व्हावी म्हणून एसटी महामंडळाने आसन व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाची सामाजिक जबाबदारी

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरांपर्यंत जोडणारी आणि कोणताही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड न देता प्रवासी सेवा देणारी एकमात्र वाहन व्यवस्था म्हणजे एसटी च्या बसेस. एसटी महामंडळाची ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे असे देखील म्हणता येईल.  अनेक खेड्या पाड्यांपासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात शाळेपर्यंत पोहोडवणारे साधन म्हणजे एसटी आहे. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास एसटीने करताना  एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी. ST bus