Sim card fraud: तुमचे नाव वापरुन किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? जाणून घ्या फक्त 1 मिनिटात

Sim card fraud सध्या शहरी भागासह ग्रामिण भागातही सगळीकडेच सर्रास मोबाईलचा वापर वाढत चालला आहे. कारण इंटरनेट गावोगावी पोहोचले आहे, आणि त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल ही आजची मुलभूत गरज झाली आहे. त्यामुळे सगळेच मोबाईलचा वापर करतात. आणि याच मोबाईलच्या सिम कार्डचा देखील हल्ली खूप गैरवापर सुरु आहे. त्याबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्या जात आहेत. परंतु काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या नावावर जर कोणी तिसरीच व्यक्ती सिम वापरत असेल तर तुम्ही हे जाणून घेऊ शकता. त्यासाठी शासनाने एक पोर्टल सुरु केले आहे. त्याबद्दल आज आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. Sim card fraud

कसे जाणून घ्यावे आपल्या नावावर किती सिम सुरु आहेत.

तुमच्या नावावर कोणी  तिसरीच व्यक्ती सिम कार्ड वापरत असेल तर तुम्हाला समजणे आता सोपे झाले आहे.  तुमच्या नावावर किती मोबाइल नंबर अॅक्टिव आहेत हे समजून घेण्यासाठी आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारतीय दूरसंचार विभाग  म्हणजेच department of telecommunication ने एक पोर्टल सुरु केले आहे.  tafcop.dgtelecom.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही त्या पोर्टलला भेट देऊ शकता.  या पोर्टलच्या माध्यमातून  तुम्ही सहज जाणून घेऊ शकाल की, तुमच्या नावावर किती मोबाइल नंबर वापरले जात आहेत. तसेच या पोर्टलवर जाऊन तुम्ही वापरात नसलेले नंबर देखील तुमच्या नावावरुन काढून टाकू शकता. किंवात एखादा नंबर ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट देखील करु शकता.

दुसऱ्याच्या नकळत त्याच्या ओळखपत्राचा वापर करुन सिम घेणे बेकायदेशीर

सिम कार्डचा वापर करुन समाजाच होत असलेल्या फसवणूकीला पाहता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, दुसऱ्याच्या नकळत त्याच्या ओळखपत्रांचा वापर करुन आपण दुसऱ्या डिटेल्सचा वापर करून मोबाइलचे  सिम कार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. यामुळे असे करणाऱ्यास कायद्याद्वारे शिक्षा देखील होऊ शकते.

ग्राहकांना नंबर अॅक्टिव आहेत हे एसएमएसद्वारे समजेल?

 भारतीय दुरसंचार विभागाने ग्राहकांच्या सुविधेसाठी पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सहज आपल्या नावावर सुरू असलेले सिमकार्डची माहिती करून घेता येते. यासाठी पोर्टलवर जाऊन आपल्याला आपला रोजच्या वापरातील नंबर टाकावा लागेल. त्यानंतर त्या नंबरवर एक OTP मिळेल. याच्या मदतीने ते सर्व अॅक्टिव नंबर्सची देखील माहिती  पोर्टलवर दिसायला लागेल. तसेच दुरसंचार विभागामार्फत सर्व  ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून संबंधीत माहिती देण्यात येते. त्यांच्या नावावर किती नंबर्स अॅक्टिव आहेत हे जाणून घेण्यासाठी ते कंज्युमर्स पोर्टलवर जाऊन त्या नंबर्स संबंधी रिपोर्ट करू शकतात. युजर्सच्या तक्रारीनंतर टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर या नंबरला ब्लॉक करेल आणि तो नंबर बंद होईल.

बदललेल्या शासकीय नियमाप्रमाणे एका व्यक्तीला किती सिम वापरता येतील?

बरेचदा आपण आपल्या नावावर घरातील इतर  सदस्यांना सिम कार्ड घेऊन देतो. परंतु आता दुरसंचार विभागाच्या बदललेल्या नियमांप्रमाणे एका व्यक्तीच्या नावावर मर्यादितच सिमकार्ड घेता येणार आहेत. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरकर्ता त्याच्या नावावर केवळ 9 सिम कार्ड  घेता येणे शक्य आहे. किंवा आपल्या नकळत दुसऱ्या व्यक्तीने आपल्या नावाचे कागदपत्र वापरुन 9 पेक्षा जास्त सिम वापरण्याचा प्रयत्न केल्यास, लेगचच  एसएमएसद्वारे सूचित केले जाते.

भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढती संख्या

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे सिम कार्डांची विक्रीही  देखील तितक्याच वेगाने वाढत आहे. आज अनेकांकडे दोनपेक्षा जास्त सिम कार्ड्स असतात. सिम कार्डता वाढता वापर आणि कोणत्याही ठळक नियमांशिवाय सिम कार्ड वापरले जाणे यामुळे सिम कार्डाशी संबंधित घोटाळे आणि फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. म्हणूनच   नागरिकांना त्यांच्या  नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे तपासाण्यासाठी भारत सरकारच्या ‘संचार साथी पोर्टल’ मध्ये एक टूल तयार करण्यात आले आहे ज्याच्या मदतीने नागरिक त्यांच्या आधार कार्ड शी लिंक केलेल्या सिम कार्डची संख्या सोप्या पद्धतीने तपासू शकतात.