Ladki Bahin Yojana April Installment: लाडक्या बहिणींनो… एप्रिलमध्ये फक्त 500 रुपयेच मिळणार? या महिलांना नाही मिळणार 1500 रुपये… वाचा संपूर्ण माहिती…

Ladki Bahin Yojana April Installment: एप्रिलचा महिना काही महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय, तर काहींसाठी काळजीचं कारण बनलाय. ‘लाडकी बहिण’ योजनेतून मिळणारा 1500 रुपयांचा हप्ता या महिन्यात काही महिलांना फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटतंय ना? पण यामागे सरकारचा एक ठाम निर्णय आणि पडताळणी प्रक्रियेचा मोठा भाग असल्याचं दिसून येत आहे, आणि हे प्रत्येक लाभार्थी महिलेनं समजून घेणं खूप गरजेचं आहे.

ज्या महिलांना ‘नमो शेतकरी योजना’चा लाभ मिळतोय, त्या महिलांना आता ‘लाडकी बहिण’ योजनेचा पूर्ण लाभ म्हणजे 1500 रुपये मिळणार नाहीत. त्याऐवजी फक्त फरकाची रक्कम, 500 रुपयेच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारनं याबाबत स्पष्ट सांगितलंय की एकाच लाभार्थ्याला दोन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा पूर्ण लाभ एकत्र मिळणार नाही. त्यामुळे सुमारे 8 लाख महिलांना एप्रिलपासून या दोन्ही योजनांचा मिळून फक्त 500 रुपयांचा फरक दिला जाईल.

‘माझी Ladki Bahin Yojana’ म्हणजे काय?

ही योजना जुलै 2024 पासून महाराष्ट्र सरकारनं सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश आहे, राज्यातील गरीब, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं. तसेच याअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा थेट खात्यात 1500 रुपये दिले जातात. ही मदत महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देते, तसेच अनेक महिला त्यांच्या घरातील अनेक जबाबदाऱ्यांना या मदतीद्वारे हातभार लाऊ शकणार आहेत.

Ladki Bahin योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

लाडकी बहिण योजनेसाठी काही ठराविक निकष आहेत:

  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे.
  • तिचं वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं.
  • महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा कुटुंबातील एकमेव अविवाहित असावी.
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं.
  • बँक खातं आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.
  • कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
  • घरात ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही चारचाकी वाहन नसावं.

Namo Shetkari Yojana कारण बनली ‘फक्त 500 रुपये’ मिळण्याचं!

‘Namo Shetkari Yojana’ ही देखील एक महत्त्वाची सरकारी योजना आहे, ज्यात राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात दिली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांनी ‘लाडकी बहिण’ योजनेतही नाव नोंदवलं. परंतु सरकारच्या धोरणानुसार एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक योजनांचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही.

या पार्श्वभूमीवर सरकारनं 8 लाख महिलांची पडताळणी केल्यानंतर हे स्पष्ट केलं की काही महिला ह्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे, त्यांना लाडकी बहिण योजनेच्या 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळतील, म्हणजे केवळ फरकाची रक्कमच त्यांना देण्यात येईल.

एप्रिल महिन्यात बदलती आकडेवारी

फेब्रुवारी महिन्यापर्यंत तब्बल 9 लाख महिलांना अपात्र ठरवलं गेलं होतं. आता एप्रिल महिन्यात त्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. काही महिलांना वाटतंय की त्यांनी अचूक कागदपत्रं दिली होती, तरीही अपात्र ठरवलं गेलं आहे. पण अर्ज करताना काळजी घेणं, सर्व कागदपत्रं योग्यरीत्या जोडणं आणि वेळोवेळी वेबसाइटवर तपासणी करणं गरजेचं आहे.

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं कोणती?

जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर खालील कागदपत्रं तयार ठेवा:

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र अधिवास दाखला किंवा मतदान कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला (प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून)
  • बँक पासबुकची झेरॉक्स (पहिलं पान)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशनकार्ड
  • अटी व शर्तींचं हमीपत्र
  • ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाची प्रत

Ladki Bahin Yojana Online Apply | अर्जाची प्रक्रिया काय?

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 अशी होती. त्यामुळे आता नवीन कुठलेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी तसेच नवनवीन अपडेट्स साठी योजनेच्या अधिकृत वेबसाइट, ladkibahin.maharashtra.gov.in, वर भेट द्या.