Umang App 7/12 download उमंग ऍपच्या मदतीने ७/१२ डाऊनलोड करा अगदी काहीच सेकंदात

Umang App 7/12 download

Umang App 7/12 download भारतात सध्या सुरु असलेली डिजिटल क्रांती आता शेतीव्यवसायात सुद्धा पहायला मिळते. भारतातील विविध जिल्ह्यांध्ये असलेले भूमी अधिग्रहण विभाग आता संगणीकृत करण्यात येत आहे.  नागरिकांना सगळ्याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने, डिजिटली स्वरूपात पाहायला मिळाव्यात म्हणून शासनाने  ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा असलेला जमिनीचा 7/12  उतारा आता डिजिटल स्वरुपात पहायला मिळणार आहे.  ही महाभूमी प्रकल्प महसूल विभागाची डिजिटल क्रांती असल्याचे स्पष्ट झाले आहे.  Umang App 7/12 Land Record Download Maharashtra Process,  महसूल विभागाने संगणकीकृत केलेला तसेच महाभूमी संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेला ‘डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा’ आता केंद्र शास्नानाच्या उमंग या मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांतील ४४ हजार ५६० महसुली गावांतील दोन कोटी ५७ लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा ‘महाभूमी’ संकेतस्थळासह आता केंद्राच्या ‘उमंग’ या ऍपवर उपलब्ध होणार आहे.

काय आहे Umang App?

केंद्र शासनाने तयार केलेल उमंग हे एक असे ॲप ज्यामध्ये नागरीक एकापेक्षा जास्त सरकारी सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेऊ शकतो.

UMANG चा फुल फॉर्म Unified Mobile Application for New-age Governance असा आहे. या ॲपचा उपयोग करुन आपण अनेक सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी करु शकतो. यामध्ये १२७ विभागांमधील तसेच सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो तसेच शसकीय योजनांची माहिती देखील या ॲपच्या माध्यमातून मिळवता येते.  नोव्हेंबर २०१७ मध्ये पहिल्यांदा या ॲपला लॉन्च केले गेले होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या सरकारी सेवांपर्यंत पोहचण्यासाठी तसेच त्यांची महिती मिळण्यासाठी या ॲपचा उपयोग होतो. हे एक निःशुल्क ॲप आहे. उमंग ॲप हे अतिशय सुरक्षित ॲप आहे. मराठीसह इतर भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे.

Umang App 7/12 download कसे करावे?

  • अँड्रॉइड फोन वापरकर्ते Play store मधून  Umang App Download करू शकतात.
  •  तसेच 9718397183 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन एक लिंक प्राप्त करून त्याद्वारे सुद्धा हे ॲप मिळवू शकतात.
  •  https://web.umang.gov.in hi लिंक सुद्धा ॲप डाऊनलोड करण्यासाठी मदत करेल.

उमंग अॅपचे वापरकर्ते – users of Umang App

केंद्र सरकारने बनवलेल्या या अॅपचे वापरकर्ते सध्या दिवसागणिक वाढत आहेत.  दोन लाख नागरिक अॅपचा डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारे तसेच प्रॉपर्टी कार्ड कार्यालयीन, न्यायालयीन कामकाजासाठी वापर करीत आहेत. जवळपास साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे महाभूमी संकेतस्थळावरून आतापर्यंत डाउनलोड करण्यात आले आहेत. त्यापैकी १०५ कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे.

 हे आहेत उमंग ॲपचे फायदे

  • उमंग ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीचा ७/१२ उतारा पाहू शकतो, तो डाऊनलोड देखील करु शकतो.
  • ॲपवरूनच सातबारा वरील डॉक्युमेंट आयडी वरून त्याची अचूकता पडताळणी करता येईल.
  • उमंग ॲपवरून आपल्या खात्यावर पैसे भरता येतात
  • विविध शासकीय योजनांची माहिती या ॲपच्या माध्यमातून मिळवता येते.
  • आपल्या राज्यातील विविध शासकीय विभागांतर्गत काढले जाणारे शासन निर्मण या ॲपच्या माध्यमातून मिळवता येतात.
  •  पोस्टातील तुमच्या पासबुक पासुन ते PF पर्यंतची संपूर्ण माहिती आपण मिळवू शकतो केवळ या एका ॲपच्या मदतीने
  • आधार कार्डशी संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणतेही बदल करण्यासाठी बहुतेक ग्राहकांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागते किंवा आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागते. उमंग अ‍ॅप्लिकेशनवर आधारशी संबंधित अनेक सेवा दिल्या जात आहेत.

मग तुम्ही भारताचे सामान्य नागरीक जरी असलात तरी तुम्ही हे Umang App जरूर डाऊनलोड करुन घ्या. कारण या अ‍ॅपमध्ये केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजना आणि शासन निर्णययांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.