Kia carens mileage petrol: स्वस्तात मस्त! या नव्या कार पुढे फिकी पडली Maruti Ertiga… या बड्या कंपनीने लाँच केली जबरदस्त 7-सीटर कार..

Kia Carens फेसलिफ्टने, 3-लाइन RV चे 2024 मधले वेरीएंट लॉन्च करून भारतात पाऊल ठेवले आहे. कोरियन ऑटो दिग्गज कंपनीने, कॅरेन्स लाइनअपला 9 नवीन प्रकारांसह अपडेट करून, एकूण वेरीएंट ची संख्या 30 वर नेली आहे.

या कार मधील प्रमुख बदलांमध्ये, नवीन डिझेल पॉवरट्रेन, अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि नवीन रंगांचा सुद्धा समावेश केला गेला आहे. जिथे Carens च्या किमती रु. 10.52 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होत होत्या तिथे हे नवीन वेरीएंट रु. 12.11 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. टॉप-एंड एक्स-लाइन व्हेरियंट, आता विशेष वैशिष्ट्यांसह अपडेट केले गेले आहे, ज्याची किंमत 19.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) असेल. चला तर मग Kia Carens फेसलिफ्टमध्ये आणखी काय बदल झाले आहेत ते जाणून घेऊया?

Kia Carens फेसलिफ्टचे नवीन प्रकार

Kia द्वारे कारमधील 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटमध्ये नवीन 1.5-लिटर डिझेल इंजिन जोडण्यात आले आहे, ज्यामुळे कार निर्मात्याला सर्व ट्रिम्समध्ये 9 नवीन वेरींएंट सादर करणे शक्य झाले आहे. नवीन U2 1.5 VGT डिझेल मॅन्युअल ही 6 आणि 7 सीटच्या कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. हे प्रकार प्रीमियम, प्रीमियम (O), प्रेस्टीज, प्रेस्टीज+, लक्झरी आणि लक्झरी+ सारख्या ट्रिममध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

Kia Carens फेसलिफ्टचे नवीन इंजिन

Kia Carens ही तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे ज्यात 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल युनिट यांचा समावेश केला गेला आहे. Kia द्वारे अजून U2 1.5 VGT डिझेल इंजिनचे पॉवर आउटपुट शेअर करण्यात आलेले नाही. सध्याचे 1.5-लिटर डिझेल युनिट हे एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध करण्यात आलेले. 113bhp पॉवर आणि 250nm चा पीक टॉर्क  हे इंजिन जनरेट करते.

Kia Carens फेसलिफ्टसाठी नवीन कलर ऑप्शन्स

Kia द्वारे Carens साठी कारच्या बाह्य रंगांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक्स-लाइन प्रकार वगळता सर्व ट्रिम्समध्ये कार निर्मात्याने ऑलिव्ह रंग जोडला आहे. हा रंग प्रथम Kia Seltos फेसलिफ्ट SUV मध्ये देण्यात आला होता. एकूणच काय तर, Kia Carens चे ग्राहक आता केवळ X-Line ट्रिममध्ये उपलब्ध असणारे आठ सिंगल-टोन, तीन ड्युअल-टोन आणि एकमेव मॅट-ग्रे यामधून कार ची निवड करण्यास सक्षम असणार आहेत.

Kia Carens फेसलिफ्टची नवीन वैशिष्ट्ये

Kia ने कारच्या X-Line वेरिएंटची फीचर लिस्ट आणखी वाढवली आहे, जी की गेल्या वर्षी पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाली होती. विशेषत: या ट्रिममध्ये ऍड करण्यात आलेली अतिरिक्त वैशिष्ट्ये ही सर्व विंडो नियंत्रित करण्यासाठी डॅशकॅम आणि व्हॉइस कमांड ने सुसज्ज केलेली आहेत. Kia ने X-Line मध्ये 7-सीटचे कॉन्फिगरेशन देखील जोडले आहे, जे की या आधी फक्त 6 सीटचे होते. Carens X-Line सह देण्यात आलेला चार्जर हा 180W चा असून, अधिक शक्तिशाली आहे, हा चार्जर जुन्या 120W चार्जरची रिप्लेसमेंट आहे. हे वैशिष्ट्य आता कारच्या सर्व प्रकारांमध्ये बघायला मिळते.

Kia ने तिच्या अन्य वेरींइंट्स मधे अजूनही काही वैशिष्ट्ये जोडली आहेत. Prestige+ (O) ट्रिम, हे 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DCT गिअरबॉक्सेससह उपलब्ध करण्यात आले आहे. यामधे सनरूफ, एलईडी मॅप लॅम्प आणि रूम लॅम्प सुद्धा देण्यात आला आहे. प्रेस्टिज (O) ट्रिम 6 सीट आणि 7 सीटच्या कॉन्फिगरेशनसह उपलब्ध आहे. यामधे लेदरलेट गियर नॉब, पुश-बटण स्टार्टसह स्मार्ट की, एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प, एलईडी डीआरएल आणि पोझिशनिंग लॅम्प सुद्धा आहे. प्रीमियम (O) ट्रिममध्ये कीलेस एंट्री, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स, शार्क फिन अँटेना, बर्गलर अलार्म यासारखी उत्तम सिक्युरिटी फीचर्स आहेत.